अजितदादा गटाला पिंपरी चिंचवडमध्ये खिंडार, फुटणाऱ्या 28 जणांची यादी समोर; लोकसभेनंतर घडामोडींना वेग

पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह तब्बल 28 लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. यावेळी शहराध्यक्ष तुषार कामठे, रविकांत वर्पे, सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार प्रशांत सपकाळ, सुलक्षणा शीलवंत, विशाल जाधव, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ओबीसी विभाग उपस्थित होते.
प्रवेश केलेल्या मान्यवरांची नावे पुढीलप्रमाणे – माजी महापौर हणमंतरावजी भोसले, माजी महापौर वैशाली घोडेकर, माजी नगरसेवक पंकज भालेकर, माजी नगरसेवक प्रवीण भालेकर, माजी नगरसेविका संगीता ताम्हाणे, दिवंगत नगरसेविका पौर्णिमा सोनवणे यांचे पती रवी सोनवणे, दिवंगत नगरसेवक दत्ता काका साने यांचे पुत्र यश साने (आजी आजारी असल्यामुळे उपस्थित राहिले नाहीत) माजी नगरसेवक संजय नेवाळे, माजी नगरसेवक वसंत बोराटे, माजी नगरसेवक विजया तापकीर, शहर जिल्हा कार्याध्यक्ष मा विरोधी पक्षनेते राहुल भोसले, माजी नगरसेवक समीर मासुळकर, माजी नगरसेवक गीता मंचरकर, माजी नगरसेवक संजय वाबळे, माजी नगरसेविका वैशाली उबाळे, शुभांगी बोराडे, विनया तापकीर, माजी नगरसेविका अनुराधा गोफने, माजी नगरसेवक घनश्याम खेडेकर, युवक राष्ट्रवादी भोसरी विधानसभा अध्यक्ष सागर बोराटे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती निवृत्ती मामा शिंदे, माजी नगरसेवक तानाजी खाडे, माजी नगरसेवक शशिकीरण गवळी, विशाल आहेर, युवराज पवार कामगार आघाडी, विशाल आहेर सरचिटणीस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा, नंदूतात्या शिंदे शरद भालेकर
यामध्ये माजी आमदार विलास लांडे व त्यांचे पुत्र माजी नगरसेवक विक्रांत लांडे यांची मात्र हजेरी दिसून आली नाही. लांडे हे राज्याबाहेर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.









