- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
स्वप्न साकारण्यासाठी योग्य मार्गदर्शन, अथक परिश्रमांची गरज – रवीन नायर एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्येबस्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विद्यार्थ्यांनी पाहिलेले स्वप्न साकारण्यासाठी योग्य गुरु, मार्गदर्शक त्याचबरोबर अथक परिश्रमांची गरज असते. तरच भविष्यात आपली स्वप्न साकार होऊ शकतात. कोणत्या विषयाची आवड आहे, गती आहे हे ओळखून शिक्षण घेतले तर विद्यार्थ्याचे भविष्य उज्ज्वल आहे. त्यासाठी पालकांनी मुलांचा शैक्षणिक कल ओळखून अभ्यासक्रम निवडला पाहिजे, असा सल्ला क्युएस आय-गेजचे सीओओ रवीन नायर यांनी विद्यार्थी व पालकांना दिला. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट च्या रावेत येथील एस.बी.पाटील पब्लिक स्कूल, मध्ये ७८ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला. यावेळी क्युएस आय-गेजच्या वतीने…
पिंपळे सौदागरमधील तीन हजार नागरिकांनी हाताचे ठसे उमटवत साजरा केला स्वातंत्र्य दिन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशाचा ७८वा स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशन मार्फत पिंपळे सौदागर याठिकाणी एका आगळ्यावेगळ्या विक्रमाला गवसणी घालण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला सौदागर वासियांनी उत्तम प्रतिसाद देत यशस्वी केले. यावेळी साधारण ३००० नागरिकांनी आपल्या हाताचे ठसे उमटवत तिरंगा बनविला. शहरात शत्रुघ्न काटे आणि नवीन व भन्नाट उपक्रम असे एक समीकरण तयार झाले आहे आणि यामुळेच प्रभागात एक नवीन आगळावेगळा असा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता कै.बाळासाहेब कुंजीर क्रीडांगण,कुणाल आयकॉन रोड याठिकाणी जागतिक विक्रमाला गवसणी…
पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील शालेय विद्यार्थ्यांना पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीच्या हद्दीत कोणत्याही शाळेत जाण्यासाठी पीएमपीएमएलमार्फत सवलतीचा पास देण्यात यावा, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे केली होती. त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने आपल्या हद्दीतील पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना बसपासमध्ये ७५ टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. आता विद्यार्थ्यांनी बसपाससाठी केवळ २५ टक्के रक्कम भरावयाची आहे. भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पीएमपीएमएलमार्फत सवलतीचा प्रवासी पास दिला जातो. त्याचा या शहरातील शेकडो विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणासाठी वापर करता येत…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना राहुल दादा कलाटे फाउंडेशनच्या वतीने रक्तदान महायज्ञातून अभिवादन केले. चिंचवड विधानसभा मतदारसंघांमध्ये स्वातंत्र्यदिनी १२ ठिकाणी रक्तदान करून सामाजिक भान जपले. सुमारे एक हजार बाटल्या रक्त संकलन करण्यात आले. रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ असा विविध सामाजिक संघटनांतर्फे प्रचार आणि प्रसार करण्यात येतो. मात्र, रक्तदात्यांची गेल्या काही वर्षांत संख्या कमी झाली आहे. ही गरज ओळखून युवा नेते राहुल कलाटे यांच्या वतीने १२ ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत राबविण्यात आला होता. युवा नेते राहुल कलाटे म्हणाले, ‘ देशात १२० कोटी लोकसंख्या असूनही केवळ १ कोटी २० लाख लिटर…
-नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवडमधून आम्ही विठ्ठल उर्फ नाना काटे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. नाना आमदार झाले पाहिजे अशी येथील नागरिक, पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे असे राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार म्हणाले. यासाठी आम्ही चिंचवड मतदार संघात मोर्चेबांधणी केली आहे असेही पवार म्हणाले. नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पार्थ पवार बोलत होते. कार्यक्रमाला खासदार श्रीरंग आप्पा बारणे , माजी महापौर संजोग वाघिरे, नितीन आप्पा काळजे, अखिल भारतीय राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष धीरज शर्मा, माजी उपमहापौर प्रभाकर वाघिरे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) उपाध्यक्षपदी गणेश चंद्रकांत लंगोटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी नियुक्ती पत्र दिले. भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बळकटीसाठी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी आपण यशस्वी रित्या पार पाडाल असा विश्वास गणेश लंगोटे यांनी व्यक्त केला .
पिंपरी चिंचवड शहर भाजपाची विस्तारित जिल्हा कार्यकारिणी अधिवेशन संपन्न पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भाजपाला थांबविण्यासाठी विरोधकांकडून जोरदार ताकद लावली जात आहे, सर्वाधिक वेळा काँग्रेसच्या काळात संविधानात बदल झाले. वफ़फ बोर्डाला सर्वाधिक पॉवर देण्याचा शेवटचा बदल काँग्रेसने २०१३ साली केला. संविधान बदलण्याची भाषा वापरून काँग्रेस फेक नरेटिव्ह पसरविण्याचे काम करीत आहे, त्यांना त्याच ताकदीने उत्तर देण्याची गरज आहे. त्यामुळे पुढील दोन तीन महिन्यांच्या कालावधीत गाफीत न राहता जिददीने निवडणुका जिंकण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन राज्यसभा खासदार प्रा.डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केले. आगामी विधानसभा निवडणुकीत शहरातील तीनही मतदारसंघात महायुतीच्या विजयासाठी मंथन करण्याकरिता भाजपा पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)च्यावतीने विस्तारित जिल्हा कार्यकारिणी…
– अंध, अपंग, टपरीधारकांच्या प्रश्नाच्या गांभीर्याकडे बाबा कांबळे यांनी लक्ष वेधले पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रशासनाच्या राजकीय उदासीनतेचा फटका सर्वसामान्य गोरगरीब, अंध, अपंग, टपरीधारक कष्टकरी यांना बसत आहे. त्यामुळे त्यांचे प्रश्न शासन दरबारी रखडलेले आहेत. सातत्याने पाठपुरावा करूनही प्रश्न सुटले नाहीत. त्याचा परिणाम म्हणून पिंपरी येथे आयुक्तांची गाडी फोडून अंध, अपंग, बांधवांनी आपला संताप व्यक्त केला. पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने या प्रश्नांचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित कार्यवाही करावी. अन्यथा अंध, अपंग टपरी पथारी हातगाडी धरक, रिक्षा चालक कष्टकरी साफसफाई महिला च्या संतापाला सामोरे जावे लागेल असा इशारा बाबा कांबळे यांनी आयुक्तांना प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला. बाबा कांबळे यांनी प्रसिद्धी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रहाटणी क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित, न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडिअम स्कूल येथे 15 ऑगस्ट उत्साहात साजरा करण्यात आला. सुभेदार बळीराम खांडेभराड यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या निमित्ताने विविध संस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निर्मला कुटे, सुरेश भालेराव (माजी पोलीस उपनिरीक्षक व मेजर समता सैनिक दल), संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, सेक्रेटरी संदीप चाबुकस्वार, देवेंद्र तायडे (कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस एस.पी.पक्ष पि.चि.शहर,) के.डी वाघमारे,(सचिव राष्ट्रवादी काँग्रेस एस.पी.पक्ष पि.चि.शहर) विशाल जाधव( अोबीसी सेल ) सुभाष दहिफळे, सुहास देशमुख, संकेत कुटे (सामाजिक कार्यकर्ते) शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी उपस्थित…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या चिंचवड येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स आयआयएमएस मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने याझाकी इंडिया लिमिटेड या कंपनीचे वरिष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापक निलेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आयआयएमएसचे संचालक डॉ.शिवाजी मुंढे यांनी त्यांच्या प्रास्ताविकपर भाषणात विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत सर्वांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे स्मरण कायम ठेवत, देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्राणांची आहुती दिली त्यांच्या योगदानाचे कायम स्मरण ठेवावे आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी शक्य तेवढे प्रयत्न प्रत्येकाने करावे, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे निलेश पाटील यांनीही त्यांच्या भाषणात विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी किंवा…
