- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त पिंपरी चिंचवड भाजपचे अध्यक्ष शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त माजी सरपंच स्वर्गीय गोविंदराव तांबे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये प्रथम क्रमांक प्रत्युष शर्मा द्वितीय क्रमांक इशिता गुप्ता व तृतीय क्रमांक आरुष सकपाळ यांना देण्यात आला त्यावेळेस शिवेंद्र तांबे,तात्या शिनगारे, नीरज भोसले आदी नागरिक उपस्थित होते.
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – बदलापूर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर आपल्या शहरातील मुलींच्या सुरक्षिततेबाबत कठोर उपाययोजना राबविण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी आयुक्ताकडे निवेदना द्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील अल्पवयीन मुली आणि एकूणच महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रमाणात वाढ होत आहे.सुसंस्कृत समाजात अशा गोष्टी पडणं ही अतिशय चिंताजनक बाब आहे. त्यामुळे तात्काळ महापालिकेच्या शाळांबरोबरच खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, महाविद्यालये यामध्ये सुरक्षिततेसंदर्भात खालील उपाययोजना राबविण्यात याव्यात अशी मागणी करत आहे. यावर तात्काळ अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा आहे. सर्व शाळा महाविद्यालय यामध्ये शिक्षक, पालक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, पोलीस यांची समिती स्थापन करावी,शाळांमध्ये विद्यार्थ्यांना…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महावितरणच्या स्पाईन सिटी नवीन विभागा अंतर्गत जाधववाडी चिखली येथे सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नव्याने तयार करण्यात आलेल्या स्पाईन सिटी विभागांतर्गत जाधववाडी फिडर वरील लघुउद्योजकांना महावितरण विषयी भेडसावणाऱ्या विविध समस्या व वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्या संदर्भात पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या संचालक मंडळासह महावितरण अभियंता यांच्या समवेत बैठकीचे जाधववाडी चिखली येथे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे संचालक प्रमोद राणे, नवनाथ वायाळ, भारत नरवडे, संदीप वहिले तसेच महावितरण तर्फे नवीन रुजू झालेले उपकार्यकारी अभियंता राजेश भगत, सहाय्यक अभियंता रामप्रसाद नरवडे, अतिरिक्त कार्यभार असलेले सिंह साहेब…
पनवेल,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल विभागातील सिडकोच्या अख्यत्यारित येणा-या भागातील नागरिकांच्या समस्यांचे तत्काळ निराकरण करावे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नादुरुस्त आहेत. त्या प्रकल्पांचे नूतनीकरण करुन पनवेल महापालिकेकडे हस्तांतरित करावेत, सेंट्रल पार्क विकसीत करावे, अशा सूचना मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी अधिका-यांना केल्या. सिडको क्षेत्रामध्ये अनेक समस्या असून नागरिक त्रस्त आहेत. नागरिकांनी या समस्यांबाबत खासदार बारणे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार बारणे यांनी बेलापूर येथील सिडकोच्या कार्यालयात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगला यांच्यासोबत बैठक घेतली. त्यावेळी सहव्यस्थापकीय संचालक गणेश देशमुख, सहव्यस्थापकीय संचालक दिलीप ढोले, एन. एम. मानकर, मुख्य अभियंता बायस, मुख्य भूमी अभिलेख अधिकारी शीला कुरुणाकरन, पाणीपुरवठा अधिक्षक…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरात साजरा होणाऱ्या यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध सुविधांचे नियोजन करण्याच्या दृष्टीने आणि शहरातील विविध गणेशोत्सव मंडळे तसेच महानगरपालिका, पोलीस प्रशासन, वीज वितरण अधिकारी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी यांची संयुक्त बैठक आज गुरूवार २९ ऑगस्ट २०२४ रोजी ग. दि. माडगूळकर सभागृह, निगडी प्राधिकरण येथे दुपारी ४ वाजता संपन्न होणार आहे. यंदाच्या वर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपुरक व शांततापूर्ण वातावरणात पार पडावा यासाठी शहरातील सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी तसेच शहरातील गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीस उपस्थित रहावे आणि आपल्या सूचना मांडाव्यात, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे. या बैठकीत महापालिकेच्या वतीने गणेशोत्सवात विसर्जन…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- गणेशोत्सव तसेच नवरात्रोत्सवाच्या काळात शहरातील मूर्ती तयार करणारे कारागीर, मूर्तिकार तसेच उत्पादकांनी केवळ शाडू मातीच्या मुर्तींची निर्मिती किंवा विक्री करावी. नागरिकांनीही केवळ पर्यावरणपूरक शाडू मातीच्या नैसर्गिक रंग वापरून तयार केलेल्या आणि पाण्यात सहज विरघळणाऱ्या मुर्त्या तसेच पर्यावरणपूरक सजावटीचे पूजा साहित्य वापरून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि शहरातील नागरिकांनी नेहमीच पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यास प्राध्यान्य दिले आहे. आपले पिंपरी चिंचवड पर्यावरणाच्या दृष्टीने सुरक्षित राहील याची दक्षता घेण्याची जबाबदारी ही शहरातील प्रत्येक नागरिकाची आहे. त्यादृष्टीने नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर द्यावा. तसेच मूर्ती तयार करणारे सर्व कारागीर, मूर्तिकार…
रस्त्यांवरील खड्ड्यांवरून युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव चंद्रशेखर जाधव यांचा आयुक्तांना परखड सवाल पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- शहरात रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर असताना महापालिका प्रशासनाकडून शहरभर खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले. यामध्ये महापालिका प्रशासनाने रहाटणी, थेरगाव, पिंपरी या तिन्ही प्रभागातील खड्डे बुजविण्याचे काम केले. मात्र या तीनही प्रभागाच्या मधोमध असलेल्या काळेवाडी प्रभागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याची खंत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे व्यक्त केली. काळेवाडी प्रभागातील खड्ड्यांचा प्रश्नासह विविध मुद्द्यांवर शहर काँग्रेसच्या वतीने महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड जिल्हा अध्यक्ष…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील कचरावेचक व्यक्तींच्या पाल्यांसाठी शैक्षणिक अर्थसहाय्य देण्याच्या विषयासह महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये पार पडलेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त तथा नगरसचिव चंद्रकांत इंदलकर तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत राहत असलेले व कचरावेचकांचे काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलांचे जीवनमान उंचविण्याच्या तसेच त्यांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीकोनातून महापालिकेच्या वतीने शैक्षणिक अर्थसहाय्य देण्याच्या योजनेस प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारतीय सैनिकांसोबत रक्षा बंधन करावे सैनिकांचा सहवास मिळावा,संवाद व्हावा अशी अभिसार फाउंडेशन संचलित वाकड येथील दिव्यांग शाळेतील मुलांची,पालकांची तसेच शिक्षकांची खूप इच्छा होती.त्यांनी हि इच्छा वूई टुगेदर फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना बोलून दाखविली. फाउंडेशनच्या माध्यमातून त्वरित आर्मी युनिट लायन्स खडकी येथील मिलेटरी वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधून वरील उपक्रम साठी सहकार्य करण्याची विनंती केली त्यांनीही त्वरित पाठपुरावा करून वरील उपक्रम घेण्याची परवानगी दिली. अतिशय आनंदी वातावरणात हा रक्षाबंधन व संवाद उपक्रम पार पडला. या उपक्रमासाठी वूई टुगेदर फाउंडेशन अध्यक्ष सलीम सय्यद,सल्लागार मधुकर बच्चे आदी पदाधिकार्यानी पुढाकार घेतला.कर्नल साहेब सह सर्व सैनिकांनी दिव्यांग मुले,पालक,शिक्षक, वूई टुगेदर फाउंडेशन…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – दिघीमध्ये अद्यावत अग्निशामक केंद्र होणार आहे. या केंद्राच्या कामाचे भूमीपूजन भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते झाले. या केंद्रामुळे दिघी व बोपखेल परिसरातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे. या केंद्रासाठी भाजपचे माजी नगरसेवक विकास डोळस, माजी उपमहापौर हिराबाई घुले, माजी नगरसेविका निर्मला गायकवाड यांनी पाठपुरावा केला होता. उद्घाटनावेळी भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे निवडणूक प्रमुख विकास डोळस, दत्तात्रय गायकवाड, माजी उपमहापौर हिराबाई घुले, माजी नगरसेविका निर्मला गायकवाड, भाजपचे माजी चिटणीस कुलदिप परांडे, संजय गायकवाड, माजी सैनिक आमसिध्द भिसे, ज्येष्ठ नागरिक पांडूरंग वाळके,उमेदसिंह पनवर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे-आळंदी…
