Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  मावळ लोकसभा मतदारसंघात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. मावळ तालुक्यातील वडगावमध्ये हा कार्यक्रम झाला. लोणावळा नगरपरिषदेच्या कार्यालयातील तळमजल्यावरही योजनेचा शुभारंभ केला आहे. जास्तीत-जास्त महिलांना लाभ द्यावा, महिलांना मदत करण्याच्या सूचना खासदार बारणे यांनी अधिका-यांना दिल्या. वडगावमध्ये झालेल्या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, तहसीलदार यावेळी उपस्थित होते. पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्पामध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर केली. त्यानंतर तत्काळ या योजनेचा राज्यातील महिलांना लाभ देण्यास सुरुवात झाली आहे.‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेंतर्गत २१ ते ६५ वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दरमहिना १५०० रुपये देण्यात येणार आहेत. सुमारे एक कोटी…

Read More

निरा,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सालाबादप्रमाणे यंदाही शिवाजीनगर पुणे येथे कृषी अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या श्री.अनिल भगवान डोईफोडे कुटूंबियांच्या वतीने संतश्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी हजारो वारकऱ्यांची चहा, नाष्टा व अंघोळीची सोय करत सेवा करण्यात आली. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात माऊलींच्या निरा नदीतील पादुका स्नानाला अतिशय महत्व आहे. वाल्हे गावात मुक्काम केल्यानंतर निरेतील स्नानापर्यंतच्या जवळपास ११ किमींच्या मार्गात पिंपरे निरा, ता.पुरंदर येथे डोईफोडे कुटूंबियांचे घर असून, गेल्या कित्येक वर्षांपासून नित्यनियमाने ते वारकऱ्यांच्या संपूर्ण नाष्ट्याची सोय करतात. यासह वारकऱ्यांना अंघोळीची देखील ते सोय करतात. यंदाच्या सेवेचे वैशिष्ठ म्हणजे हर्षदा, श्वेता आणि शंभुराज या डोईफोडे कुटूंबातील मुलांनी आपले स्वतः बचत…

Read More

चिंचवड (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकनेते दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मरणार्थ कॅरम स्पर्धा बक्षीस वितरण व स्पर्धेचा समारोप शहराध्यक्ष  शंकर जगताप  यांच्या उपस्थितीत  संपन्र झाला. कॅरम असोसिएशन पुणे जिल्हा आणि मा.नगरसेविका सौ. माधुरीताई कुलकर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी-चिंचवडचे लोकनेते दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मरणार्थ दळवीनगर,वाल्हेकरवाडी येथे भव्य पुणे जिल्हा कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राष्ट्टीय स्तरावरील महिला व पुरूष कॅरमपटू खेळाडूंनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदविला. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी श्री.शंकरभाऊ जगताप यांनी नगरसेविका मोनाताई कुलकर्णी यांच्या कार्याच कौतुक करून सर्व खेळाडू व असोसियन पदाधीकारी यांचे अभिनंदनही केले.व उपस्थित राहून सहभागी खेळाडूंसोबत संवाद साधला. लोकनेते दिवंगत…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्रभर पसरलेला कंजार भाट समाज हा भटके विमुक्त समाज म्हणून ओळखला जातो. या समाजाला शासकीय योजना व शिक्षणाचा लाभ घेण्यासाठी १९६१ साल पूर्वीचा महाराष्ट्र राज्यातील रहिवास पुरावा सादर करावा लागतो. मुळातच या समाजातील नागरिकांचे शिक्षण अत्यल्प असल्यामुळे असे महसुली पुरावे जमा करणे शक्य होत नाही. त्यामुळे या समाजातील विद्यार्थी व नागरिकांना शिक्षण व शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. याबाबत शासन स्तरावर कंजार भाट समाज विकास कृती समिती, महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून शासन आपल्या दारी हा उपक्रम पिंपरीत बुधवारी…

Read More

” अमित गोरखे युथ फाऊंडेशन व कलारंग संस्था यांच्या वतीने ” पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्रमांक 10 मधील शाहूनगर, संभाजीनगर, विद्यानगर, दत्तनगर, म्हाडा, मोरवाडी, लालटोपी नगर, अण्णा साहेब मगर नगर, इंदिरानगर भागातील 10 वी व 12 वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला.. यावेळी विद्यार्थ्यांना अमित गोरखे यांच्या कडून मार्गदर्शन करण्यात आले ते म्हणाले.. सातत्य आणि स्वप्न बघण्याची वृत्ती असेल तर यश हमखास मिळेल तसेच शिक्षणात स्पर्धा ठेवावी पण मनात एकमेकां बद्दल क्लेश नसावा, आपल्या शिक्षणात जेवढे परिश्रम आपल्या शिक्षकांनी घेतले तेवढेच कष्ट आपल्या आईवडिलांनी घेतलेले असतात हे आपण विसरता कामा नये. त्याच बरोबर त्यांच्या पुढील…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  कवी विजय वडवेराव आयोजित आणि प्रायोजित भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यमहोत्सवाला सर्व स्तरातून उदंड प्रतिसाद लाभला. रविवार, दिनांक ०७ जुलै २०२४ रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागे, पिंपरी येथे या काव्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह गोवा, गुजरात, कर्नाटक, केरळ राज्यातील दोनशेहून अधिक कवींनी सहभाग घेतला. सुमारे दहा तासांहून अधिक काळ रंगलेल्या या महोत्सवात तीन वर्षे वयाच्या पूजा पाटील या चिमुरडीपासून ते वयाची ऐंशी वर्षे पार केलेल्या ज्येष्ठ कवयित्री शोभा जोशीपर्यंतच्या कवींनी मुक्तच्छंद, ओवी, पाळणा, गीत, गझल, पोवाडा, सुंबरान, अभंग (अखंड) असे वैविध्यपूर्ण काव्यप्रकार खडीबोली तसेच गेय शैलीत अतिशय प्रभावीपणे…

Read More

पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  शहरातील महापालिका व खासगी शाळांमधील सर्व शालेय विद्यार्थ्यांना पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिका तसेच पीएमआरडीए आणि कॅन्टोन्मेंट हद्दीसाठी पीएमपीएमएलचे शैक्षणिक मोफत बसपास उपलब्ध करून द्यावेत. पुणे महापालिकेमार्फत पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरात जाण्यासाठी शालेय विध्यार्थ्यांना मोफत बस पास दिले जात आहेत. मात्र पिंपरी-चिंचवड महापालिका केवळ आपल्या हद्दीतच प्रवासासाठी विद्यार्थ्यांना काही शुल्क आकारून बस पास उपलब्ध करून देत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने विद्यार्थ्यांसोबतचा हा दुजाभाव थांबवावा, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्य सरकारने महिला सक्षमीकरण आणि निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ सुरु केली आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा एक हजार 500 रुपये थेट महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. या योजनेंतर्गत अर्ज भरण्यासाठी चिंचवड येथे आज (मंगळवार, दि. 9) पासून शुभारंभ होणार आहे. चिंचवड येथील चिंचवडे मंगल कार्यालयात अर्ज भरून घेतले जाणार आहेत. राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेंतर्गत अर्ज करण्याची मुदत सुरुवातीला 15 जुलैपर्यंत ठेवली होती. महिलांना कागदपत्रांची जुळवणी आणि अर्ज करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी या मर्यादेत शासनाने सुधारणा केली. आता 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. 31…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील मालमत्ता सर्वेक्षणामध्ये अधिक सुसूत्रता आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शहरातील मालमत्तांचे आता ड्रोनद्वारे सर्वेक्षण होणार आहे. या द्वारे शहरातील प्रत्येक मालमत्तेचे अत्यंत सुक्ष्म मोजमाप करण्याचा महापालिकेचा मानस आहे. असा पथदर्शी उपक्रम राबविणारी राज्यातील ही पहिली महापालिका ठरणार असून इतर शहरे देखील या महत्वाकांक्षी उपक्रमाचे अनुकरण करतील, असा विश्वास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी व्यक्त केला. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील मालमत्तांचे आता ड्रोनद्वारे सर्वेक्षण होणार आहे. ड्रोन आकाशात उडवून या उपक्रमाचा शुभारंभ आज पिंपरी येथील एच.ए. मैदानावर आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या  हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. पिंपरी चिंचवड…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी पिंपरी चिंचवड शहरात करण्यासाठी आठही क्षेत्रीय कार्यालयअंतर्गत विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विविध ठिकाणी १२३ केंद्रे असून या सर्व अर्जस्विकृती केंद्रांवर समन्वयक, डाटा एन्ट्री ऑपरेटर (संगणक चालक), मदतनीस, सुरक्षा कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच दैनंदिन कामकाज सुरळीत पार पाडण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.           राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल कल्याण विकास विभागाच्या वतीने मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण…

Read More