Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी /मुंबई , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्यामध्ये फेरीवाला कायदा असूनही राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे अंमलबजावणी होत नाही, सरकार मोठ मोठ्या धनिकांना पाठिंबा देत आहे मात्र श्रमिक आणि गोरगरीब फेरीवाल्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करत नाही म्हणून येत्या १३ ऑगस्ट रोजी मुंबई येथे भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच राज्यभर विविध महापालिका क्षेत्रात आंदोलन करण्याचां निर्धार आज मुंबईतील पत्रकार परिषदेत घेण्यात आला. मुंबई येथे नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र होकर फेडरेशन,महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ,जनवादी हॉकर सभा,शहीद भगतसिंगयुनियन, जय हिंदुस्थान संयुक्त संघटनांकडून मराठी पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, के नारायणन, विनिता बाळेकुंद्री अखिलेश गौड…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पॅरिस ऑलिंपिक 2024 च्या निमित्ताने ऑलिंपिकचा प्रवास सांगणारे विशेष प्रदर्शन निगडी, प्राधिकरण येथील ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयातील क्रीडाकुल विभागाने भरवले आहे. या प्रदर्शनाास सोमवारी (दि.29) सुरूवात झाली. प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थी, खेळाडू व पालकांनी गर्दी केली आहे. हे प्रदर्शन रविवार (दि.4) पर्यंत खुले राहणार आहे. ऑलिंपिक स्पर्धांची माहिती, त्यांचा इतिहास, क्रीडा विज्ञान, भारताचे ऑलिम्पिकमधील स्थान, यासोबतच खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा अशा सर्वांचे एकत्रित प्रदर्शन तक्तांच्या स्वरूपात मांडले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी कै. हेमंत जोगदेव यांचे सुपुत्र वसंत जोगदेव, क्रीडा विभागाचे सहाय्यक आयुक्त पंकज पाटील, शिक्षणविभागाचे…

Read More

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विधायक उपक्रम ‘संपूर्ण शिवसेना पक्ष साहेबांच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभा’ – संतोष सौंदणकर पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त रविवारी (दि. २८) रोजी रुपीनगर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दीडशेपेक्षा अधिक जणांनी रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला होता. भोसरी विधानसभा संपर्कप्रमुख केसरीनाथ पाटील, जिल्हा संघटिका सुलभाताई उबाळे, विधानसभा प्रमुख धनंजय अल्हाट यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना विभाग रुपीनगरच्या वतीने हे रक्तदान शिबिर पार पडले.या शिबिरात १७३रक्तदात्यानी सहभाग घेतला. रक्तदान शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्याध्यक्ष पतंगे सर व त्यांचे सहकारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे…

Read More

– आमदार महेश लांडगे यांच्या सूचनेनुसार अधिकाऱ्यांची बैठक – स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्यांनी मांडल्या व्यथा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गेल्या आठवडाभरात झालेल्या अतिमुसळधार पाऊसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले. त्यामुळे भोसरी विधानसभा मतदार संघातील चिखली, तळवडे-रुपीनगर रहिवाशी आणि औद्योगिक पट्टयातील वीज समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवली आहे. परिणामी, सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, उद्योजक आणि नोकरदार यांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागला. त्यामुळे वीज समस्या सोडवण्यासाठी महावितरण प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे. सर्वसामान्य नागरिकांकडून वीज समस्यांबाबत तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे यांच्या सूचनेनुसार महावितरणचे अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांची एकत्रित बैठक घेण्यात आली. महानगरपालिका प्रभाग क्रमांक- १ मधील चिखली…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील सदिच्छा दुतांचा सत्कार आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आला. महापलिकेच्या वतीने नागरिकांच्या कल्याणासाठी तसेच शहराच्या विकासासाठी विविध योजना, उपक्रम राबविण्यात येतात. या योजना व उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी विविध समाजमाध्यमांवरील आपल्या खाजगी खात्यांद्वारे प्रसिद्धी करणारे इन्फ्लूएन्सर अर्थात प्रभावक यांनी सदिच्छा दूत म्हणून प्रचार प्रसार केला. या कार्याची दाखल घेऊन  आयुक्त शेखर सिंह यांनी चिंचवड येथील आटोक्लस्टर येथे इन्फ्लूएन्सर यांचा सत्कार  केला, यावेळी उप आयुक्त अण्णा बोदडे, पीसीएमसी स्मार्ट सारथी टीम आणि विविध क्षेत्रातील इन्फ्लूएन्सर…

Read More

 शालेय साहित्य वितरणासाठी ई-रुपी प्रणालीचा अवलंब; महापालिकेचा नाविन्यपूर्ण उपक्रम पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)-  सर्व शैक्षणिक सुविधांसह दर्जेदार शिक्षण देण्यासाठी महापालिका कटीबद्ध असून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांचा परिपूर्ण लाभ मिळावा आणि  शालेय साहित्याचे थेट लाभ हस्तांतरण(Direct Benefit Transfer)  पद्दतीने वितरण करण्यासाठी ई-रुपी कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. त्यानुसार येत्या १० दिवसात महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना दरवर्षी शालेय साहित्याचे वाटप महापालिकेच्या वतीने करण्यात येते. त्यासाठी थेट लाभ हस्तांतरण पद्धतीचा अवलंब करण्यात येते. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात शालेय साहित्याचे वाटप करण्यासाठी थेट…

Read More

– ‘पीएमआरडीए’कडून महानगरपालिकेला जागेचे हस्तांतरण – भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला ‘बळ’ पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील प्रस्तावित भारतीय संविधान भवन आता शहरवासीयांच्या दृष्टीक्षेपात आले असून, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) प्रशासनाने प्रस्तावित जागा पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने भारतीय राज्यघटना आणि जगभरातील लोकशाही देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करता यावा. तसेच, संविधानाबाबत जनजागृती व्हावी. या करिता भारतातील पहिले संविधान भवन उभारण्यात येत आहे. राज्य सरकारच्या पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संविधान भवनाच्या उभारणीबाबत आमदार महेश लांडगे यांनी भेट घेतली होती. त्यावेळी प्रस्तावित संविधान भवन व…

Read More

पिंपरी चिंचवड भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य अमित गोरखे यांनी आज त्यांच्या सदसत्वाची शपथ घेतली. विधान परिषदेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. विधान परिषदेच्या आकरा जागांसाठी १२ जुलै रोजी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नऊ उमदेवार विजयी झाले होते. आज या सर्वांचा शपथविधी पार पडला. विधान परिषदेच्या अध्यक्ष नीलिम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्य पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर, परिणय फुके, मिलिंद नार्वेकर व इतर सदस्यांना संविधानाची शपथ दिली. याप्रसंगी अमित गोरखे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद…

Read More

भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भोसरी येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपूलाखालील अर्बन स्ट्रीटच्या अर्धवट स्थितीतील कामामुळे येथील एका नागरिकाला आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले. अर्धवट स्थितीतील कामामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे अर्बन स्ट्रीटच्या कामाचे कठडे आणि त्याच्या लोखंडी गजाबाबत तातडीने उपाययोजना करा अशी सक्त सुचनाच गव्हाणे यांनी केली होती. अखेर गव्हाणे यांच्या सूचनानंतर प्रशासन हलले आणि रातोरात या कठड्यांचे लोखंडी गज कापण्यास सुरुवात करण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भोसरी मधील राजमाता जिजाऊ उड्डाणपूलाखाली अर्बन स्ट्रीटचे काम करण्यात आले आहे. यावर तब्बल 42 कोटीहून…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जर्मनी स्टूटगार्ट – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कथेवर आधारित “सुलतान ” या लघुपटाचा वर्ड प्रिमियर नुकताच युरोप खंडातील जर्मनी येथील २१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवात उत्साहात पार पडला. यावेळी चित्रपट समीक्षक आणी चित्रपट प्रेमींची विशेष उपस्थिती होती. यावेळी फिल्म फेस्टीव्हलचे संचालक ॲालिव्हर मान, चित्रपट निवड समिती सदस्य थेरेसा हेस, तसेच जर्मन दुतावासातील भारतीय सहकारी अबिन थॅामस, भारतीय चित्रपट समीक्षक तथा दिग्दर्शक संतोष पठारे इत्यादी मान्यंवर उपस्थित होते. 21 वा भारतीय चित्रपट आतंरराष्ट्रीय महोत्सव स्टटगार्ट हा युरोपमधील सर्वात मोठा भारतीय चित्रपट महोत्सव आहे. 2004 पासून तो दरवर्षी जुलैमध्ये पाच दिवस फिल्मब्युरो बॅडेन-वुर्टेमबर्ग आणी…

Read More