पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – धूलीवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील पुणेमेट्रोची प्रवासी सेवा ३ मार्च २०२६ रोजी सकाळी ६.०० ते दुपारी ३.०० या वेळेत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. मेट्रो प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी ३.०० नंतर ते रात्री ११.०० पर्यंत मेट्रो सेवा नियमित वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन त्यानुसार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मेट्रो प्रशासनाने प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगीर व्यक्त केली असून, सणाच्या काळात सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
प्रवाशांसाठी सूचना
-सकाळी ६.०० ते दुपारी ३.०० : मेट्रो सेवा बंद
-दुपारी ३.०० ते रात्री ११.०० : मेट्रो सेवा नियमित सुरू
-पर्यायी प्रवासासाठी PMPML बस किंवा इतर वाहतूक साधनांचा वापर करण्याचे आवाहन

