ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील फिडरची लांबी कमी करण्याची पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेची मागणी

Spread the love

 पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरात लघुउद्योजकांना महावितरण विषयी येणाऱ्या विविध अडचणी या विषयी महावितरण अधिकारी व पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे पदाधिकारी व लघुउद्योजक यांच्याबरोबर भोसरी महावितरण कार्यालयात बैठक पार पडली.

      या बैठकीस पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, संचालक नवनाथ वायाळ, प्रमोद राणे, स्विकृत संचालक विकास नाईकरे, दिनकर साळुंखे व लघुउद्योजक तसेच महावितरण तर्फे महावितरण कार्यालय गणेशखिंडचे अधिक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड, भोसरी महावितरण कार्यालयाचे कार्यकारी अभियंता अतुल देवकर, उपकार्यकारी अभियंता अशोक जाधव, सोमनाथ माने, सहाय्यक अभियंता दिवटे, सिंग, देशपांडे मेडम, हुलसुलवार, खलानी हे उपस्थित होते.

महावितरण अधिक्षक अभियंता यांनी संघटनचे पदाधिकारी यांचेकडून औद्योगिक परिसरातील अडचणी समजून घेतल्या तसेच महावितरणच्या सर्व उपकार्यकारी अभियंता व सहाय्यक अभियंता याना अखंडित वीज पुरवठा सुरु ठेवण्यासाठी कोणकोणत्या अडचणी येतात याची माहिती घेतली त्यावर पुढीलप्रमाणे उपाय सुचविले.

 

१. पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील ९६ फिडरला टच होणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटण्याचे    

  काम करणे व इतर क्रीमिंग वगैरे कामे करणे.

२. एजन्सीज वाढवून ३६०० Transformer चे रिपेरिगचे  काम करणे  व  ऑईल  बदलणे.

३. Transformer ला कंपाऊंड करून झाडे वाढू नये म्हणून Inter Loking ब्लॉक चे फ्लोरिंग करणे   

    व Transformer जवळ कचरा टाकतात त्यासाठी व केबल डेमेज होवू नये म्हणून  

    महानगरपालिकेकडे पाठपुरावा करून बैठक घेणे.

४. जाधववाडी व कुदळवाडी १५ किमी.फिडलचे विभाजन करण्यासाठी केबल उपलब्ध करणे व इतर

   फिडरची लांबी कमी करणे.

५. सेंच्युरी एन्का ५० MV Transformer साठी महापारेषणकडे पाठ पुरावा व सफारी पार्क सबस्टेशनकरिता महानगरपालिकेकडे नाहरकत दाखल्याकरिता पाठपुरावा करणे.

६. केनबे चौक प्लॉट १३,१४,१५ स्विचिंग स्टेशनसाठी MIDC कडे पाठपुरावा तसेच नक्षत्रम आयलंड  

   नाशिक रोड स्विचिंग स्टेशन, B.U.Bhandari २२/११ सबस्टेशन पाठपुरावा करणे.

७. उपकार्यकारी अभियंता व सहाय्यक अभियंता यांचेवरील अतिरिक्त कार्यभार कमी करून  विविध ठिकाणी नवीन अभियंते यांची नेमणूक करणे.वरील सर्व अडचणीवर मात करणेसाठी सर्व अभियंत्यांना टेक्निकल माहित देवून कार्यकारी अभियंत्याला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन अधिक्षक अभियंत्यांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button