डेंग्यू मुक्त शहर करण्यासाठी योग्य उपाययोजना करा – नाना काटे
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहरात झपाट्याने वाढणाऱ्या डेंग्यू आजाराबाबत योग्य उपयोजना तसेच डेंग्यू मुक्त शहर करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आयुक्तांकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पावसाळा सुरू आहे शहरात साथीच्या आजाराने रुग्ण वाढत असून अशातच शहरात डेंगू रुग्णांची संख्या देखील वाढत असून याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
आयुक्तांनी शहरात अनेक सार्वजनिक, वैयक्तिक ठिकाणी, झाडाची कुंडी, पाळीव प्राण्यांसाठी ठेवण्यात आलेली भांडी, टायर, मोकळे डब्बे, आदी ठिकाणी पाणी साठवले जातेय त्या साठवलेल्या पाण्यात डेंगू डासउत्पत्ती वाढत असून, संबंधित याकडे दुर्लक्ष करीत असून, या हलगर्जीपणामुळे शहरातील डेंगू रुग्णाची संखेत झपाट्याने वाढ होत असून , याचा परिणाम म्हणून आपल्या आरोग्य यंत्रणेवर होत असून, पर्यायी रुग्णांना उपचारासाठी महापालिकेच्या रुग्णालयात बेड, व औषध उपलब्ध होत नसून नागरिकांना या नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे , तसेच शहरातील महापालिकेच्या रुग्णालयात औषधाचा देखील तुटवडा भासत आहे, हि खूप गंभीर बाब असून, पाण्याची साठवणूक करून योग्य ती काळजी न करणाऱ्या व नियम न पाळणाऱ्यावर योग ती कडक कारवाई कारवाई करण्यात यावी.
शहरातील डेंगू बाधित रुग्णाची वाढती संख्या पाहता, आपल्या आरोग्य यंत्रणेची परीस्थितीचे व आजाराचे गांभीर्य पाहता यावर लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात व शहरातील डेंगू या आजारावर उपचार करण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्याचे आदेश देण्यात यावे तसेच विविध आस्थापनांची तपासणी करून डासोत्पत्ती स्थळे नष्ट करण्याचे सूचित करण्यात यावे तसेच या डेंगू बाधित रुग्णांवर शहरातील महापालिकेच्या रुग्णालयात मोफत उपचार करून देण्यात यावे , असेही निवेदनात म्हटले आहे.