अरविंद एज्युकेशन सोसायटीत गुरुपूजन आणि पालकांचे पाद्यपूजन करून गुरुपौर्णिमा साजरी
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकींग न्यूज) – सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम प्राथमिक व माध्यमिक स्कुल, भारतीय विद्यानिकेतन प्रशाला आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये गुरुपूजन आणि पालकांचे गुरुमंत्राच्या संगीतमय वातावरणात पाद्यपूजन करून गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. दरम्यान, विद्यार्थ्यांसाठी मराठी, हिंदी हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
संस्थेच्या अध्यक्षा आरती राव आणि सचिव प्रणव राव यांच्या हस्ते सरस्वती पूजन व वेद व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पिंकी मनिकम, लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम माध्यमिकच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, भारतीय विद्यानिकेतन प्रशालेच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य शीतल मोरे, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, पर्यवेक्षिका प्रिती पाटील, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूजनांचे व आई-वडिलांचे मोठ्या सन्मानाने पाद्यपूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले. या उपक्रमामुळे पालक भारावून गेले. विद्यार्थ्यांनी गुरूवंदना, ‘गुरूचे महत्त्व’ ही नाटिका सादर केली. विद्यार्थ्यांनी गुरुविषयी आपल्या मनोगताद्वारे आदरभाव व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी स्वतः पालकांचा सन्मान करण्यासाठी ‘सर्वश्रेष्ठ आई-बाबा’ ही सन्मानचिन्हे बनविली होती. मराठी, हिंदी या दोन्ही भाषेतील हस्ताक्षर स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी आपले हस्त कौशल्य दाखवून दिले.
आरती राव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, की निसर्ग अस्तित्व देतो व त्या अस्तित्वाला आकार देण्याचे कार्य गुरू करतात. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात गुरुचे स्थान खूप उच्च दर्जाचे व महत्त्वाचे आहे. गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा आहे, त्यांचा आदर करावा. तर प्रणव राव यांनी चांगले व वाईट अनुभव पारखण्याची दृष्टी गुरू देतो. प्रथम गुरु आपले आई वडील म्हणून त्यांचा नेहमीच मान राखला पाहिजे, अशा शब्दात विचार व्यक्त केले.
शिक्षिका प्रतिभा ओक, खुशबू तारळकर, सायली पवार, सीमा हवालदार, इशिता परमार, स्वप्ना जाणूनकर, तनुजा ववले, शिक्षिका स्वाती तोडकर, सोनिया गुरूंग, रीमा पटेल, लखवीर कौर, मंजुषा भाग्यवंत, नीलम सावंत यांनी गुरू पौर्णिमेचे महत्व विशद केले. पालकांनीही शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
सूत्रसंचालन शिक्षिका अमृता अमोलिक, स्वाती तोडकर, दीपा गायकवाड यांनी, तर आभार शिक्षिका सुमित्रा कुंभार यांनी मानले.