- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पार्टी , पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) आणि भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या पुढाकाराने , कुंदा संजय भिसे यांच्या भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय पिंपळे सौदागर येथे पिंपळे सौदागर प्रभागातील आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या मोफत आरोग्य शिबिरात , जर्मन टेक्नॉलॉजी मशीनच्या साह्याने आरोग्य तपासणी व तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरात , जनरल तपासणी व आणि उपचार , डायबिटीस तपासणी आणि उपचार , कॅन्सर स्कॅनिंग तपासणी , ओरल कॅन्सर तपासणी व सल्ला , ब्लड प्रेशर तपासणी आणि उपचार, डोळे तपासणी साथीचे आजार आवश्यक रक्त तपासणी सल्ला आणि उपचार यासंबंधी…
सामाजिक उपक्रमांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार याचा वाढदिवस साजरा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार याचा वाढदिवस शत्रुघ्न (बापु) काटे युथ फाउंडेशन मार्फत प्रभागात सामाजिक उपक्रम घेत साजरा करण्यात आला. यावेळी प्रभागातील स्वच्छता कर्मचारी तसेच कचरा वेचक यांना मोफत रेनकोट वाटप करण्यात आले. पिंपळे सौदागरला स्मार्ट सिटी स्वच्छ सिटी बनवण्यात महत्वाची भूमिका बजावणारा घटक म्हणजे सफाई कर्मचारी. ऊन असो पाऊस असो किंवा थंडी,अविरत आपला कर्तव्य बजावणारा घटक म्हणजे सफाई कर्मचारी. साफसफाई कर्मचारी आपल्या परिसरातील सार्वजनिक रस्ते , स्वच्छतागृह ,ड्रेनेजची प्रामुख्याने स्वच्छता करतात.त्यामुळे आपला परिसर व सोसायटी घाणीपासून व दुर्गंधी पासून मुक्त होण्यास…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरामधील दापोडी येथील पाणीपुरवठा गुरुवार २५ जुलै २०२४ रोजी सकाळी १० ते रात्री १० पर्यंत बंद राहणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी शुक्रवार २६ जुलै २०२४ रोजी दापोडीमधील सर्व भागात होणारा सकाळचा पाणीपुरवठा अनियमीत व कमी दाबाने होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता अजय सुर्यवंशी यांनी दिली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील पिंपळे गुरव ते दापोडीला जोडणाऱ्या पुलावरील ग्रॅव्हीटी पाईपलाईनचे पाणीपुरवठा विषयक अत्यावश्यक कामकाज करणे गरजेचे असल्यामुळे गुरुवार २५ जुलै २०२४ रोजी पिंपरी चिंचवड शहरामधील मौजे दापोडी गावचा पाणीपुरवठा सकाळी बंद राहणार आहे. तसेच दुरुस्तीच्या कामासाठी दापोडी परीसरातील सर्व पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवल्यामुळे…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “शिक्षकाचा आवाज हा मातृत्वाचा आवाज असतो!” असे विचार ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी चिंचवड येथे व्यक्त केले. गुरुपौर्णिमेनिमित्त कलारंजन प्रतिष्ठान, नवी सांगवी आयोजित गुरुगौरव विशेष पुरस्कार प्रदान आणि गुरुजन सन्मान सोहळ्यात गिरीश प्रभुणे बोलत होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे, कोल्हापूर येथील माजी शिक्षण सहसंचालक मकरंद गोंधळी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत चौगुले यांची व्यासपीठावर तसेच ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक, तानाजी एकोंडे, शाहीर आसराम कसबे, नटराज जगताप, डॉ. हेमलता सोळवंडे यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती. याप्रसंगी निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मीना दीक्षित आणि…
पिंपळे सौदागर येथे कुंदन इस्टेट सोसायटीत आज शितल नाना काटे यांच्या हस्ते सोलर पॅनल सिस्टीमचे उद्घाटन
पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर येथील कुंदन इस्टेट सोसायटीत आज शितल नाना काटे यांच्या हस्ते सोलर पॅनल सिस्टीमचे उद्घाटन करण्यात आले. पिंपळे सौदागर मधील मोठ्या सोसायट्या पैकी कुंदन इस्टेट सोसायटी एक आहे. येथे जवळपास १७० सदनिका आहेत या सोलर इनर्जी नार्फ ८किलो vat वीज निर्मीत केली जाणार आसुन. त्यामुळे सोसायटीला येणाऱ्या महावितरणच्या बिलामध्ये बऱ्याच प्रमाणात बचत होऊन रहिवाश्यांची आर्थिक बचत होणार आहे. हे सोलर सिस्टीम बसविण्याचे काम अदानी सोलर पावर तर्फे मे.नेचर लाईल इनर्जी सोल्युशन्स या कंपनीमार्फत करण्यात आले. यावेळी कुंदन इस्टेट सोसायटीचे कमिटी मेंबर चेअरमन रिशी पाटील, श्री. डोईजड, श्री. नायर, श्री. बंडेवार, श्री. कामदे, सौ.…
विद्यार्थ्यांना होणार अनेक फायदे; युजीसीकडूनही कौतुकाची थाप पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) वतीने तयार करण्यात आलेल्या आधार क्रमांका इतक्याच महत्वाच्या ॲकॅडमिक बँक ऑफ क्रेडीट (एबीसी) क्रमांकांच्या नोंदणीत येथील एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाने राज्यातील खासगी विद्यापीठांच्या यादीत अव्वल क्रमांक पटकाविला आहे. आंतरविद्याशाखीय शिक्षण आणि ऐच्छिक विषयांतील श्रेयांकांच्या हस्तांतरासाठी हा आयडी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असून, त्यासाठीच युजीसीकडून विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपली नोंद करण्याचे आवाहन करण्यात आले होते. युजीसीच्या या आवाहनाला उत्तम रित्या प्रतिसाद देत एमआयटी एडीटी विद्यापीठाने तब्बल १५,५६६ हून अधिक खात्यांची नोंदणी तसेच त्यामध्ये २८,२०२ हून अधिक क्रेडिट्सचा अंतर्भाव करून राज्यातील खासगी विद्यापीठांच्या…
मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मुंबई येथे राजकीय व संघटनात्मक बैठकींसाठी विशेष उपस्थित असलेले अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, संघटनांचे राष्ट्रीय प्रभारी, माजी केंद्रीय मंत्री, खा.मा.श्री. के.सी.वेणुगोपाल यांची भेट घेतली आणि संघटनात्मक विषयांवार चर्चा केली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मा.खा.रमेश चेन्नीथला सर यांचीही भेट घेतली चर्चा केली, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष,आमदार श्री.नानाभाऊ पटोले यांचे हि मार्गदर्शन घेत संघटनात्मक बाबींवर चर्चा करून आगामी निवडणुकांच्या बाबतीमध्ये सुद्धा विचार जाणून घेतले, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सहप्रभारी मा.आ.सोनलजी पटेल यांची भेट घेत चर्चा केली मार्गदर्शन घेतले.
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकींग न्यूज) – सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम प्राथमिक व माध्यमिक स्कुल, भारतीय विद्यानिकेतन प्रशाला आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये गुरुपूजन आणि पालकांचे गुरुमंत्राच्या संगीतमय वातावरणात पाद्यपूजन करून गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. दरम्यान, विद्यार्थ्यांसाठी मराठी, हिंदी हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या अध्यक्षा आरती राव आणि सचिव प्रणव राव यांच्या हस्ते सरस्वती पूजन व वेद व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पिंकी मनिकम, लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम माध्यमिकच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, भारतीय विद्यानिकेतन प्रशालेच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य शीतल मोरे, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, पर्यवेक्षिका प्रिती पाटील,…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) — लायन्स क्लब ऑफ पुणे फीनिक्स (डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २ रिजन ३ झोन ४) च्या अध्यक्षपदी नंदिता देशपांडे यांची निवड करण्यात आली. साई मंगल बॅंक्वेट, संभाजीनगर, चिंचवड येथे शनिवार, दिनांक २० जुलै २०२४ रोजी प्रांतपाल एम जे एफ लायन प्रसाद पानवलकर यांनी जुलै २०२४ ते जून २०२५ या कालावधीसाठी नवनिर्वाचित कार्यकारिणीला सेवाकार्याची शपथ दिली. नूतन कार्यकारिणीमध्ये नंदिता देशपांडे (अध्यक्ष), प्रसाद दिवाण (उपाध्यक्ष), अनुजा करवडे (सचिव), विनायक केळकर (खजिनदार), दीपश्री प्रभू (जनसंपर्क अधिकारी) आणि प्रदीप कुलकर्णी, विनय देशपांडे, नरेंद्र प्रभू, मकरंद शाळिग्राम, उज्ज्वला कुलकर्णी, चेतन भालेराव यांचा संचालक म्हणून समावेश करण्यात आला आहे. उपप्रांतपाल राजेश आगरवाल,…
आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलगीतांची रंगली मैफील सावरकर मंडळ आणि अनुप मोरे फाऊंडेशनचा पुढाकार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘विठ्ठल नामाचा हो टाहो…’, ‘हरी भक्तीचा भुकेला…’, ‘अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर…’, ‘गोड तुझे रूप.. गोड तुझे नाम…’, अशा भक्तिगीतांमध्ये आकुर्डी, निगडी प्राधिकरणातील भाविकांना साक्षात पांडुरंगाच्या भक्तीची अनुभूती अनुभवायला मिळाली. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला आयोजित ‘विठ्ठल ठायी ठायी’ अर्थात ‘पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती’ या विठ्ठलगीतांच्या मैफलीत श्रोते भक्तिरसात तल्लीन झाले. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आणि अनुप मोरे सोशल ॲण्ड स्पोर्ट्स फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दिनांक १६ जुलै २०२४ रोजी निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात भक्तिगीतांचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पिंपरी -…
