Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे जिल्ह्यातील महावितरणच्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी मुख्य व्यवस्थापकीय संचालकांनी पिंपरी चिंचवड इलेक्ट्रिकल असोसिएशनला पाचारण केले होते.त्यानुसार संघटनेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी मुंबईत जाऊन महावितरणचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आदरणीय लोकेश चंद्र यांची भेट घेऊन विभिन्न विषयांबाबत चर्चा केली.यावेळी सगळ्या समस्या सोडविण्याचे आश्वासन मुख्य व्यवस्थापकीय संचालकांनी दिले आहे,त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या समस्या वेळेत सोडविण्यासाठी मदत होणार आहे. पुणे जिल्ह्यात वेगवेगळे नियम लावत ग्राहक आणि ठेकेदारांना वेठिला धरले जात असल्याची बाब यावेळी निदर्शनास आणून दिली. सर्वसमान नियम लावण्याबाबत सूचना देण्याचे आश्वासन यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी दिले. महावितरणचा ऑनलाईन पोर्टल हा नाममात्र असून आजही सगळी कागदपत्रे जमा करण्याची सक्ती कार्यालयांकडून केली…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कडून  मयूर जयस्वाल यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या हस्ते देण्यात आले. मयूर जयस्वाल हे मागच्या पंधरा वर्षापासून काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, या आधी ते चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस ,सोशल मीडियाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर कार्यरत होते. मयूर जयस्वाल यांच्या निवडीने अनेक जुने – नवीन कार्यकर्ते पक्ष संघटनेमध्ये येतील व कार्यरत राहतील चिंचवड मधील अनुभवी कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली आहे. यावेळी मयूर जयस्वाल यांनी प्रतिक्रिया देत सर्व वरिष्ठांचे आभार मानत आगामी…

Read More

शहर सरचिटणीस सजी वर्की आणि युवकचे प्रदेश सचिव चंद्रशेखर जाधव यांनी केले आयोजन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. यामध्ये महिलांना दर महिन्याला १५०० रूपये मिळणार आहेत. याच पार्श्भूमीवर काळेवाडी प्रभागात पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे सरचिटणीस सजी वर्की आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव यांच्या वतीने नोंदणी फॉर्म निशुल्क भरण्याचे त्याचबरोबर नव मतदारांची मतदार नोंदणी करण्याच्या अभियानाचा शुभारंभ आज (गुरुवारी) करण्यात आला आहे. १८ जुलै ते २१ जुलै या दरम्यान चार दिवस हे अभियान काळेवाडी, विजयनगर येथील संत निरंकारी भवन शेजारी असलेल्या सजी वर्की यांच्या जनसंपर्क कार्यालय याठिकाणी…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार, कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र,नॅशनलिस्ट ट्रेड युनियन फेडरेशन तर्फे आज चिंचवड येथील कार्यालयामध्ये अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी संघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते, सचिव तुषार घाटूळे, सलीम डांगे,ओमप्रकाश मोरया,चंद्रकांत कुंभार, अनिल जाधव,विद्या सोनवणे, अंजना कांबळे आदी कामगार बांधव उपस्थित होते. यावेळी नखाचे म्हणाले की अण्णाभाऊ कापड गिरणीतही काम केले.१९३४ चा मुंबईत लाल बावटा गिरणी कामगार युनियनच्या नेतृत्त्वाखाली ऐतिहासिक संप झाला.त्या संपात ते कामगार म्हणून प्रत्यक्ष सहभागी होते.त्या संपात शिवडी परिसरात कामगार व पोलिसात जी आंदोलनात झटापट-चकमक झाली,त्याचेही ते साक्षीदार होते.तो संप गिरणी कामगारांच्या लढ्यातील शहीद…

Read More

कासारवाडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कासारवाडी येथील श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने यावर्षी 2024 चा चातुर्मास उपप्रवर्तिनी प पु बसंतकवरजी म सा यांच्या सुशिष्या प पू मंगलप्रभाजी म सा, प पू डॉ मधुस्मिताजी म.सा., प पू हर्षिताजी म सा, प पू दिव्यांशीजी म सा यांचा चातुर्मास प्रवेश समारंभ उत्साहात आणि अतिशय मंगलमय वातावरणात संपन्न झाला. प्रवेशाची भव्य मिरवणूक कासारवाडी येथील श्री नमिनाथ जैन मंदिरापासून निघाली. या मिरवणुकीमध्ये अग्रभागी आचार्य आनंदऋषीजी स्कूलचे विद्यार्थी, त्यामागे सुशील बहु मंडळ,तसेच महिला मंडळ त्यामागे सर्व महासतीजी आणि नंतर सर्व श्रावक बंधू आणि युवा साथी अशी भव्य मिरवणूक जैन स्थानकामध्ये आली. त्या ठिकाणी…

Read More

येत्या निवडणुकीत तीनही विधानसभांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणणार – शहराध्यक्ष तुषार कामठे पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य विजयी संकल्प मेळाव्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.  शनिवारी दि.२० जुलै २०२४ रोजी शहराच्या मध्यवर्ती भागात नवमहाराष्ट्र महाविद्यालय पिंपरीगाव या ठिकाणी सायंकाळी ठीक ४ वाजता या भव्य विजयी संकल्प मेळाव्याचे आयोजन केले आहे. पावसाळ्याच्या दिवसांमुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी कार्यक्रमस्थळी भव्य असा वॉटरप्रूफ सभामंडप उभारण्यात आला आहे. शिवाय १२ ते १५ हजार नागरिकांच्या बसण्याची व्यवस्थाही करण्यात आली असल्याची…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाचे शहराध्यक्षांसह काही नगरसेवक शरद पवारांच्या गटात दाखल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने गुरुवारी पिंपरी चिंचवड मधील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. मते जाणून घेतली. शहरातील प्रश्न सोडवणार असल्याचे आश्वासन दिले. लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत इन्कमिंगला सुरुवात झाली आहे. तर महायुती मधील घटक पक्ष अस्वस्थ आहेत. पिंपरी चिंचवड मधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह काही पदाधिकारी यांनी कालच शरद पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडणार अशी चर्चा रंगू लागली. ही बाब अजित पवार यांनी गांभीर्याने घेतली आहे, त्यामुळे पुण्यात गुरुवारी सकाळी तातडीची बैठक घेतली. यावेळी…

Read More

– परिसरातील सुमारे १५ हजार सदनिकाधारकांना दिलासा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चोविसावाडी-चऱ्होली येथील प्रस्तावित घनकचरा स्थानांतरण केंद्र रद्द करुन, अन्य ठिकाणी स्थलांतरीत करण्याचा मोठा निर्णय महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी घेतला. या परिसरात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प निर्माण झाले असून, नागरिकांना त्रास होवू नये. या करिता हा निर्णय घेतल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. त्यामुळे सुमारे १५ हजार सदनिकाधारकांना दिलासा मिळाला आहे. भोसरी विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे यांनी सोसायटी फेडरेशन आणि स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार, प्रस्तावित घनकचरा स्थानांतरण केंद्र (कचरा ट्रान्फर स्ट्रेशन) रद्द करावे. यासाठी महापालिका प्रशासन व राज्य सरकारकडे मागणी केली होती. त्याला यश मिळाले…

Read More

‘लाडकी बहिणी आणि लाडका भाऊ’ ही योजनाच मुळात फसवी महायुती सरकारचा कावेबाजपणा लोकांसमोर उघडकीस शिवसेना शहर संघटक संतोष सौदणकर यांची खरमरीत टीका पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महायुती सरकारची ‘लाडकी बहिणी आणि लाडका भाऊ’ ही योजनाच मुळात फसवी आहे. केवळ विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा ‘चुनावी जुमला’ लोकांसमोर पेश केला आहे. आजपर्यंत महायुती सरकारच्या जवळपास सर्वच योजना म्हणजे गाजरांचाच पाऊस आहेत. गाजरासारख्याच त्या वाजतात आणि मोडून फेकल्या जातात. ही योजना देखील महायुती सरकारची टाकाऊ योजना असून लोकांनी भ्रमित न होता त्यातील बारकावे शोधावेत. म्हणजे कळेल महायुती सरकारचा ‘आईजीच्या जीवावर बायजी कसा उधार’ हा उफरटा कारभार. महायुती…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  निगडीतील (सेक्टर २२) एसआरए प्रकल्पाच्या नावाखाली बांधकाम व्यावसायिक काही स्थानिक गुंडांना हाताशी धरून जबरदस्तीने झोपड्यांचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचाआरोप करत शहर भाजपाचे चिटणीस सचिन काळभोर यांनी आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे. शनिवारी (दि. २०) निगडीतील अंकुश चौकात ठिय्या आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत काळभोर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, गेल्या कित्येक वर्षांपासून निगडीतील सेक्टर २२ मधील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचा विषय प्रलंबित होता. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी मार्च महिन्यात परिसराचे सर्वेक्षण केले होते. येथील आझाद चौक झोपडपट्टी, श्रमिकनगर, संग्रामनगर, दळवीनगर या भागाचा त्यात समावेश होता. नागरिकांना एसआरए प्रकल्पांतर्गत…

Read More