शिवसेना विभाग रुपीनगर आयोजित रक्तदान शिबिरास शिवसैनिकांचा उस्फुर्त प्रतिसाद
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विधायक उपक्रम
‘संपूर्ण शिवसेना पक्ष साहेबांच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभा’ – संतोष सौंदणकर
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त रविवारी (दि. २८) रोजी रुपीनगर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दीडशेपेक्षा अधिक जणांनी रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला होता. भोसरी विधानसभा संपर्कप्रमुख केसरीनाथ पाटील, जिल्हा संघटिका सुलभाताई उबाळे, विधानसभा प्रमुख धनंजय अल्हाट यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना विभाग रुपीनगरच्या वतीने हे रक्तदान शिबिर पार पडले.या शिबिरात १७३रक्तदात्यानी सहभाग घेतला.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्याध्यक्ष पतंगे सर व त्यांचे सहकारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जेष्ठ मार्गदर्शक अशोक वाळके, कैलास नेवासकर, जिल्हाप्रमुख निलेश मुटके, चिंचवड विधानसभा संघटक संतोष सौंदणकर, विभाग प्रमुख संदीप भालके, आरोग्य सेनेचे जिल्हाप्रमुख सुखदेव आप्पा नरळे, जिल्हा संघटक रावसाहेब थोरात, युवराज कोकाटे, नेताजी काशीद, राहुल गवळी, सचिन सानप, महिला विधानसभा प्रमुख कल्पना शेटे, महाविकास आघाडीचे माजी नगरसेवक पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, रवींद्र सोनवणे, संगीता ताम्हाणे, धनंजय भालेकर, विलास भालेकर, शांताराम भालेकर, राहुल पवार, बिराजदार, बाप्पा जाधव, रमेश पाटोळे, बाळासाहेब सारंगधर आदी उपस्थित होते.
चिंचवड विधानसभा संघटक संतोष सौंदणकर म्हणाले, ”शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सबंध महाराष्ट्र हा लोककारणाचा मंत्र जपणारं नेतृत्व म्हणून पाहत आहे. मुख्यमंत्री असताना त्यांच्या जनताभिमुख राजकारणामुळे जनकल्याणाच्या अनेक योजना शेवटच्या लोकांपर्यंत पोहोचल्या. त्यामुळेच लोकसभेला उद्धव साहेबांचा करिश्मा सर्वाना दिसला. विरोधात असताना देखील लोकाभिमुख निर्णयासाठी सत्ताधारी नेतृत्वाला नडायाची सर्वाधिक ताकद आज केवळ आमच्या उद्धव साहेबांमध्ये आहे. जनतेचा विश्वास आणि जनतेचे कल्याण या धोरणामुळेच राज्यभरातून कार्यकर्त्यांचा ओघ आज शिवसेनेत वाढत आहे. हे यश कायम टिकून राहिल यासाठी संपूर्ण शिवसेना पक्ष साहेबांच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभा आहे आणि राहील, अशी ग्वाही एक शिवसैनिक म्हणून आम्ही देत आहोत.
शाखाप्रमुख सर्जेराव कचरे म्हणाले, ‘रक्त तयार केले जाऊ शकत नाही, ते फक्त उदार रक्तदात्यांकडूनच येऊ शकते. या उदात्त कार्यासाठी आज सर्वच शिवसैनिक मतभेद विसरून एकत्र आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तसाठा निर्माण झाला. रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तुही यावेळी देण्यात आल्या. रक्तदान शिबिरासाठी तज्ञ डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिक्स आणि इतर कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षम टीमची साथ लाभली.
कार्यक्रमाचे आयोजन भोसरी विधानसभा संघटक दादासाहेब नरळे, शिवसेना विभाग प्रमुख नितीन बोंडे, शिवसेना विभाग संघटिका आशा भालेकर, शिवसेना संघटक सुजाताई काटे, उपविभाग प्रमुख गणेश भिंगारे, पांडुरंग कदम, नागेश आजुरे, आतिश जाधवम, शाखाप्रमुख मोहन जाधव, सर्जेराव कचरे, सहदेव चव्हाण, अभिमन्यू सोनसळे, दीपक कदम, सुनील बाठे, सतीश कंठाळे, सुजित साळवी, उपशाखाप्रमुख कैलास तोडकर, बाळासाहेब वारे, युवा सेना संघटक सुनील समगिर, अमित शिंदे, प्रवीण पाटील, अमोल भालेकर, सागर चव्हाण आदींनी केले.
शिवसेना विभाग प्रमुख नितीन बोंडे यांनी आभार मानले.