Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»पिंपरी-चिंचवडमधील शालेय विद्यार्थ्यांना पीएमआरडीए आणि कॅन्टोन्मेंट हद्दीसाठी पीएमपीएमएलचे मोफत बस पास द्या – भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप
ताज्या घडामोडी

पिंपरी-चिंचवडमधील शालेय विद्यार्थ्यांना पीएमआरडीए आणि कॅन्टोन्मेंट हद्दीसाठी पीएमपीएमएलचे मोफत बस पास द्या – भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com9 July 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  शहरातील महापालिका व खासगी शाळांमधील सर्व शालेय विद्यार्थ्यांना पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिका तसेच पीएमआरडीए आणि कॅन्टोन्मेंट हद्दीसाठी पीएमपीएमएलचे शैक्षणिक मोफत बसपास उपलब्ध करून द्यावेत. पुणे महापालिकेमार्फत पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरात जाण्यासाठी शालेय विध्यार्थ्यांना मोफत बस पास दिले जात आहेत. मात्र पिंपरी-चिंचवड महापालिका केवळ आपल्या हद्दीतच प्रवासासाठी विद्यार्थ्यांना काही शुल्क आकारून बस पास उपलब्ध करून देत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने विद्यार्थ्यांसोबतचा हा दुजाभाव थांबवावा, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत शहरातील महिला व बालकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या कल्याणकारी योजनांच्या अंतर्गत शहरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी पीएमपीएमएलचे मोफत बसपास उपलब्ध करून देणे शक्य आहे. महापालिका शाळांसह शहरातील विविध ठिकाणाच्या खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी वर्षाला हजारो रुपये मोजावे लागत आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेने शालेय विद्यार्थ्यांसाठी पीएमपीएमएल बसमध्ये मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करून दिल्यास शहरातील हजारो सर्वसामान्य कुटुंबांना मोठा आधार मिळेल. शालेय विद्यार्थ्यांना पीएमपीएमएलमधून मोफत प्रवास करण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिल्यास शहरातील वाहतुकीवरचा ताणही कमी होऊ शकेल. अनेक विद्यार्थी रिक्षा, स्कूल बस यांसारख्या वाहनांमधून रोज शाळेत ये-जा करत असतात. त्यामुळे शाळांच्या वेळेत शहरातील रस्त्यांवर दररोज वाहतूक कोंडी निदर्शनास येते.

पुणे महापालिकेमार्फत पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरात ये-जा करण्यासाठी शालेय विध्यार्थ्यांना मोफत बस पास दिले जात आहेत. त्याउलट पिंपरी-चिंचवड महापालिका केवळ आपल्या हद्दीतच पीएमपीएमएल बसने प्रवास करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना काही शुल्क आकारून बस पास उपलब्ध करून देत आहे. त्याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने १० जून २०२४ रोजी पीएमपीएमएलला दिलेल्या पत्रात विद्यार्थ्यांना बस पास देण्याकरिता काही अटी व शर्तींचा उल्लेख केलेला आहे. त्यातील चार क्रमांकाची अट शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या बस पासच्या सवलतीबाबत भेदभाव करणारी आहे. या अटीमध्ये असे म्हटले आहे की, “मनपा हद्दीतील मनपाच्या सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच खासगी मान्यताप्राप्त शाळांमधील इयत्ता ५ वी ते इयत्ता १० वी पर्यंतच्याच विद्यार्थ्यांना ही योजना लागू राहील. मनपा हद्दीबाहेरील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बसपास दिल्यास त्याचे बिल मनपाकडून अदा केले जाणार नाही.”

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील शालेय विध्यार्थ्यांना पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महानगरपालिका हद्दीसह पीएमआरडीए व कॅन्टोमेंट परिसरातील शासकीय आणि खासगी शाळांमध्ये शिक्षण घेण्यासाठी पीएमपीएमएलचे मोफत बसपास उपलब्ध करून द्यावेत. याबाबत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत तातडीने प्रस्तावाला मंजुरी द्यावी. या प्रस्तावाची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याबाबत पीएमपीएमएल प्रशासनाला निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.”

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआजपासून चिंचवड येथे ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ अंतर्गत अर्ज भरण्यास प्रारंभ
Next Article भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यमहोत्सवाला उदंड प्रतिसाद
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

By maharashtrabreakingnews.com6 February 20260
Spread the love

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक  शत्रुघ्न (बापु) काटे,नगरसेविका  अनिता…

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.