- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
शहर काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस प्रतिनिधींची आयुक्तांसमवेत बैठक पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रशासन शहरातील नागरिकांना सेवा, सुविधांबाबत उद्भवणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देत असून आवश्यक त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून कारवाई केली जाईल असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले. बुधवारी शहर काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस प्रतिनिधींची बैठक आयुक्तांसमवेत आयुक्तांच्या दालनात झाली. यावेळी महिला काँगेस माजी प्रदेशाध्यक्षा श्यामला सोनवणे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब मुगुटमल, अमर नाणेकर, वाहब शेख, माऊली मलशेट्टी, विश्वनाथ जगताप, विठ्ठल शिंदे, डॉ. मनिषा गरुड, सोमनाथ शेळके, हिरामण खवळे, ॲड. अशोक धायगुडे, जार्ज मॅथ्यू, शहाबुद्दीन शेख, सज्जी…
फेडरेशन पदाधिकारी, मनपा आणि पोलीस अधिकाऱ्यांची दरमहा घेणार आढावा बैठक पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी कॅम्प व परिसरातील वाहतूक समस्या आणि अतिक्रमण समस्या सुटल्यावर बहुतांशी प्रश्न मार्गी लागतील. या परिसरात चोरीच्या घटनांना पायबंद बसावा म्हणून पोलिसांच्या सूचनेनुसार व्यापाऱ्यांनी सीसीटीव्ही लावावेत, दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर अथवा पदपथावर पथारी व्यावसायिकांना बसवून त्यांच्याकडून भाडे घेऊ नये. दुकानदार सांगतील त्या पथारी व फेरीवाल्यांवर महानगरपालिकेने कारवाई करावी, परंतु छोटे व्यावसायिकांना देखील व्यवसाय करणे शक्य होईल असे समन्वयाचे धोरण सर्वांना विश्वासात घेऊन मनपा प्रशासनाने राबवावे व अशा प्रकारच्या बैठका दर महिन्यास घेऊन व्यापाऱ्यांच्या प्रश्नांचा आढावा घ्यावा अशा सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी मनपा प्रशासन…
पालिकेला मिळाल्या तब्बल १००० पेक्षा अधिक सूचना! पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- ‘अंदाजपत्रकात नागरिकांचा सहभाग’ या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आजपर्यंत पालिकेला तब्बल १००० पेक्षा अधिक सूचना प्राप्त झाल्या आहेत. ‘अंदाजपत्रकात नागरिकांचा सहभाग’ या उपक्रमाअंतर्गत नागरिकांना पिंपरी चिंचवड शहरातील विविध प्रश्न, उपाय योजना, प्रकल्प यासाठी अगदी घरबसल्या आपला सहभाग नोंदवता येणार असून नागरिकांनी ऑनलाईन माध्यमातून “PCMC Sarathi APP” द्वारे अर्ज करावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. ‘अंदाजपत्रकात नागरिकांचा सहभाग’ या उपक्रमाची…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत डूडूळगाव येथे १ हजार १९० सदनिका उभारण्यात येत आहेत. त्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील रहिवाशी असणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र लाभार्थ्यांकडून ३० ऑगस्ट २०२४ पासून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी महापालिकेकडे ऑनलाईन पद्दतीने अर्ज सादर करावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले. केंद्रशासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत डुडुळगाव येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरे बांधणे प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतील सदनिकांकरिता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील रहिवाशी असणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गात येणाऱ्या नागरिकांकडून दि.३० ऑगस्ट ते ३०…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – छत्रपती शिवाजी महाराज व सर्व महापुरुषांचे स्थापित पुतळ्यांचे स्मारकांचे तत्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करा, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे वतीने आयुक्त शेखर सिंह यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. आज पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष डॉ.कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिले. यावेळी पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष डॉ कैलास कदम, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष शहाबुद्दीन शेख, सामाजिक सलोखा अभियान चे प्रमुख राजन जी नायर, सामाजिक न्याय चे प्रदेश उपाध्यक्ष अब्दुल वहाब, अब्बूबकर लांडगे, शहर उपाध्यक्ष माजीद भाई शेख आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला हे अत्यंत वेदनादायी अन् मनाला संताप आणणारे आहे, केवळ आठ महिन्यात हा पुतळा पडतो हे अनाकलनीय आहे. मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उभारणी करताना अक्षम्य त्रुटी झाल्याचे नाकारता येत नाही. तसेच मालवण येथे सरकारने अहोरात्र काम त्वरित करून राजकोट किल्ल्यावर युगपुरूष व भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिभा आणि दैदिप्यमान शौर्याचा इतिहास सांगणारे स्मारक आणि शक्तिशाली पुतळा सरकारकडून पुन्हा उभारण्यात यावा व अशी दुर्घटना भविष्यात घडू नयेत याची खबरदारी घेण्यासाठी या प्रकरणात जे कोणी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त पिंपरी चिंचवड भाजपचे अध्यक्ष शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त माजी सरपंच स्वर्गीय गोविंदराव तांबे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये प्रथम क्रमांक प्रत्युष शर्मा द्वितीय क्रमांक इशिता गुप्ता व तृतीय क्रमांक आरुष सकपाळ यांना देण्यात आला त्यावेळेस शिवेंद्र तांबे,तात्या शिनगारे, नीरज भोसले आदी नागरिक उपस्थित होते.
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – बदलापूर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर आपल्या शहरातील मुलींच्या सुरक्षिततेबाबत कठोर उपाययोजना राबविण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी आयुक्ताकडे निवेदना द्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील अल्पवयीन मुली आणि एकूणच महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रमाणात वाढ होत आहे.सुसंस्कृत समाजात अशा गोष्टी पडणं ही अतिशय चिंताजनक बाब आहे. त्यामुळे तात्काळ महापालिकेच्या शाळांबरोबरच खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, महाविद्यालये यामध्ये सुरक्षिततेसंदर्भात खालील उपाययोजना राबविण्यात याव्यात अशी मागणी करत आहे. यावर तात्काळ अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा आहे. सर्व शाळा महाविद्यालय यामध्ये शिक्षक, पालक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, पोलीस यांची समिती स्थापन करावी,शाळांमध्ये विद्यार्थ्यांना…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महावितरणच्या स्पाईन सिटी नवीन विभागा अंतर्गत जाधववाडी चिखली येथे सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नव्याने तयार करण्यात आलेल्या स्पाईन सिटी विभागांतर्गत जाधववाडी फिडर वरील लघुउद्योजकांना महावितरण विषयी भेडसावणाऱ्या विविध समस्या व वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्या संदर्भात पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या संचालक मंडळासह महावितरण अभियंता यांच्या समवेत बैठकीचे जाधववाडी चिखली येथे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे संचालक प्रमोद राणे, नवनाथ वायाळ, भारत नरवडे, संदीप वहिले तसेच महावितरण तर्फे नवीन रुजू झालेले उपकार्यकारी अभियंता राजेश भगत, सहाय्यक अभियंता रामप्रसाद नरवडे, अतिरिक्त कार्यभार असलेले सिंह साहेब…
पनवेल,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल विभागातील सिडकोच्या अख्यत्यारित येणा-या भागातील नागरिकांच्या समस्यांचे तत्काळ निराकरण करावे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नादुरुस्त आहेत. त्या प्रकल्पांचे नूतनीकरण करुन पनवेल महापालिकेकडे हस्तांतरित करावेत, सेंट्रल पार्क विकसीत करावे, अशा सूचना मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी अधिका-यांना केल्या. सिडको क्षेत्रामध्ये अनेक समस्या असून नागरिक त्रस्त आहेत. नागरिकांनी या समस्यांबाबत खासदार बारणे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार बारणे यांनी बेलापूर येथील सिडकोच्या कार्यालयात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगला यांच्यासोबत बैठक घेतली. त्यावेळी सहव्यस्थापकीय संचालक गणेश देशमुख, सहव्यस्थापकीय संचालक दिलीप ढोले, एन. एम. मानकर, मुख्य अभियंता बायस, मुख्य भूमी अभिलेख अधिकारी शीला कुरुणाकरन, पाणीपुरवठा अधिक्षक…
