लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिवादन
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार, कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र,नॅशनलिस्ट ट्रेड युनियन फेडरेशन तर्फे आज चिंचवड येथील कार्यालयामध्ये अभिवादन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी संघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते, सचिव तुषार घाटूळे, सलीम डांगे,ओमप्रकाश मोरया,चंद्रकांत कुंभार, अनिल जाधव,विद्या सोनवणे, अंजना कांबळे आदी कामगार बांधव उपस्थित होते.
यावेळी नखाचे म्हणाले की अण्णाभाऊ कापड गिरणीतही काम केले.१९३४ चा मुंबईत लाल बावटा गिरणी कामगार युनियनच्या नेतृत्त्वाखाली ऐतिहासिक संप झाला.त्या संपात ते कामगार म्हणून प्रत्यक्ष सहभागी होते.त्या संपात शिवडी परिसरात कामगार व पोलिसात जी आंदोलनात झटापट-चकमक झाली,त्याचेही ते साक्षीदार होते.तो संप गिरणी कामगारांच्या लढ्यातील शहीद आणि संघर्ष यातून ते कामगार चळवळीकडे आकर्षित झाले.परंतु त्यांचा कम्युनिस्ट चळवळीशी प्रत्यक्ष संबंध ते जेव्हा १९३५-३६ या काळात मुंबईतील धारावी जवळील “माटुंगा लेबर कॅम्प” या कामगारांच्या झोपडपट्टीवजा वस्तीत रहायला गेले तेव्हा आला. आणि कामगारांचे जीवन उज्वल करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.