- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
*पिंपरी-चिंचवड साहित्य मंच आयोजित* *मुशाफिरी- भाग तेरावा* *लेखन- सौ. माधुरी शिवाजी विधाटे, पुणे* *हंपी ,एक वैभवशाली शिल्पनगरी,भाग २* *हंपी विजय विठ्ठल मंदिर* 🚩 *देवशयनी आषाढी एकादशी*🚩 निळेभोर आकाश, शिशिर ऋतूतील स्वच्छ आल्हाददायक हवा आणि ग्रॅनाईटमधील सुंदर मंदिरे पाहून स्वप्ननगरीत आल्याचा आभास होत होता.कर्नाटकमधील हंपी या वैभवशाली शिल्पनगरीमध्ये आम्ही विजय विठ्ठल मंदिरात आलो होतो. युनेस्कोने जागतिक वारसा क्षेत्र म्हणून घोषित केल्यामुळे प्रदूषण टाळण्यासाठी बॅटरी रिक्षाने यावे लागले.हे सोळाव्या शतकातील मंदिर असून तुंगभद्रा नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर स्थित आहे. दक्षिण भारतीय द्रविड मंदिर स्थापत्य शैलीतील हे मंदिर अद्भुत वास्तुकलेची साक्ष देत युगानुयुगे उभे आहे. पार्वतीने म्हणजेच पंपादेवीने शिवप्राप्तीसाठी इथे हेमकूट पर्वतावर तपश्चर्या केली…
पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह तब्बल 28 लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. यावेळी शहराध्यक्ष तुषार कामठे, रविकांत वर्पे, सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार प्रशांत सपकाळ, सुलक्षणा शीलवंत, विशाल जाधव, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ओबीसी विभाग उपस्थित होते. प्रवेश केलेल्या मान्यवरांची नावे पुढीलप्रमाणे – माजी महापौर हणमंतरावजी भोसले, माजी महापौर वैशाली घोडेकर, माजी नगरसेवक पंकज भालेकर, माजी नगरसेवक प्रवीण भालेकर, माजी नगरसेविका संगीता ताम्हाणे, दिवंगत नगरसेविका पौर्णिमा सोनवणे यांचे पती रवी सोनवणे, दिवंगत नगरसेवक दत्ता काका साने यांचे पुत्र यश साने (आजी आजारी असल्यामुळे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पिंपरी चिंचवड शहारात अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार गटाचे शहाराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे शहरात आता एकच खळबळ उडाली आहे. अशातच येत्या २० तारखेला अजित गव्हाणे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचीही माहिती समोर येत आहे. त्यामुळे अजित पवार गटाला गळती सुरूच असल्याचं बोललं जात आहे. अजित गव्हाणे यांच्यासह राहुल भोसले, पंकज भालेकर आणि यश साने यांनी देखील अजित पवार गटाला रामरामा ठोकला आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. अशातच अलिकडेच माजी आमदार…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिकेने नेमलेल्या स्थापत्य कन्सल्टंट प्रा. लि. कंपनीने नव्याने आढळलेल्या मिळकतींना कर आकारणी बिले बजावली आहेत. या बिलाबरोबर दिलेल्या स्कॅन कोडला तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. ती आता दुर झाली आहे. त्यामुळे मालमत्ता धारकांनी कोड स्कॅन करून आपल्या मालमत्ता कराचा त्वरित भरणा करावा, असे आवाहन महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात नवीन, वाढीव अशा मालमत्तांचा अत्याधुनिक ड्रोनच्या सहाय्याने सर्वेक्षण करण्यास सुरुवात झाली आहे. शहरात सुमारे दोन लाख नवीन आणि वाढीव मालमत्ता आढळण्याचा महापालिका प्रशासनाचा अंदाज आहे. मालमत्ता सर्वेक्षणासाठी महापालिकेने स्थापत्य कन्सल्टंट प्रा. लि. कंपनीची नियुक्ती केली आहे. याच…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहरात झपाट्याने वाढणाऱ्या डेंग्यू आजाराबाबत योग्य उपयोजना तसेच डेंग्यू मुक्त शहर करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आयुक्तांकडे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पावसाळा सुरू आहे शहरात साथीच्या आजाराने रुग्ण वाढत असून अशातच शहरात डेंगू रुग्णांची संख्या देखील वाढत असून याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आयुक्तांनी शहरात अनेक सार्वजनिक, वैयक्तिक ठिकाणी, झाडाची कुंडी, पाळीव प्राण्यांसाठी ठेवण्यात आलेली भांडी, टायर, मोकळे डब्बे, आदी ठिकाणी पाणी साठवले जातेय त्या साठवलेल्या पाण्यात डेंगू डासउत्पत्ती वाढत असून, संबंधित याकडे दुर्लक्ष करीत असून, या हलगर्जीपणामुळे शहरातील डेंगू रुग्णाची संखेत झपाट्याने वाढ होत…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालक कार्यालयाच्या नियमांमुळे विद्युत ठेकेदार कमालीचे हैराण झाले आहेत. वस्तुस्थितीला धरुन नसलेल्या नियमांना तातडीने स्थगिती द्यावी; अन्यथा याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा पिंपरी चिंचवड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनने दिला आहे. याबाबतचे निवेदन प्रभारी प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांना देण्यात आले असून सात दिवसांत सुधारणा करण्याचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. महावितरणकडून ग्राहकांच्या नवीन पायाभूत सुविधा उभारणी कामाची ठराविक पद्धत असून राज्यभरात त्यानुसार कामकाज चालते. त्यानुसार सर्व नवीन कामांच्या पूर्तता अहवालांना स्वीकारून नवीन वीज जोडण्या कार्यान्वित करण्याची प्रक्रिया निर्धारित करण्यात आलेली आहे. त्यानुसार कार्य पूर्तता अहवालांना विभागीय व मंडल स्तरावर स्वीकृती देऊन जोडण्या जारी करण्याचे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अंदर मावळातील अति दुर्गम अशा भागामध्ये ज्या ठिकाणी सतत पाऊस पडतो, निसर्गाच्या सानिध्यात ,पहाड व वनराईच्या आत असलेल्या पहाडी भागातील शालेय विद्यार्थ्यांन पर्यत गरजेच्या वस्तू पोहोचत नसतात, त्या भागातील विद्यार्थी वर्ग पावसामध्ये भिजत तीन ते चार किलोमीटर पर्यत पायी चालत जातात, याचा अभ्यास करून या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉ . रेखा भोळे म्हणाल्या आमची संस्था अशा विद्यार्थ्यांना शोधून त्याचा अभ्यास आमच्या संस्थेचे पदाधिकारी करतात.आणि त्यानां ज्या ज्या गोष्टींची आवश्यक ता असते ते पुरवण्याचे कार्य ओम गगनगिरी वर्ल्ड फाउंडेशन च्या माध्यमातून केले जाते. यावेळी मेटलवाडी शाळेचे मुख्याध्यापक सुनील धोबे म्हणाले या भागातील जास्त पर्जन्यमान लक्षात घेऊन…
पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि., महानगरपालिका आणि रिलायन्स स्मार्ट बाजार यांच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक वेशभूषा स्पर्धेच्या माध्यमातून मुलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावा, या उददेश्याने वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आहे. लहान मुलांमध्ये विविध कलागुण असतात. या कलागुणांना योग्य वाव मिळाल्यास त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो. तसेच अशा उपक्रमांमुळे मुलांच्या बालमनावर चांगले संस्कार होण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून सांस्कृतिक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेत एक हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. या वर्षी देखील स्पर्धेचे व्यापक स्तरावर आयोजन करण्यात आले आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी, संत, वारकरी यांच्या पारंपरिक वेशभूषा करणे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – परिमंडळ कार्यालयाच्या परिसरात एजंट लोकांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सचिन काळभोर यांनी पोलिस निरीक्षक यांच्याकडे केली आहे. दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सद्यस्थितीत शासनामार्फत राबवित असलेल्या लाडकी बहीण योजने अंतर्गत रेशनकार्ड कार्यालयात शिधापत्रिका कामकाजासंबंधी कामकाज करणेसाठी लोकांची(विशेषत: महिलांची गर्दी वाढत आहे. शिधापत्रिका संबंधी सर्व कामकाज हे संगणकीय प्रणालीद्वारे (Online) मार्फत केले जाते. त्याअनुषंगाने कार्यालय परिसरात बरेच प्रमाणात एजंट लोक हे आलेल्या लोकांची दिशाभुल करून कार्यालय व अधिकारी यांची नावे घेवून मोठ्या प्रमाणात पैसे उकळत असल्याचे निदर्शनास आले. त्याअनुषंगाने आपल्या मार्फत सदरील एजंट यांचेवर कारवाई किंवा बंदोबस्त करून शासनाची प्रतिमा मलीन होणार नाही याकरीता संबंधित…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मोरया सामाजिक प्रतिष्ठान संचलित लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप पॅरामेडीकल कॉलेजच्या ऋतुजा बाबर, प्राजक्ता पाटील, ज्योती म्हस्के, गायत्री जाधव या विद्यार्थीनींचा केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते राज्यातील पॅरामेडीकल क्षेत्रातील उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून गौरविण्यात आले. पॅरामेडीकलमधील पिंपरी-चिंचवडच्या एखाद्या विद्यार्थीनींना अशा प्रकारचा पहिल्यांदाच सन्मान प्राप्त झाल्याने तो शहराच्या मानात तुरा खोवला गेला आहे. जागतिक कौशल्य दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप पॅरामेडीकल कॉलेजच्या विद्यार्थीनींचा मंत्री आठवले आणि लोढा यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या…
