Author: maharashtrabreakingnews.com

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ” ढोल आभाळान व्हावं अनं वीजा टाळकरी , मनोरमच्या पालखीचे आम्ही वारकरी ,आम्ही वारकरी”औचित्य आहे खास मनोरम शाळेच्या पालखी सोहळ्याचं…. केतकर आजी व केतकर बाई यांच्या संस्काराच्या जडणघडणीचं आणखी एक मौल्यवान देणं ….जे आपल्या आजच्या आनंदाचा एक महत्त्वाचा भाग आहे .दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील’ मनोरमचा पालखी सोहळा ‘जोरदार साजरा होताना दिसला. शाळेतील सर्व विद्यार्थी पारंपारिक वारकरी वेशात आली होती…विठ्ठल रखुमाई ,कोणी संत,कोणी टाळ घेऊन तर कोणी खांद्यावर पताका घेऊन वारकरी वेशात छान तयार होऊन आनंदाने व भक्तीच्या वातावरणात रंगून गेलेले दिसत होते. आजच्या पालखी सोहळ्यासाठी मान्यवर मा.श्री .नगरसेवक सुरेशजी भोईर,संस्थेचे अध्यक्ष केतकर सर ,कार्यवाह सौ.स्वरा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आषाढी एकादशीनिमित्त जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूल, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त सांगवीतून काढलेल्या दिंडीने सांगवी परिसर विठ्ठलमय झाला. टाळ, मृदुंग, ढोल, ताशांचा गजर व विठुरायाच्या नामघोषात बाल वारकरी तल्लीन झाले होते. विद्यार्थ्यांनी पारंपरिक रिंगण, भक्तिगीते, हरिपाठ, अभंग सादर केले. तसेच टाळ मृदुंगाच्या गजरात ‘पाऊले चालती.. पंढरीची वाट’, असे म्हणत विद्यार्थ्यांनी दिंडीचा अनुभव घेतला. संस्थेच्या अध्यक्षा आरती राव व सचिव प्रणव राव यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाईच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बाल वारकऱ्यांसोबत या वारीत संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, लिटल फ्लॉवरच्या मुख्याध्यापिका नीलम पवार,…

Read More

 पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरात लघुउद्योजकांना महावितरण विषयी येणाऱ्या विविध अडचणी या विषयी महावितरण अधिकारी व पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे पदाधिकारी व लघुउद्योजक यांच्याबरोबर भोसरी महावितरण कार्यालयात बैठक पार पडली.       या बैठकीस पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, संचालक नवनाथ वायाळ, प्रमोद राणे, स्विकृत संचालक विकास नाईकरे, दिनकर साळुंखे व लघुउद्योजक तसेच महावितरण तर्फे महावितरण कार्यालय गणेशखिंडचे अधिक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड, भोसरी महावितरण कार्यालयाचे कार्यकारी अभियंता अतुल देवकर, उपकार्यकारी अभियंता अशोक जाधव, सोमनाथ माने, सहाय्यक अभियंता दिवटे, सिंग, देशपांडे मेडम, हुलसुलवार, खलानी हे उपस्थित होते. महावितरण अधिक्षक अभियंता यांनी संघटनचे पदाधिकारी यांचेकडून औद्योगिक परिसरातील…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मातंग समाजाची गेली कित्येक दिवसांच्या मागणी महायुती सरकारने पूर्ण केली आहे.   बार्टीच्या धर्तीवर आर्टि ची स्थापना करून मातंग समजातील उपेक्षित घटकांना एक नवी संजीवनी देण्याचे कार्य या महायुती सरकारने केले असून यापुढे मातंग समाजातील युवक,युवती  भविष्यात IAS, कलेक्टर, झालेले आपल्याला नक्की दिसतील असे विधान परिषद आमदार अमित गोरखे यांनी म्हटले आहे ,तसेच या महायुती सरकारचे आभार मानले व संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाज महायुती सरकारच्या पाठीशी खंबीरपणे राहील अशी या निमित्ताने ग्वाही दिली आहे.. शिक्षणा पासून वंचित होत चाललेला समाज आर्टि च्या माध्यमातून पुन्हा एकदा सुशिक्षित होईल. आर्टि ची स्थापना हा मातंग समाजातील एक महत्त्वाचा…

Read More

आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर आकुर्डी पुणे 35 शाळेमध्ये बाल वारकऱ्यांची दिंडी सोहळा उत्साहात साजरा झाला. नवनगर शिक्षण मंडळाचे संस्थापक  दाभाडे सर तसेच प्रभारी मुख्याध्यापक माननीय श्री अमोल गुंड सर शिक्षिका नवले मॅडम,जंगले मॅडम, नयना मॅडम, युगंधरा पाटील मॅडम,श्री कोळपसर,श्री जाधव सर इयत्ता तिसरी व चौथीचे सर्व विद्यार्थी व तेथील ग्रामस्थ यांनी मिळून आषाढी एकादशी चा कार्यक्रम उत्साह साजरा केला.

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्रातील पशुधन वाचविण्यासाठी गोमाता व पशुधन सुरक्षित ठेवणाऱ्या गोशाळा, पांजरपोळ यांसारख्या संस्थांना राज्य शासनामार्फत अनुदान देण्यात यावे, अशी मागणी समस्त महाजन या संस्थेचे महाराष्ट्र राज्यातील १०८६ गोशाळांचे समन्वयक रमेशभाई ओसवाल यांच्याशी झालेल्या चर्चे उपरांत पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “महाराष्ट्रातील पशुधन वाचवण्यासाठी शासनाकडून आजमितीस आर्थिक मदतीची कोणतीही तरतूद नाही. पशुधनाच्या संरक्षणासाठी अतिरिक्त संसाधनांची नितांत आवश्यकता आहे. महाराष्ट्रातील १ हजार ६५ गोशाळा, पांजरापोळच्या माध्यमातून एक लाखांहून अधिक गोमाता व पशुधन सुरक्षित ठेवले जात असले तरी मोठ्या संख्येने पशुधन…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी महापालिकेच्या वतीने आजपासून ऑफलाईन अर्ज स्वीकृती प्राक्रियेला सुरुवात करण्यात आली असून सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या ठिकाणी ऑफलाईन अर्ज स्वीकृती केंद्र स्थापित करण्यात आले आहेत.  पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण भरलेला अर्ज या केंद्रांवर सादर करावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले आहे. राज्य शासनाच्या वतीने महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी  ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’  ही महत्वकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यासाठी शासनाच्या वतीने ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेच्या सुविधा केंद्रांवर पात्र लाभार्थ्यांची गर्दी होऊ नये, तसेच नागरिकांचा वेळ…

Read More

ऑफलाईन आणि ऑनलाईन सुविधा उपलब्ध पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील नवीन, वाढीव अशा मालमत्तांचे अत्याधुनिक ड्रोनच्या सहाय्याने सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात आढळलेल्या मालमत्ता धारकांना विशेष नोटीसही तत्काळ देण्यात येत आहे. ज्या मालमत्ता धारकांचे कर आकारणीबाबत हरकत, आक्षेप असतील, अशा मालमत्ता धारकांच्या सुनावणीसाठी शहरातील विविध भागात सात ठिकाणी सर्व सुविधांयुक्त केंद्र निश्चित केली आहेत. ऑफलाईनसह  ऑनलाईनचीही यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सध्यस्थितीत 6 लाख 30 हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत. मात्र त्यानंतरही शहर परिसरात नोंदणी नसलेल्या सुमारे दोन लाख नवीन आणि वाढीव बांधकाम असलेल्या मालमत्ता आढळण्याचा महापालिका प्रशासनाचा अंदाज आहे. त्यामुळेच आयुक्त…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने पंढरीनगरीत जमतात. तसेच महाराष्ट्रातील गावोगावी देखील विविध मंदिरांमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी भक्तिभावाने भाविक गर्दी करत असतात. दिनेश यादव यांनी आजच्या आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी सर्व भाविक भक्तांना, वारकरी बांधवांना शुभेच्छा दिल्या. आमदार श्री पै महेशदादा लांडगे युवा मंच व वै ह भ प वामनमहाराज यादव ,कै नथु खंडु यादव,कै बबाबाई नथु यादव,कै सुदाम नथु यादव, गुलाब नथु यादव सेवा संस्था याच्या वतीने कुदळवाडीत पवित्र अशा श्री विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्ताने खिचडी व फराळ वाटप करण्यात आले, यावेळी सर्व पदाधिकारी सर्व…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विठुनामाची  शाळा  भरली || प्रसन्न झाला विठू सावळा || विठुराया आणि आषाढीचे महत्व सगळ्या विद्यार्थ्यांना समजावे या उद्देशाने चॅलेंजर पब्लिक स्कूल,पिंपळे सौदागर येथे १६ जुलै २०२४ रोजी आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. शाळेच्या पटांगणात ज्ञानोबा माऊलींच्या गजरात विलोभनीय दिंडी सोहळा साजरा करण्यात आला. विठ्ठल-रखुमाई, वारकऱ्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी हाती टाळ घेत विठ्ठलनामाचा जयघोष करत शिवमंदिरापर्यंत दिंडी काढली. हातातील टाळ-चिपळ्यांचा गजर, मुखी विठ्ठलनाम यामुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते. विठ्ठल-रखुमाईच्या विधिवत पूजनानंतर विद्यार्थ्यांनी अभंग सादर केले. इयत्ता चौथी मधील विद्यार्थी वेद सावंतने ‘केशवा माधवा हा अभंग पेटी वाजवून सादर केला. पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी तुकाराम महाराजांवर नाटक…

Read More