चाचणीसाठी मृतदेह मिळत नसल्याने एक वर्षापासून विद्युत दाहिनी धूळखात
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत निगडी येथील अमरधाम स्मशानभूमीच्या विद्युत दाहिनीचे काम पूर्ण होऊन देखील ती वापरासाठी खुली केली जात नाही. चाचणीसाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील
शवागृहातून बेवारस मृतदेह मिळत नाही, तोपर्यंत विद्युत दाहिनी सुरु करण्यात येणार नसल्याचा खुलासा फ क्षेत्रीय कार्यालयाकडून करण्यात
आला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विभागाकडून स्मशानभूमीचे काम पाहिले जाते. निगडीतील
स्मशानभूमी महापालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत येते. याठिकाणी विद्युत दाहिनी सुरु करण्याचे काम कल्याणी एंटरप्राइजेस या ठेकेदार संस्थेला दिले होते. हे काम पूर्ण करुन एक वर्षाचा अवधी उलटला तरी,
विद्युत दाहिनी वापरासाठी सुरु केली जात नाही. त्यामुळे निगडी गावठाण, चिखलीचा काही भाग,
यमुनानगर, त्रिवेणीनगर, कृष्णानगर, ओटा स्कीम आदी भागातील नागरिकांना अंत्यविधीसाठी या
स्मशान भूमीत यावे लागते. त्यांना जुन्याच दाहिनीचा वापर करावा लागत आहे. त्यांची गैरसोय
होऊ नये, यासाठी महापालिकेने तयार केलेली विद्युत दाहिनी सुरु करण्यासाठी शहर भाजपाचे चिटणीस सचिन काळभोर यांनी पाठपुरावा केला होता.
काळभोर यांनी विद्युत दाहिनी सुरु न करण्याचे कारण विचाले असता फ क्षेत्रीय कार्यालयाकडून
सांगण्यात आले की, पालिकेच्या विद्युत दाहिनीवर चाचणी घेण्यासाठी बेवारस शव द्यावे लागते
फ क्षेत्रीय कार्यालयाकडून खुलासा रुग्णालयातील शवागृहातून बेवारस शव उपलब्ध करुन दिले जात
नाही. बेवारस शव उपलब्ध करुन दिल्यानंतर चाचणी घेऊन विद्यत दाहिनी वापरासाठी कायमस्वरुपी
सुरू केली जाईल.