- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पूरग्रस्तांना ५० ह रुपयांची रोख मदत तातडीने द्या स्थायी समिती माजी अध्यक्षा सीमा सावळे, माजी नगरसेविका आशा शेंडगे यांची मागणी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पूरग्रस्तांचे तातडिने पंचनामे करून किमान ५० हजार रुपये रोख, महिन्याचे धान्य, दोन चादरी, दोन ब्लँकेट आणि मुलांना वह्या-पुस्तके मदत स्वरुपात लगेचच द्या, अशी मागणी पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे आणि माजी नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे यांनी केली आहे. महापालिका आयुक्त आणि हवेली अप्पर तहसिलदार यांना त्याबाबतचे लेखी निवेदन त्यांनी दिले. निवेदनात त्या म्हणतात, पिंपरी चिंचवड शहरात बुधवार, गुरूवार पूरपरिस्थिती होती. शहातील पवना, इंद्रायणी, मुळा नदीच्या किनाऱ्यावरच्या सर्व वस्त्यांमध्ये…
नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी नववनिर्वाचित आमदार अमित गोरखे महापालिका आयुक्तांच्या भेटीला पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंत्ती महोत्सव व्यापक स्वरुपात व्हावा ,राज्यातील नामवंत विचारवंत ,साहित्यिक व कलाकार यांचा समावेश झाला पाहिजे अशी मागणी महापालिका आयुक्त शेखर सिंग यांना नवनिर्वाचित आमदार अमित गोरखे यांनी केली आहे .जरवर्षी पिंपरी चिंचवड महापालिका लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंत्ती महोत्सव साजरा करीत असते त्या पाश्वभूमीवर नवनिर्वाचित आमदार अमित गोरखे यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंग यांची भेट घेतली .तसेच शहरातील नागरिकांच्या विविध प्रश्नांवरती पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्री शेखर सिंग यांची भेट घेतली. यावेळी शहरातील नागरिकांचे ,झोपडपट्टीतील विविध प्रश्न मोठ्या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ शहरातील प्रत्येक महिला लाभार्थ्याला घेता यावा यासाठी महापालिका स्तरावर सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. शहरात या योजनेचा प्रचार व प्रसिद्धी रिक्षांच्या माध्यमातून करण्यात येणार असून या उपक्रमाचा शुभारंभ आज आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपआयुक्त अण्णा बोदडे, लिपिक अभिजित डोळस, महापालिका कर्मचारी आणि रिक्षाचालक उपस्थित होते. मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रचार प्रसिद्धीसाठी महापालिकेच्या सर्व अधिकृत सोशल मिडीया हॅन्डल्स तसेच अधिकृत संकेतस्थळावर योजनेबद्दल सविस्तर माहिती देण्यात येत असून अर्ज करण्याच्या प्रक्रियेची देखील माहिती देण्यात आली आहे. शहरातील विविध ठिकाणी योजनेची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी माहितीदर्शक स्टँडीज, फ्लेक्स, बॅनर्स सर्व क्षेत्रीय कार्यालयअंतर्गत निश्चित केलेल्या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या उत्तम दर्जाच्या सेवा सुविधांमुळे वैद्यकीय सेवेत महाराष्ट्र राज्यात पिंपरी चिंचवड महापालिका दुसऱ्या क्रमांकावर आल्याबद्दल आयुक्त शेखर सिंह यांनी वैद्यकीय विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. ही बाब उल्लेखनीय असून नागरिकांना देण्यात येणाऱ्या दर्जेदार सेवांमध्ये वैद्यकीय विभागाने तप्तर राहून हा क्रम अग्रस्थानी न्यावा, असेही आयुक्त शेखर सिंह म्हणाले. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या वतीने राज्यातील सर्व महानगरपालिकांचे आरोग्य कार्यक्रमांतर्गत सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात बालक, कुटुंब नियोजन, डेंग्यू, एचआयव्ही आणि इतर आजारांबाबतचे कार्यक्रम राबविणे, महापालिकेकडून वैद्यकीय सेवेसाठी करण्यात येणारा वित्त पुरवठा तसेच रूग्णालये व दवाखान्यात रूग्णांवर करण्यात येणारे उपचार सेवा…
भोसरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपूला खालील अर्बन स्ट्रीटच्या अर्धवट स्थितीतील कामामुळे भोसरीतील एका नागरिकाचा नाहक मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अर्बन स्ट्रीटचे काम पाहणाऱ्या जबाबदार अधिकारी ठेकेदारांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी केली आहे. याबाबत उबाळे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात उबाळे यांनी म्हटले आहे की,भोसरी येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपूलाखालील अर्बन स्ट्रीटच्या अर्धवट स्थितीतील कामामुळे नागरी जीविताला धोका निर्माण झाला आहे. मोठा गाजावाजा करत भोसरी उड्डाणपुलाखाली अर्बन स्ट्रीटचे काम सुरू करण्यात आले. चार…
पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे ते बारामती या दरम्यान आयोजित सायकलिंग स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयातील तृतीय वर्ष वाणिज्य या वर्गातील सिद्धेश पाटील याने प्रथम क्रमांक मिळविला. सन २०२२,२०२३ व २०२४ या सलग तीन वर्षात सदर स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून त्यांनी हॅटट्रिक केली आहे. त्याच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर (डॉ.) माधव सरोदे, उपप्राचार्य डॉ. मृणालिनी शेखर, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. पांडुरंग लोहोटे, प्राध्यापक यांनी त्याचे अभिनंदन केले.
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – इंटरनॅशनल सोसायटी फॉर एज्युकेशनल लीडरशिप (आयएसईल) आणि एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय इंग्रजी साहित्य परिषदेचे २६ व २७ जुलै रोजी आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय साहित्य परिषदेद्वारे ‘Global Perspectives: Diverse Voices in English Literature’ या विषयावर संशोधक, लेखक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसह साहित्यीक विविधतेवर चर्चासत्रे आयोजित करण्यात येतील. चर्चासत्रांद्वारे साहित्याला कशाप्रकारे सीमारेषेची बंधने नसतात व ते जागतिक पातळीवर तंत्रज्ञानाद्वारे कशाप्रकारे प्रभाव पाडत आहे यावर प्रकाश टाकला जाईल. विद्यापीठात २६ व २७ जुलै २०२४ रोजी होणाऱ्या या परिषदेत इंग्रजी साहित्यीक, शिक्षक, संशोधक व साहित्य रसिकांनी भाग घ्यावा व…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अतिवृष्टीमुळे शहरातील विविध ठिकाणी जनजीवन विक्सळीत झाल्यानंतर नदीकाठच्या घरांमध्ये तसेच सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या होत्या. धोकादायक ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या सुमारे ४ हजार ५०० नागरिकांना महानगरपालिकेने सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले. रात्री उशीरापर्यंत बचावकार्य सुरू होते. पूर परिस्थिती निवळल्यानंतर रस्ता तसेच परिसरात साचलेला गाळसदृश कचऱ्याची महापालिकेच्या पथकाने संपुर्ण परिसर स्वच्छ केला आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली. ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील सम्राट चौक, लालटोपी नगर, भाटनगर, पिंपरी रिव्हर रोड, रामनगर, पत्राशेड लिंकरोड, बौद्धनगर आदी ठिकाणी बचावकार्य करण्यात आले असून सुमारे ८५० नागरिकांना भाटनगर पिंपरी शाळा, आंबेडकर कॉलनी, मेवाणी हॉल, निराधार…
पीसीयुच्या विद्यार्थ्यांना चित्रपट निर्मिती तंत्रज्ञान आत्मसात करण्याची संधी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चित्रपट क्षेत्रात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. पूर्वी चित्रपट निर्मितीचे प्रत्यक्ष कार्यानुभव घेण्यासाठी विद्यार्थ्यांना मुंबईला जावे लागत होते. परंतु, आता प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आटपाट’ ही चित्रपट निर्मिती संस्था पुण्यात स्थापन झाली आहे. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते वडगाव मावळ येथीलपिंपरी चिंचवड विद्यापीठ आणि आटपाट यांच्यातील सामंजस्य करारामुळे पीसीयुच्या विद्यार्थ्यांना चित्रपट निर्मितीचे प्रत्यक्ष काम, तंत्रज्ञान आत्मसात करण्याची संधी उपलब्ध झाली आहे, असे मत ‘आटपाट’ च्या सहसंस्थापक गार्गी कुलकर्णी यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (पीसीईटी) पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयु) आणि आटपाट चित्रपट निर्मिती…
रा. स्व. संघ कार्यात सहभागावरील उठवलेल्या बंदीचा निर्णय चुकीचा. पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज – )राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धार्जिन असलेल्या केंद्र सरकारने 1966 पासून असलेली बंदी उठवून स्वयंसेवक संघाचे नेते आणि कार्यकर्त्यांना खुश करण्याचा हा प्रयत्न केला आहे. कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात सहभागी होता येणार नाही. त्यांच्या सहभागास बंदी लावली होती. गांधीजींच्या हत्येमध्ये सहभाग असल्याच्या पार्श्वभूमीमुळे हा निर्णय 1948 मध्ये सरदार पटेल यांनी संघावर बंदी घातली होती. तदनंतर 1966 ला 58 वर्षांपूर्वी व पुन्हा 1970 ते 80 ला ते कायम ठेवण्याचा निर्णय झाला आहे पण आता केंद्र सरकारने ही बंदी उठवण्याचा निर्णय घेतला. काही घटनांवरून लक्षात येते की…
