Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे शहर कार्याध्यक्ष इंजि. देवेंद्र तायडे यांनाच पक्षाने उमेदवारी द्यावी अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचे कडे केली आहे. पिंपरी विधानसभे संदर्भात एका बैठकीचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना पक्षाचे शहर सरचिटणीस जयंत शिंदे म्हणाले की देवेंद्र तायडे यांच्यासारख्या शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या वैचारिक वारशाने पुरोगामी विचार पुढे नेत असलेल्या व्यक्तीला पक्षाने उमेदवारी दिली पाहिजे अशी एक मुखी मागणी या बैठकीत करण्यात येत आहे. पक्षाचे असंघटित कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  कर्करोग आणि इतर गंभीर आजाराने व्याधिग्रस्त असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना त्यासाठी विनाशुल्क उपचार मिळावेत म्हणून इनर व्हील क्लब ऑफ पिंपरी या संस्थेच्या वतीने नरसिंह फाउंडेशन या सेवाभावी संस्थेला आर्थिक मदतनिधी सुपूर्द करण्यात आला. त्यासाठी ‘रोमान्स के रंग डॉक्टर्स के संग’ या चित्रपटगीतांच्या विशेष मैफलीचे निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात रविवार, दिनांक ०४ ऑगस्ट  २०२४ रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंजुषा शर्मा, इनर व्हील क्लब ऑफ पिंपरीच्या अध्यक्ष शालिनी चोप्रा, सचिव मधुरा प्रधान यांच्यासह क्लबच्या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. आपले वैद्यकीय व्यवसाय यशस्वीपणे सांभाळून सुमारे चोवीस वर्षांपासून संगीत वाद्यवृंदाच्या माध्यमातून मनोरंजन आणि गरीब रुग्णांची…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दरवर्षी महापालिकेच्या वतीने आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे विचार प्रबोधनपर्वाच्या माध्यमातून शहरातील नागरीक तसेच तरूण पिढी मोठ्या संख्येने या महापुरूषाच्या कार्याचा, विचारांचा जागर करण्यासाठी एकत्र येत असतात. या एकोप्यातून शहरातील लोकांचे या महापुरूषांबद्दल असलेले अभूतपुर्व प्रेम दिसून येते. हळूहळू संपुर्ण महाराष्ट्रातून लोक हा कार्यक्रम पाहण्यासाठी येत आहेत. येत्या काही वर्षात या कार्यक्रमाचे स्वरूप आणखी व्यापक होईल व महापुरूषांच्या कार्याचा तसेच त्यांच्या विचारांचा प्रसार स्थानिक तसेच महाराष्ट्रातील कलाकारांच्या माध्यमातून घराघरात होईल, असा विश्वास आमदार अमित गोरखे यांनी व्यक्त केला. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने विचार…

Read More

लोणी-काळभोर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – माईर्स एमआयटी शिक्षण समुहाच्या ४२ व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने येथील एमआयटी एमआयटी आर्ट, डिझाईन, आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठात, विद्यार्थी कल्याण विभागाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदानासारख्या सामाजिक मोहिमेला विद्यापीठात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसह, कर्मचाऱ्यांनी उदंड प्रतिसाद दिला. ज्यामुळे, शिबिराअंती तब्बल १०० हून अधिक रक्त पिशव्या संकलीत करण्यात आल्या.  या रक्तदान शिबिराचे उद्घाटन समारंभात डॉ. अतुल पाटील, संचालक एमआयटी स्कूल ऑफ होलिस्टिक डेव्हलपमेंट; प्रा. हनुमंत पवार, सीईओ पेरा इंडिया; प्रा. डॉ. सुरज भोयर, संचालक – विद्यार्थी व्यवहार; डॉ. सुरेश पारधे, रक्त संक्रमण अधिकारी, जिल्हा रुग्णालय, औंध पुणे; डॉ. इम्रान खान, रक्त संक्रमण अधिकारी, ससून…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील विद्यार्थ्यांना महापालिकेच्या हद्दीबाहेरील कार्यक्षेत्रामध्ये शिक्षण घेण्यासाठी सवलतीच्या दरात पास उपलब्ध करून देणारी योजना राबविण्यासाठीच्या विषयासह विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी प्रशासकीय मान्यता दिली .  महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेले विविध विषय आज प्रशासक  शेखर सिंह यांच्या मान्यतेसाठी विशेष बैठकीमध्ये ठेवण्यात आले होते. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये  पार पडलेल्या बैठकीमध्ये प्रशासक  सिंह यांनी विविध विषयांना  मंजुरी दिली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त तथा नगरसचिव चंद्रकांत इंदलकर तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या व  महापालिकेच्या हद्दीबाहेर शिक्षण घेणाऱ्या इयत्ता ५ वी टते १० वी च्या विद्यार्थ्यांना सवलतीच्या…

Read More

भाजपा आमदार महेश लांडगे यांचा झंझावात एकाच दिवशी तब्बल 16 विकासकामांचा ‘‘श्रीगणेशा’’ पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील रुपीनगर- तळवडे भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या मागणीनुसार, विविध विकासकामांचा अक्षरश: ‘मान्सून धमाका’ सुरू आहे. एकाच दिवसांत या भागातील लहान-मोठ्या १६ विकासकामांचा ‘‘श्रीगणेशा’’ करण्यात आला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. भाजपाचे आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने रुपीनगर- तळवडे येथील विविध विकासकामाना चालना देण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक शांताराम भालेकर, पांडुरंग भालेकर, निलेश भालेकर, भाजपाचे किरण पाटील, अस्मिता भालेकर, डॉ. सोमवंशी, शिरीष उत्तेकर, संदीप जाधव, रमेश भालेकर, अनिल भालेकर, शरद भालेकर, रवि सेठसंधी, प्रमोद भालेकर, एस. डी. भालेकर, मुन्ना पवार, ज्ञानेश्वर…

Read More

साडेतीन कोटी खर्च करून अत्याधुनिक पद्धतीचा होणार जलतरण तलाव काळभोर यांनी आयुक्त शेखर सिंह आणि प्रसारमाध्यमांचे मानले आभार पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मोहननगर येथील बंद असलेला जलतरण तलावाचे काम सुरू करण्यासाठी वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर कार्याध्यक्ष विशाल बाळासाहेब काळभोर यांनी पाठपुरावा केला. अखेर काळभोर यांच्या पाठपुराव्याला यश आले असून या जलतरण तलावाचे काम महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. याबद्दल काळभोर यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि प्रसारमाध्यमांचे आभार मानले आहेत. याबाबत काळभोर यांनी एक निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्र. 14 मधील मोहननगर येथे श्री छत्रपती…

Read More

मेट्रोमुळे शहराचा विकास की पर्यावरणाचा -हास? पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पुणे महामेट्रोने पिंपरी ते निगडी विस्तारीकरणाचे काम हाती घेतले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होणार असली तरी या विकासाच्या मार्गात येणाऱ्या ५७ झाडांची कत्तल केली जात आहे. त्यामुळे ही मेट्रो शहराला विकासाच्या दिशेने घेऊन जात आहे की न्हासाकडे निघाली आहे? असा प्रश्न पर्यावरण प्रेमींनी उपस्थित केला आहे. पर्यावरण संवर्धनासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाकडून एक लाख बांबूची लागवड करण्याचा संकल्प नुकताच करण्यात आला आहे. वृक्षतोडीला उद्यान विभागाने बंदी घातलेली आहे. सामान्य पिलर उभारण्यासाठी ५७ झाडांची कत्तल माणसाला राहत्या घराच्या दारातील झाडाची फांदी तोडायची असेल तरी उद्यान विभागाची परवानगी घ्यावी लागते. परंतु, प्रशासकीय…

Read More

लाडक्या बहिणींना उद्धव साहेबांच्या शिवसैनिकांच्या खिशातून पहिली ओवाळणी?.. भाजप आणि शिंदे सरकारचा मिंधेपणा पुन्हा एकदा उघडकीस.. पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उद्धव साहेबांच्या शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत केलेला दणदणीत पराभव सत्ताधारी भाजपच्या जिव्हारी लागला आहे. भाजपसह मिंधे सरकार कावरं बावरं झाल असून, काय करावं याच दोघांनाही भान राहिलेलं नाही. त्यामुळे इर्षेने पेटून प्रशासनाच्या आडून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना लक्ष केले जात आहे. पुण्यातील शिवसेनेच्या शिवसंकल्प मेळाव्यातून त्याचा प्रत्यय आलाच आहे. निधीअभावी फसलेल्या ‘लाडकी बहिण’ योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी आता शिवसैनिकांच्या खिशातून रक्कम काढली जात आहे काय? हे भाजपसह एकदाचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे, अशी मागणी शिवसेना चिंचवड विधानसभेचे शहर संघटक संतोष सौंदणकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष नाना पटोले हे कामगार संघटनेच्या आक्रोश मेळाव्यास आले असता त्यांनी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या खराळवाडी, पिंपरी येथील मध्यवर्ती कार्यालयास भेट दिली. शहर काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेऊन शहर काँग्रेसच्या विविध उपक्रमाची व कार्यक्रमाची सविस्तर माहिती घेतली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील प्रभाग रचना, तिन्ही विधानसभा निहाय बूथ कमिटी बनविणे बाबतची माहिती व शहरातील प्रमुख नागरी समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटीचा संघटनात्मक कामाचा आढावा घेतला, तसेच शहर काँग्रेस कमिटीतर्फे राबवल्या जाणाऱ्या ‘काँग्रेस पक्ष करदात्या नागरिकांच्या दारी’ डिजिटल प्रचार वाहनांचा शुभारंभ करण्यात आला. शहर काँग्रेसने गेले…

Read More