एच. ए. स्कूल प्राथमिक विभागात आज वृक्ष दिंडीचे आयोजन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -एच. ए. स्कूल प्राथमिक विभागात आज वृक्ष दिंडीचे आयोजन, वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व कळावे या उद्देशाने झाडे लावण्याचा उपक्रम घेण्यात आला.
डेक्कन एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूल प्राथमिक विभागामध्ये आज शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा जाधव यांच्या संकल्पनेने वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मा. रामा भोरखडे यांच्या सहकार्याने शाळेला विविध प्रकारची रोपे देण्यात आली. ही संस्था विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप , रुग्णांना फळे वाटप , सफाई कर्मचारी डॉक्टर नर्स यांचा सन्मान अशा विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करते. यावेळी उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
रूपाली जाधव यांनी मुलांना वृक्षारोपणाची माहिती सांगितली. समीक्षा इसवे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे निलेश पवार ,अमर पवार व निलेश नलावडे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणा संबंधी घोषणा फलक हातात घेऊन व घोषणा देत एच.ए. कॉलनीतून वृक्षदिंडी काढली. कार्यक्रमासाठी ज्येष्ठ शिक्षक अर्चना गोरे , डॉ. विठ्ठल मोरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी पुष्पा राऊत यांचे सहकार्य लाभले.