Author: maharashtrabreakingnews.com

– सोसायटी फेडरेशनचा यशस्वी पाठपुरावा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) सेक्टर 12 मधील पी.एम.ए.वाय.(प्रधान मंत्री आवास योजना) गृहप्रकल्पातील 5000 सदस्यांचे क्लब हाऊस आणि मैला शुद्धीकरण प्रकल्प याबाबत वर्षांभर चाललेल्या अडचणी अखेर मार्गी लागल्या आहेत. प्राधिकरणाने चुकीच्या पद्धतीने क्लब हाऊस महानगरपालिकेकडे हस्तांतरित केल्याने सोसायटीधारकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता. तसेच, 45 सहकारी गृहरचना संस्थांसाठी बसवण्यात आलेल्या सिंपल ट्रीटमेंट प्लांट (STP) ला सोसायटीकडून हस्तांतर न मिळाल्यामुळे प्रकल्प बंद होता. त्यामुळे पाणी टंचाईसह परिसरात दुर्गंधी पसरली होती. या समस्यांवर उपाय करण्यासाठी चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन मार्फत आज महानगर आयुक्त योगेश म्हसे यांच्याशी बैठकीत चर्चा…

Read More

मान्यवरांच्या उपस्थितीत रंगणार दिमाखदार सोहळा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना तिसऱ्या “पिंपरी चिंचवड सन्मान – २०२६” पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. समाजजीवन, कला, साहित्य, पर्यावरण, क्रीडा, शेती आणि शैक्षणिक क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना यंदा सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. यंदाचे पुरस्कार्थी पुढीलप्रमाणे : अथर्व अभय कुलकर्णी (कला व संगीत), अरुण पुराणिक (पर्यावरण संवर्धन), डॉ. राजेंद्र काकंरिया (साहित्य व शिक्षण), अनिल मित्तल (उद्योग व सामाजिक कार्य), संतोष खवळे (कृषी), कृष्णा ढोकले (गिर्यारोहण व साहसी क्रीडा), श्लोक ताम्हाणे (राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक), श्रीकांत चौगुले (निवेदन व लेखन), पांडुरंग वाघमारे (शैक्षणिक…

Read More

पुणे, (महाराष्ट्र  ब्रेकिंग न्यूज) –  धूलीवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील पुणेमेट्रोची प्रवासी सेवा ३ मार्च २०२६ रोजी सकाळी ६.०० ते दुपारी ३.०० या वेळेत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. मेट्रो प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी ३.०० नंतर ते रात्री ११.०० पर्यंत मेट्रो सेवा नियमित वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन त्यानुसार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मेट्रो प्रशासनाने प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगीर व्यक्त केली असून, सणाच्या काळात सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. प्रवाशांसाठी सूचना -सकाळी ६.०० ते दुपारी ३.०० : मेट्रो सेवा बंद -दुपारी ३.०० ते रात्री ११.०० : मेट्रो…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फॉउंडेशन संचलित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल रहाटणी येथे मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी मराठी दिवस 27 फेब्रुवारी अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शाळेतील पालक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी अर्चन मिटकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात सूत्रसंचालन सारिका देशमुख यांनी प्रभावी शब्दांत केली. त्यानंतर सर्व शिक्षकवृंदांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. इयत्ता ७ वीतील विश्वजीत काटे याने सादर केलेल्या जोशपूर्ण पोवाड्याने कार्यक्रमात उत्साह निर्माण केला. त्यानंतर निशा मॅम यांनी मराठी भाषेचे महत्त्व विशद करणारे अभ्यासपूर्ण भाषण केले. इयत्ता ९ वीतील शर्वरी काटे व दीपिका राठोड यांनी मराठी भाषेवरील आपले विचार प्रभावीपणे मांडले. इयत्ता ८ वीतील मानिषा चौधरी व स्वामिनी…

Read More

– कामगारांकडून पेढे वाटून अन्‌ फटाके फोडून करारानंतर आनंदोत्सव पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महिंद्रा लॉजिस्टिक लि. आणि स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यातील तिसरा वेतनवाढ करार संपन्न झाला असून, हा लॉजिस्टिक उद्योगातील इतिहासातील सर्वात मोठा विक्रमी करार ठरला आहे. हा करार  चाकण औद्योगिक वसाहतीत निघोजे येथील कंपनीच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात औपचारिक केला गेला.या करारानंतर कामगारांनी समाधान व्यक्त केले आहे. करार सोहळ्यात संघटनेच्या वतीने प्रमुख सल्लागार आमदार महेश लांडगे, रोहिदास गाडे, अध्यक्ष जीवन येळवंडे, तसेच कंपनीकडून असोसिएट व्हा. प्रेसिडेंट एच. आर. संजय गावडे आणि असिस्टंट व्हा. प्रेसिडेंट एच. आर. प्रदीप झोटिंग प्रमुख उपस्थित होते. करारातील प्रमुख सुविधा पुढीलप्रमाणे आहेत. यामध्ये…

Read More

   पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – गुणवंत कामगार कल्याण मंडळाचा ६ वा वर्धापन दिन व जागतिक मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने औद्योगिक नगरीत आयोजित कविंसंमेलनात आज खऱ्या अर्थाने श्रम संस्कृती आणि शब्द संस्कृतीचा आविष्कार झाला.असे मला वाटते.”असे प्रतिपादन ज्येष्ठ  साहित्यिक,कामगार नेते अरुण बोऱ्हाडे यांनी केले.      गुणवंत कामगार कल्याण मंडळाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कविसंमेलनात ते बोलत होते.बिना इंग्लिश मीडियम स्कूल,आकुर्डी येथे संपन्न झालेल्या या संमेलनात प्रवचनकार नलिनीताई राजहंस आणि बिना इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष आजम खान साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.त्यावेळी मंडळाच्या अध्यक्षा डॉ.भारती चव्हाण,शब्दधन काव्यमंचचे सुरेश कंक,नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाचे राज अहेरराव,विधीज्ञ अंतरा देशपांडे,मंडळाचे विभागीय पदाधिकारी…

Read More

 अभिषेक बारणे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापती पदाचा स्वीकारला कारभार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या सभापती पदी निवड झाल्यानंतर अभिषेक बारणे यांनी आज आपल्या पदाचा अधिकृत कार्यभार स्वीकारला. महापालिका भवनातील स्थायी समिती सभापतींच्या दालनात हा पदभार स्वीकारण्याचा सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी चिंचवड विधानसभेचे आमदार शंकरभाऊ जगताप यांनी नवनिर्वाचित सभापती अभिषेक बारणे यांचे पुष्पगुच्छ देऊन विशेष अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पदभार स्वीकारल्यानंतर नवनिर्वाचित सभापती अभिषेक बारणे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार वेगाने होत असून नागरिकांच्या अपेक्षाही वाढत आहेत, अशा परिस्थितीत स्थायी समितीची…

Read More

विधी समिती सभापतीपदी सुजाता बोराटे, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी राणी पठारे, शहर सुधारणा समिती सभापतीपदी संजय नाना काटे, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापतीपदी कैलास कुटे आणि शिक्षण समिती सभापतीपदी रविना आंगोळकर यांची निवड पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध समितींच्या सभापतीपदाची निवडणूक आज पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामधील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृह येथे संपन्न झाली. यामध्ये विधी समिती सभापतीपदी सुजाता बोराटे, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी राणी पठारे, शहर सुधारणा समिती सभापतीपदी संजय नाना काटे, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापतीपदी कैलास कुटे आणि शिक्षण समिती सभापतीपदी रविना आंगोळकर यांची…

Read More

दिग्गज कलाकारांची उद्घाटनाला असणार उपस्थिती जास्तीत जास्त चित्रपट प्रेमींनी या आंतरराष्ट्रीय महोत्सवाचा लाभ घेण्याचे महापौर रवि लांडगे यांचे आवाहन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सहकार्याने आणि पिंपरी चिंचवड फिल्म सोसायटी व गाथा फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय महोत्सव २०२६ चे आयोजन ३ ते ५ मार्च २०२६ या कालावधीत आकुर्डी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे करण्यात आले आहे. हा महोत्सव सकाळी १० वाजलेपासून सर्वांसाठी विनामूल्य असून जास्तीत जास्त चित्रपट प्रेमींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले आहे. पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६ चे उद्घाटन मंगळवार, ३ मार्च…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपळे गुरव येथील शाळा क्रमांक ५४ मध्ये महापौर रवि लांडगे यांच्या संकल्पनेतून पर्यावरणपूरक होळी उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याबाबत जनजागृती व्हावी आणि सणांच्या माध्यमातून मूल्यशिक्षण रुजवावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी महापौर रवि लांडगे यांनी विद्यार्थ्यांना होळी सणाचे सांस्कृतिक, सामाजिक आणि पौराणिक महत्त्व समजावून सांगितले. होळीनंतर बदलणारे ऋतुचक्र, निसर्गाशी असलेले आपले नाते, तसेच भारतीय संस्कृतीत सणांचे असलेले स्थान याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. ‘होळी हा केवळ रंगांचा सण नसून वाईट प्रवृत्तींचा त्याग करून चांगल्या विचारांचा स्वीकार करण्याचा सण आहे,’ असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक विचारांची…

Read More