ताज्या घडामोडीपिंपरी

प्रभागाला स्मार्ट सिटी स्वच्छ सिटी बनवण्यात महत्वाची भूमिका बजावणारे  कर्मचारी हे महत्वाचे घटक- शत्रुघ्न काटे

Spread the love

 

सामाजिक उपक्रमांनी  देवेंद्र फडणवीस  आणि  अजित पवार याचा वाढदिवस साजरा

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – आज राज्याचे उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस  आणि  अजितदादा पवार याचा वाढदिवस शत्रुघ्न (बापु) काटे युथ फाउंडेशन मार्फत प्रभागात सामाजिक उपक्रम घेत साजरा करण्यात आला. यावेळी प्रभागातील स्वच्छता कर्मचारी तसेच कचरा वेचक यांना मोफत रेनकोट वाटप करण्यात आले.
पिंपळे सौदागरला स्मार्ट सिटी स्वच्छ सिटी बनवण्यात महत्वाची भूमिका बजावणारा घटक म्हणजे सफाई कर्मचारी. ऊन असो पाऊस असो किंवा थंडी,अविरत आपला कर्तव्य बजावणारा घटक म्हणजे सफाई कर्मचारी.

साफसफाई कर्मचारी आपल्या परिसरातील सार्वजनिक रस्ते , स्वच्छतागृह ,ड्रेनेजची प्रामुख्याने स्वच्छता करतात.त्यामुळे आपला परिसर व सोसायटी घाणीपासून व दुर्गंधी पासून मुक्त होण्यास मदत होते व पर्यायाने रोगराईला आळा बसतो. महत्वाची बाब म्हणजे कोरोना सारख्या काळात संपूर्ण जग थांबले असताना सफाई कर्मचारी मात्र अहोरात प्रामाणिकपणे आपले काम करीत होते आणि आता राज्यात सर्वत्र पावसाळ्याचे आगमन झाले आहे. आपण कुठे सुंदर धबधब्याचा, निसर्गाचा हिरवेपणा यांचा आनंद लुटत असतो परंतु याच पावसामुळे सार्वजनिक जीवन कुठेही अस्तव्यस्त होऊ नये म्हणून हा सफाई कर्मचारी तुंबलेले रस्ते, नाले,गटारी साफ करीत आपलं कर्तव्य बजावत असतो. हे काम करीत असतांना त्यांच्या आरोग्याची खूप हेळसांड होत असते.त्यांच्या आरोग्य अबाधित राहण्यासाठी आवश्यक ती साधने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. ते निरोगी म्हणजे आपण/आपली सामाजिक व्यवस्था निरोगी राहील.

भर पावसात काम करणाऱ्या या सफाई कर्मचारीला पावसापासून संरक्षण मिळण्याच्या दृष्टीने नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी सर्व सफाई कर्मचारी यांना मोफत रेनकोट वाटप केले. यावेळी परिसरातील सर्व जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष्यांच्या हस्ते साधारण २५० सफाई कर्मचारी स्वच्छता कर्मचारी तसेच कचरा वेचक यांना रेनकोट वाटप करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button