Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आनंदा कुदळे यांना ‘सावित्री शक्तीपीठ’ या संस्थेचा ‘महात्मा फुले पुरस्कार’ जाहीर झाला आहे. माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या हस्ते शनिवारी (दि.२४ ऑगस्ट) समताभूमी, महात्मा फुले पेठ, पुणे येथील सावित्रीबाई फुले सभागृहात सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कुदळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. आनंदा कुदळे यांनी सामाजिक कार्याबरोबरच पर्यावरण, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून काम करण्याची संधी कुदळे यांना मिळाली होती. पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथील महात्मा जोतीराव फुले स्मारक आणि ज्ञानज्योती…

Read More

पिंपरी चिंचवड साहित्य मंच आयोजित 🕉️ *शिवदर्शन* 🕉️ त्रिपुरारी पौर्णिमेला संगमेश्वर हे दिव्य शिवालय दोन उत्तुंग दीपमाळांवर आणि घाट पायर्‍यांवर लावलेल्या दीपांच्या प्रकाशात उजळून निघते . जळातील हे देखणे प्रतिबिंब पाहायला आकाशातील पूर्ण चंद्र सुद्धा क्षणभर थबकतो .प्रत्यक्ष पांडवांनी ज्याची निर्मिती केली, पेशव्यांच्या या पहिल्या राजधानीचे वैभव अनुभवले, आचार्य अत्रे यांचे बाळरूप ज्याने अंगाखांद्यावर खेळवले, श्री संत सोपानदेवांचे निकट सान्निध्य ज्याला लाभले आहे तेच हे संगमेश्वर मंदिर .पुणे जिल्ह्यातील सासवड नगरीत हे शिवमंदिर बाराव्या शतकातील शिल्प वैभवाचा प्राचीन वारसा दिमाखात मिरवत आहे . कऱ्हा आणि चांबळी नदीच्या पवित्र संगमावर वसले आहे म्हणून संगमेश्वर म्हणतात.प्रशस्त घाट पायर्‍या चढून गेल्यावर मंदिराच्या प्राकारात…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – पिंपरी येथील बी टि आडवाणी धर्मशाळेत पिंपरी येथील सेंट्रल पंचायत आणि भारतीय सिंधू सभा या संस्थेच्या वतीने पिंपरी मधील सिंधी समाज मिलन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मिलिंदजी परांडे केंद्रीय महासचिव विश्र्व हिंदू परिषद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकारने जो सी ए ए चा कायदा देशात लागू केला त्या कायद्याच्या संदर्भात सिंधी बांधव हे १९४७ साली देशाची फाळणी झाल्यावर आपल्या भारतात येऊन स्थायिक झाले आहेत आणि आज या सिंधी बांधवांचे नातेवाईक सुध्दा भारतात येऊन स्थायिक होत आहेत परंतु त्यांना काही तांत्रिक कारणांमुळे येण्यास विलंब होत…

Read More

विद्यार्थ्यांची प्रगती पाहून शिक्षकांना समाधान मिळते – अनिल जाधव भोसरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिक्षकांना कोणत्याही पारितोषिकाची गरज नसते. मुलांनी घडावं, यासाठी शिक्षक रागवतो. वेळप्रसंगी त्यांना मारतो. परंतु, विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या क्षेत्रातील झालेली प्रगती पाहून शाळा आणि शाळेतील प्रत्येक शिक्षकाला ख-या अर्थाने समाधान मिळते, असे मत महापालिकेचे माजी शिक्षक अनिल जाधव यांनी व्यक्त केले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भोसरीतील छत्रपती श्री शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाचा 2007-08 शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा रविवारी (दि.18) पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. शाळेचे शिक्षक रामचंद्र देशमुख, सुधीर कुलकर्णी, शोभा कोरडे, मालती वाणी, प्रतिमा थोरात, सुरवसे सर आदी उपस्थित होते. रामचद्र देशमुख म्हणाले, शिक्षकांविषयी आज आदरयुक्त…

Read More

इंद्रायणी नगर येथील बैठकीत अजित गव्हाणे यांच्याकडे नागरिकांनी मांडल्या व्यथा शांत, सुनियोजित इंद्रायणीनगरसाठी नागरिक म्हणाले, आता परिवर्तनाची गरज! पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली सुसज्ज, आणि ‘वेल प्लांड’ नियोजनानुसार स्थापित झालेल्या इंद्रायणीनगरमध्ये आम्ही शांतता, सुनियोजित भाग, चांगल्या सुविधांमुळे घरे बांधली, फ्लॅट घेतले. मात्र आज आम्ही प्रचंड दहशतीखाली आहोत. आमच्या सोसायटीच्या, घराबाहेरच्या मोकळ्या जागा मनमानी पद्धतीने बळकवल्या जात आहेत. फुटपाथवरच्या टपऱ्या, पथारी व्यावसायिकांसाठी गेल्या दहा वर्षात हॉकर्स झोनचे नियोजन न केल्यामुळे इंद्रायणीनगरला अक्षरशः बकालपणा आणला आहे. चौक गुदमरतोय, गुन्हेगारी वाढतेय, महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असल्याची कैफियत रविवारी (दि.१८) स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासमोर नागरिकांनी…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –“श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे सरसेनानी अशोकजी सिंघल यांचे अवघे जीवन श्रीराममय झाले होते!” असे गौरवोद्गार विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्र मंत्री गोविंद शेंडे यांनी चिंचवडगाव येथे व्यक्त केले. विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत आयोजित, साप्ताहिक विवेक संपादित अशोकजी सिंघल यांच्या जीवनावर आधारित विशेषांकाच्या प्रकाशनात गोविंद शेंडे बोलत होते. विश्व हिंदू परिषद केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे, प्रांत अध्यक्ष पांडुरंग राऊत, उपाध्यक्ष माधवी सौंशी, प्रांत मंत्री किशोर चव्हाण, प्रांत सह मंत्री ॲड. सतिश गोरडे, प्रा. संजय मुद्राळे, डॉ. प्रतिभा बोथारे आणि अनिल सांबारे यांची प्रमुख उपस्थिती होती. गोविंद शेंडे पुढे म्हणाले की, “प्रत्येक भेटीत अशोकजी यांनी माझ्यावर…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कासारवाडी येथील जैन स्थानकामध्ये उपप्रवर्तिनी मंगल प्रभाजी म सा मधुर व्याख्यानी डॉ मधुस्मिताजी म सा, मधुर गायिका प पू हर्षिताजी म सा ,आणि प्रखर वक्ता प पू दिव्यांशीजी या साध्वीजी चातुर्मासा निमित्त विराजमान आहेत. त्यांच्या सानिध्यात, आनंद दरबार पगारिया सभागृहामध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला . परिवारातील कासारवाडी येथील अनेक परिवारातील भगिनींना रक्षाबंधन निमित्त आमंत्रित करण्यात आले होते तसेच येथील सुनांच्या बंधूंनाही आमंत्रित करण्यात आले होते .त्यामुळे सभागृहामध्ये कासारवाडी येथील अनेक परिवारांच्या मधील भावांच्या बहिणी आणि येथील सुनांचे भाऊ मोठ्या संख्येने या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी रक्षाबंधन या विषयावर पु मधुस्मिताजी म…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कुरणवाडी येथे मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीच्या वतीने देशी 50 झाडाचे वृक्षारोपण लाडक्या बहीण भावाच्या प्रमाचे प्रतिक रक्षाबंधनाचे औचित्य साधून जेष्ट महिला सगुणाबाई नाणेकर यांच्या हस्ते वृक्षाचे पुजन करून वृक्षरोपण करण्यात आले. शहराध्यक्ष अण्णा जोगदंड म्हणाले की आपल्या  स्मरणात बहीण भावाचे आणि रक्षाबंधनाचे अतुट नाते स्मरणात राहावे म्हणून आम्ही वृक्षारोपण केले.यामुळे पर्यावरण वाढीसही चालना मिळेल .ज्या बहीणीला भावाकडे जाण्यासाठी काही अपरिहार्य कारणांमुळे जाऊ शकत नाही अशावेळी पर्यावरण वाचवण्यासाठी बहीणीने ही भावाप्रमाणे पुढाकार घेऊन आपल्याला शक्य तेवढे जमेल त्या वेळी रक्षाबंधनाची आठवण म्हणून झाडे लावून ते जगवावेत. आणि आपल्या एकमेकांना काही भेट वस्तू द्यायची असेल…

Read More

भारत सरकारच्या बोर्ड ऑफ अप्रेंटीसशीप ट्रेनिंगचे सहकार्य पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) संचलित पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई) आणि भारत सरकारचे बोर्ड ऑफ अप्रेंटीसशीप ट्रेनिंग व महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स यांच्या संयुक्त विद्यमाने पीसीसीओई, प्राधिकरण, निगडी, पुणे येथे अप्रेंटीसशीप भरती मेळाव्याचे आयोजन शनिवारी (२४ ऑगस्ट) सकाळी नऊ वाजता करण्यात आले आहे, अशी माहिती पीसीईटीच्या सेंट्रल प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. शीतलकुमार रवंदळे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. या भरती मेळाव्यात मागील पाच वर्षात उत्तीर्ण झालेले अभियांत्रिकीचे डिप्लोमाधारक, बीई/बीटेक, आयटीआय, बीए, बीकॉम, बीएससी, बीबीए, बीसीए, बी. फार्म व इतर कोर्सेसचे पदवीधारक विद्यार्थी सहभागी…

Read More

पिंपरी चिंचवड विद्यापीठात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आजच्या स्पर्धात्मक युगात कौशल्य विकासाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांनी कौशल्य विकास करून रोजगार, स्वयंरोजगार संधी शोधल्या पाहिजेत. यामुळे देश विकासाला चालना मिळेल आणि गौरव वाढेल. विद्यार्थ्यांनी सचोटी आणि निस्वार्थीपणाची मूल्ये जोपासली पाहिजेत, असे प्रतिपादन लेफ्टनंट कमांडर (निवृत्त) विवेक कामत केले.     पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयु) मध्ये स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी कामत यांनी सर्वांना ‘नेशन फर्स्ट’ चे महत्व सांगितले. कार्यक्रमास रेजिमेंट ऑफ आर्टिलरीचे ब्रिगेडियर (निवृत्त) जयप्रकाश सपटणेकर, प्रभारी कुलगुरू डॉ. मणीमाला पुरी, प्र-कुलगुरू डॉ. सुदीप…

Read More