मनोरम शाळेत पालखी सोहळा संपन्न
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ” ढोल आभाळान व्हावं अनं वीजा टाळकरी , मनोरमच्या पालखीचे आम्ही वारकरी ,आम्ही वारकरी”औचित्य आहे खास मनोरम शाळेच्या पालखी सोहळ्याचं…. केतकर आजी व केतकर बाई यांच्या संस्काराच्या जडणघडणीचं आणखी एक मौल्यवान देणं ….जे आपल्या आजच्या आनंदाचा एक महत्त्वाचा भाग आहे .दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील’ मनोरमचा पालखी सोहळा ‘जोरदार साजरा होताना दिसला.
शाळेतील सर्व विद्यार्थी पारंपारिक वारकरी वेशात आली होती…विठ्ठल रखुमाई ,कोणी संत,कोणी टाळ घेऊन तर कोणी खांद्यावर पताका घेऊन वारकरी वेशात छान तयार होऊन आनंदाने व भक्तीच्या वातावरणात रंगून गेलेले दिसत होते.
आजच्या पालखी सोहळ्यासाठी मान्यवर मा.श्री .नगरसेवक सुरेशजी भोईर,संस्थेचे अध्यक्ष केतकर सर ,कार्यवाह सौ.स्वरा ताई, प्राथमिक विभाग मुख्या.सौ. सोनाली बाई, माध्यमिक विभाग सौ. प्रियंका बाई, शिक्षकवृंद ,शिक्षकेतर कर्मचारी व सर्व पालक प्रतिनिधी हे देखील अतिशय उत्साहाने सहभागी झालेले दिसून आले.
पालखी सोहळ्यात इ.१ ली ते इ.10 वी चे सर्व विद्यार्थी टाळ पथक, ढोल लेझीम पथक ,पताका घेऊन सर्व बालवारकरी विठ्ठलाच्या नामघोषात सहभागी झाले होते.
अशाप्रकारे मनोरम शाळेची पालखी अतिशय उत्साहात आनंदात व भक्तिमय वातावरणात पार पडली.