- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
– अभियांत्रिकी विद्यार्थी ते अंतराळापर्यंतचा प्रवास प्रेरणादायी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सर्वसामान्य कामगार कुटुंबात जन्माला आलेली तेजस्वी शिंदे हिने अभियांत्रिकी शाखेची विद्यार्थीनी ते अंतराळ संशोधनापर्यंतचा प्रवास यशस्वी केला आहे. पिंपरी-चिंचवडकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे, अशी भावना भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली. भोसरी येथील तेजस्वी शिंदे ही विद्यार्थिनी राष्ट्रीय वैमानिक आणि अंतराळ प्रशासन (NASA) मधील कॉन्फरन्स यशस्वी पूर्ण केली. युएसएमधील कॉलोराडो येथे तिची पोस्ट डॉक्टरल साठी निवड झाली आहे. आज तेजस्वी शिंदे भारतात परतली. त्यावेळी कुटुंबियांसह आमदार लांडगे यांनी तिचे निवासस्थानी स्वागत केले. यावेळी तिचे आई-वडील आणि कुटुंबीय उपस्थित होते. तेजस्वी शिंदे हिच्या प्रवासाची सुरुवात मेकॅनिकल…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – रहाटणी येथील लक्ष्मी भक्ती सोसायटी गेली अनेक वर्षे संपूर्ण वर्षभर सोसायटी चे सर्व सभासद एकत्र येऊन प्रजासत्ताक दिन,होळी,धुलिवंदन, दहीहंडी, स्वातंत्र्य दिन,नवरात्री गरबा, दसरा कोजागिरी, तसेच गणेशोत्सव असे विविध सण साजरे करतात तसेच करोना च्या काळात आसपास भागात जर करोना पेशंट घरीच कोरंनटाईन होत असत अशा पेशंटचया घरी विनामूल्य मदत केली जात होती.या वर्षी विशेष म्हणजे सोसायटीने प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सोसायटी मध्ये सफाई कर्मचारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले होते. या सोसायटीत च्या माध्यमातून रहाटणी पिंपळे सौदागर या भागात एक विशेष उल्लेखनीय उपक्रम राबविण्यात येतो तो म्हणजे एक मुठी अनाज या उपक्रमाला या भागातील जवळ…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – टाळ मृदंगाचा गजर, लेझीम, लाठीकाठी, आदिवासी नृत्य, बंजारा नृत्य, विविध कसरती आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या गणरायाला विद्यार्थी, शिक्षकांनी जड अंत:करणाने निरोप दिला. गणरायाला निरोप देण्यासाठी विद्यार्थ्यांनी जुनी सांगवीतून बाप्पाची मिरवणूक काढली. ही विसर्जन मिरवणूक शितोळेनगर, गजानन महाराज मंदिर, संविधान चौकामार्गे अहिल्याबाई होळकर घाटावर आली. गणपतीची आरती करून गणरायाला जड अंतःकरणाने निरोप दिला. दरम्यान, ‘गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला, गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. आकर्षक फुलांची सजावट, विद्यार्थ्यांचा पांढरा ड्रेस कोड नागरिकांचे लक्ष आकर्षून घेत होता. रस्त्याच्या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – बोधिसत्व प्रतिष्ठान शिक्षण संस्था संचालित राजर्षी शाहू महाराज विद्यालयामध्ये आज शिक्षक-पालक सहविचार सभा व OPEN DAY संपन्न झाला. सभेच्या अध्यक्षस्थानी बोधिसत्व प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष गोकुळजी गायकवाड साहेब होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सन्माननीय सचिव एल.एस.कांबळे उपस्थित होते. त्याचप्रमाणे शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष पोपट आरणे , विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबाजी शिंदे व आदी पालकवर्ग उपस्थित होता. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर शिक्षक-पालक संघाची स्थापना करण्यात आली. शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा पोपट आरणे साहेब यांची नियुक्ती करण्यात आली. शिक्षक प्रतिनिधी म्हणून सौ. कोमल…
स्पर्धा परिक्षांची तयारी करा पदवी व पदव्युत्तर शिक्षणामध्येच पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे सध्याच्या युगात केंद्रीय लोकसेवा आयोग(युपीएससी) किंवा राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) यांसारख्या स्पर्धापरिक्षांचा अभ्यास करणे, म्हणजे मायाजाळात फसण्यासारखे समजले जाते. बऱ्याचदा प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्पप्न उराशी बाळगुण, दरवर्षी लाखो विद्यार्थी कुठल्याही बॅकअप प्लॅनशिवाय स्पर्धापरिक्षांचा अभ्यास करतात. त्यात, पदवीपासूनच स्पर्धापरिक्षांच्या योग्य मार्गदर्शनाचा अभाव, अनेक प्रयत्नांनंतरही आलेले अपयश, वाढते वय या सर्व गोष्टींमुळे विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास होतो. ही समस्या ओळखूनच विद्यार्थ्यांच्या प्रशासकीय अधिकारी होणाच्या स्पप्नांना यशस्वीतेचे पंख लावण्याचा संकल्प एमआयटी एडीटी सारख्या अग्रगण्य विद्यापीठाने केला आहे, असे मत , एमआयटी स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे (एसआयसीएस) संचालक डॉ.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सालाबाद प्रमाणे गणपती विसर्जन मिवणुकीसाठी पिंपरी चिंचवड व्यापारी वर्ग देखील सज्ज झालेला आहे. या गणेश उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पिंपरी कॅम्प, मार्केट येथील पिंपरी मर्चंट फेडरेशनचे सर्व व्यापारी सभासद या उत्सवात सहभागी होणार आहेत. गणपती विसर्जन मिरवणूक निमित्त सोमवारी, मंगळवारी संध्याकाळी मोठी भाविकांची गर्दी होइल. वाहतुकीस अडथळा होऊ नये व सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि व्यापाऱ्यांना देखील या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी सोमवारी आणि मंगळवारी (दि. १६ व १७) सायंकाळी सहा नंतर व्यापारी उस्फूर्तपणे दुकाने बंद ठेवणार आहेत अशी माहिती पिंपरी मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवानी यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत गुरुवार, दिनांक १२ सप्टेंबर रोजी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील चिखली, कुडळवाडी व तळवडे परिसरातील व्यावसायिक मालमत्ताधारकांना ‘अग्निसुरक्षितता पूर्तता प्रमाणपतत्र’ प्राप्त करून घेण्याची प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रांची माहिती देण्यासाठी चिखली, सोनवणे वस्ती येथील ‘टाऊन हॉल’ येथे मार्गदर्शन शिबिर पार पडले. याप्रसंगी अग्निशमन विभागाचे उपायुक्त, मनोज लोणकर, उप अग्निशमन अधिकारी बाळासाहेब वैद्य यांनी व्यावसायिकांना मार्गदर्शन केले. मार्गदर्शन शिबिरामध्ये व्यावसायिक मालमत्ताधारकांना ‘अग्निसुरक्षितता पूर्तता प्रमाणपत्र’ प्राप्त करून घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांबाबत माहिती देण्यात आली. त्याचबरोबर, शिबिरामध्ये व्यावसायिक मालमत्ताधारकांच्या अडचणींचा तत्काळ निरसन करण्यात आले. व्यावसायिक मालमत्ताधारकांना अग्निशमन उपकरणे हाताळण्याची पद्धती, व्यावसायिक मालमत्ता अग्निसुरक्षेच्या दृष्टीने पूर्ण सुरक्षित करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची व यंत्रणांची इत्थंभूत माहिती देण्यात आली. आत्तापर्यंत ५,०९३ व्यावसायिक मालमत्ताधारकांना नोटिस…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि आरोग्यदायी शिक्षणाचे वातावरण निर्माण करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी शालेय सुरक्षा, आरोग्य, अन्न गुणवत्ता आणि स्वच्छता या सर्व बाबींवर गांभीर्याने लक्ष देऊन विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यावर मुख्याध्यापकांनी भर द्यावा. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तक्रार असल्यास त्वरित सारथी पोर्टलवर तक्रार नोंदवावी, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिल्या. महापालिकेच्या सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांसोबत चिंचवड येथील ऑटोक्लस्टर येथे संवादसत्राचे आयोजन महापालिकेच्या वतीने करण्यात आले होते. या संवादसत्रात बोलताना अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी संबंधित विभागप्रमुख, अधिकारी व मुख्याध्यापकांना विविध सूचना केल्या, त्यावेळी ते बोलत होते.…
पिंपरीमध्ये वैभवनगर येथे गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम हौद पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सण, उत्सव हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. यातील गणेश उत्सव महाराष्ट्र बरोबरच जागतिक स्तरावर भक्ती भावाने साजरा केला जातो. असे उत्सव साजरे करीत असताना मांगल्य व पावित्र्य जपत पर्यावरणाचे रक्षण करीत समाजभान ठेवावे असे आवाहन युवा नेते पार्थ पवार यांनी केले. पिंपरी गावातील वैभवनगर येथे विजय आसवानी यांच्या संकल्पनेतून आसवानी असोसिएटस् आणि ॲस्पीफ्लाय इनव्हायरमेंट या संस्थेच्या वतीने गतवर्षी प्रमाणे खासगी जागेत गणेश मूर्ती विसर्जनासाठी लहान, मोठ्या आकाराचे दोन हौद करण्यात आले आहेत. त्यांचे उद्घाटन पार्थ पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उद्योजक राजूशेठ…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – गणेश विसर्जनासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज असून शहरातील प्रमुख गणेश विसर्जन घाटांवर महापालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही याची दक्षता संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे निर्देश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी प्रशासनाला दिले आहेत. गणेशोत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा करताना नागरिकांनी पर्यावरणाचीही काळजी घ्यावी, असे आवाहनही आयुक्त सिंह यांनी केले आहे. सांगवी येथे आज गणेश विसर्जन होत असून पोलीस प्रशासन आणि महापालिकेच्या संयुक्त पथकाने सांगवीतील सर्व विसर्जन घाटांवर प्रत्यक्ष पाहणी करून स्वच्छता आणि सुरक्षेचा आढावा घेतला. या पथकात सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य…
