पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गुणवंत कामगार कल्याण मंडळाचा ६ वा वर्धापन दिन व जागतिक मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने औद्योगिक नगरीत आयोजित कविंसंमेलनात आज खऱ्या अर्थाने श्रम संस्कृती आणि शब्द संस्कृतीचा आविष्कार झाला.असे मला वाटते.”असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक,कामगार नेते अरुण बोऱ्हाडे यांनी केले.
गुणवंत कामगार कल्याण मंडळाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कविसंमेलनात ते बोलत होते.बिना इंग्लिश मीडियम स्कूल,आकुर्डी येथे संपन्न झालेल्या या संमेलनात प्रवचनकार नलिनीताई राजहंस आणि बिना इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष आजम खान साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.त्यावेळी मंडळाच्या अध्यक्षा डॉ.भारती चव्हाण,शब्दधन काव्यमंचचे सुरेश कंक,नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाचे राज अहेरराव,विधीज्ञ अंतरा देशपांडे,मंडळाचे विभागीय पदाधिकारी प्रकाश शिंदे,शंकर नाणेकर,संपत खैरे,राज्यस्तरीय कोअर समितीचे सर्व पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की,” कायम कामगारांची संकल्पना संपुष्टात येत असून कंत्राटी कामगारांची भरती मोठ्या प्रमाणात होत आहे.त्यामुळे देशात कामगारांचे भवितव्य अंधकारमय होत आहे.अशा परिस्थितीत कवीने कवितेतून मांडलेल्या श्रमिकांच्या व्यथा वरिष्ठ व्यवस्थेपर्यंत जाणे गरजेचे आहे.”
मराठी भाषा आणि काव्यनिर्मिती यावर बोलताना प्रमुख पाहुणे नलिनीताई राजहंस म्हणाल्या की, “कामगार हाच उद्योगाचा आधारस्तंभ आहे. यंत्राच्या मागे धावत असताना तो कवितेतही रममान होत आहे.यामुळे मराठी भाषेतील अभिजात आविष्कार अभिजनापर्यंत पोहोचण्यास मदत होईल.”
गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या प्रेरणास्थान आणि संस्थापिका,अध्यक्षा डॉ.भारती चव्हाण यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून म्हणाल्या की,”सामाजिक आशयाला चालना देणारी आणि सर्वांना खिळवून ठेवणारी कविता असावी.शिवाय कविता ही केवळ अर्थपूर्ण असून चालत नाही,तर तिचे सादरीकरणही तितकेच प्रभावी असावे.”
ग्रंथपूजन आणि सरस्वती पूजनाने कविसंमेलनाची सुरुवात झाली.त्यावेळी प्रदीप गांधलीकर,हेमंत जोशी,रेणुका हजारे,जयश्री श्रीखंडे,तानाजी एकोंडे,सुरेश कंक,शोभा जोशी,नामदेव हुले,सतीश कांबळे,बाळासाहेब साळुंके, नामदेव हुले,सुलभा सत्तुरवार,राजेंद्र वाघ,राज अहेरराव,आण्णा जोगदंड,महेंद्र गायकवाड,अरुण कांबळे,कैलास भैरट,श्रीकांत कदम,प्रतिमा काळे,शामराव सरकाळे,सुभाष चटणे,यासह जवळपास ३१ कवींनी आशयघन अशा कविता सादर केल्या.
तानाजी एकोंडे,बाळासाहेब साळुंके,महेंद्र गायकवाड,नंदकुमार धुमाळ,महंमदशरीफ मुलाणी,राजेश हजारे,संजय गोळे,आण्णा जोगदंड,भरत शिंदे,संपत खैरे,शंकर नाणेकर,पांडुरंग सुतार यांनी संयोजन केले.
बाळासाहेब साळुंके यांनी प्रास्ताविक केले.तानाजी एकोंडे आणि सीमा गांधी यांनी बहारदार सूत्रसंचालन करून कविंसंमेलनात रंग भरला.राजेश हजारे यांनी आभार मानले.

