ताज्या घडामोडीपिंपरी

जाधववाडी चिखली येथे खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्या संदर्भात पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेची महावितरण अधिकारी यांच्यासोबत बैठक

Spread the love

 पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महावितरणच्या स्पाईन सिटी नवीन विभागा अंतर्गत जाधववाडी चिखली येथे सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

नव्याने तयार करण्यात आलेल्या  स्पाईन सिटी विभागांतर्गत  जाधववाडी फिडर वरील लघुउद्योजकांना महावितरण विषयी भेडसावणाऱ्या विविध समस्या व वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्या संदर्भात पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या संचालक मंडळासह महावितरण अभियंता यांच्या समवेत बैठकीचे जाधववाडी चिखली येथे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीस पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे संचालक प्रमोद राणे, नवनाथ वायाळ, भारत नरवडे, संदीप वहिले तसेच महावितरण तर्फे नवीन रुजू झालेले उपकार्यकारी अभियंता राजेश भगत, सहाय्यक अभियंता रामप्रसाद नरवडे, अतिरिक्त कार्यभार असलेले सिंह साहेब आणि जाधववाडी, चिखली, कुदळवाडी या औद्योगिक परिसरातील लघुउद्योजक मोठ्याप्रमाणात उपस्थितीत होते.

     या बैठकीत एच.टी.लाईनला काही प्रॉब्लेम नाही. एल.टी.ला प्रॉब्लेम आहे असे निदर्शनास आले. RDDS स्कीममध्ये १० रोहित्रे बसविणे व त्यांचे मेंटेनन्स, फिडर पिलर मेंटेनन्स कोणत्याही लघुउद्योजकाने ७८७५७२५३७९ या फोनवर फोन केला तर तो त्वरित फोन घेऊन उत्तर देणे कोणतीही सबब न सांगता ( जर जनमित्र रिपेअर मेंटेनन्स करत असेल तर त्याच्या सोबत असलेल्या सहाय्यक जनमित्राने कॉल घेऊन खंडित वीजपुरवठ्याची तक्रार व पत्ता नोंद करून सोबत असलेल्या जनमित्राला देणे.) जर कॉल अटेंड केला नाही तर कडक कारवाई केली जाईल असे राजेश भगत उपकार्यकारी अभियंता महावितरण यांनी आश्वासन दिले व हे इंद्रायणी नगर, स्पाईनसिटी, मोशी या तिन्ही विभागांना लागू होईल. शिफ्ट सुरु झाली कि जे कोणी जनमित्र ड्युटीवर असतील त्यांनी ड्युटीवर रुजू झाले की कंपलेट ग्रुपवर नाव पाठवून ड्युटीला कोण आहे याची कल्पना देणे ही सेवा २४ तास सातही दिवस चालू राहील.

    स्पाईन सिटी हा नवीन विभाग बनविण्यात आल्यामुळे या ठिकाणी सीडी गाडी नाही. त्यासाठी अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांनी मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांच्याकडे प्रस्ताव त्वरित पाठवून मिळवून देण्याचे आश्वासन दिले.      

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button