आमदार अमित गोरखे यांनी घेतली विधान परिषद सदस्यत्वाची शपथ
पिंपरी चिंचवड भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य अमित गोरखे यांनी आज त्यांच्या सदसत्वाची शपथ घेतली. विधान परिषदेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
विधान परिषदेच्या आकरा जागांसाठी १२ जुलै रोजी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नऊ उमदेवार विजयी झाले होते. आज या सर्वांचा शपथविधी पार पडला.
विधान परिषदेच्या अध्यक्ष नीलिम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्य पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर, परिणय फुके, मिलिंद नार्वेकर व इतर सदस्यांना संविधानाची शपथ दिली.
याप्रसंगी अमित गोरखे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे व भारताच्या संविधानाला स्मरण करून नमन केले. तसेच महाराष्ट्राचे नेतृत्व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले.
यावेळी भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थिती होते यामध्ये दक्षिण भारतीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजेश पिल्ले, प्रदेश निमंत्रित सदस्य महेश कुलकर्णी, पिं चिं भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष तुषार हिंगे, पिं चिं भाजपा शहर सरचिटणीस शितल शिंदे,माजी नगरसेविका ,अनुराधा गोरखे,कमल घोलप,शर्मिला बाबर,पिंपरी विधानसभा भाजपा विस्तारक नंदू कदम, प्रदेश निमंत्रित कार्यकारणी सदस्य संतोष कलाटे, नवीन लायगुडे,गणेश लंगोट, पिंपरी-चिंचवड भाजपा उपाध्यक्ष कुणाल लांडगे गणेश लंगोटे, निगडी प्राधिकरण मंडळ अध्यक्ष राजू बाबर, पिं चिं भाजपा शहर चिटणीस देवदत्त लांडे,कैलास कुटे, खेमराज काळे,स्वीकृत नगरसेवक संजय कणसे, पिं चिं भाजपा शहर चिटणीस सागर फुगे, रघुनाथ जवळकर, नेताजी शिंदे, वैद्यकीय सेल चे शहर अध्यक्ष डॉ. प्रताप सोमवंशी, भाजपा मुस्लिम आघाडीचे शहराध्यक्ष शाकीर शेख,अनुसूचित मोर्चाचे धरम वाघमारे, रोहन भिसे,तसेच व्यापारी सेल चे जयेश चौधरी, जनार्दन तलारे,शुभम पिंपळे, अविनाश गावडे, राज होसमनी, सौरव लंगोटे, अमित गुप्ता, अजित भालेराव,ओम प्रकाश शर्मा आदी भाजपा मान्यवर उपस्थित होते.
तसेच पिंपरी चिंचवड सा अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव ची सर्व कार्यकारणी व महाराष्ट्र भरातून विविध जिल्ह्यातून कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.