ताज्या घडामोडीपिंपरी

रक्तदान महायज्ञातून स्वातंत्र्यवीरांना अभिवादन

Spread the love

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना राहुल दादा कलाटे फाउंडेशनच्या वतीने रक्तदान महायज्ञातून अभिवादन केले. चिंचवड विधानसभा मतदारसंघांमध्ये स्वातंत्र्यदिनी १२ ठिकाणी रक्तदान करून सामाजिक भान जपले. सुमारे एक हजार बाटल्या रक्त संकलन करण्यात आले.
रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ असा विविध सामाजिक संघटनांतर्फे प्रचार आणि प्रसार करण्यात येतो. मात्र, रक्तदात्यांची गेल्या काही वर्षांत संख्या कमी झाली आहे. ही गरज ओळखून युवा नेते राहुल कलाटे यांच्या वतीने १२ ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत राबविण्यात आला होता.
युवा नेते राहुल कलाटे म्हणाले, ‘ देशात १२० कोटी लोकसंख्या असूनही केवळ १ कोटी २० लाख लिटर रक्त पुरवठा केला जात आहे.  आवश्यकतेनुसार ४० टक्के रक्ताची कमी होती. रक्त न मिळाल्यामुळे मृत्यूचे प्रमाण देशभरात १५ ते २० टक्के आहे. भारतात केवळ ०.६ टक्के लोक रक्तदान करतात. हि गरज लक्षात घेऊन हा उपक्रम राबविला.’

रक्तदान केले म्हणून विमा
रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास सहा लाखांचे विमा कवच देण्यात आले.  तीन लाखांचा अपघात विमा, तीन लाखांचा जीवन विमा, रक्तदात्यास अजीवन रक्त मोफत, नातेवाईकास एक वर्ष रक्त मोफत देण्यात आला, हे शिबीर …. या रक्तपेढीच्या सहकार्याने घेण्यात आले, अशी माहिती राहुल कलाटे यांनी दिली.

या ठिकाणी झाला महायज्ञ !
कोकणे चौक रहाटणी, विठ्ठल रुक्मिणी मंदिर गावडे- भोईर आळी चिंचवड, मनपा शाळा वाकड,  मल्हार मार्केट विकासनगर, गणेश मंदिर शिंदेवस्ती चौक रावेत, सूर्यमुखी गणेश मंदिर पडवळनगर थेरगाव, ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालय साई चौक नवीसांगवी, विठ्ठल रुक्मिणी मंदिर नढेनगर, तुळजाभवानी मंदिर शिव नगरी बिजलीनगर, आबासाहेब पवारनगर गल्ली नं २ द्रोण पार्क जुनी सांगवी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button