ताज्या घडामोडीपिंपरी

समाजभान ठेवून उत्सव साजरे करा – पार्थ पवार 

Spread the love
पिंपरीमध्ये वैभवनगर येथे गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम हौद
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सण, उत्सव हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. यातील गणेश उत्सव महाराष्ट्र बरोबरच जागतिक स्तरावर भक्ती भावाने साजरा केला जातो. असे उत्सव साजरे करीत असताना मांगल्य व पावित्र्य जपत पर्यावरणाचे रक्षण करीत समाजभान ठेवावे असे आवाहन युवा नेते पार्थ पवार यांनी केले.
     पिंपरी गावातील वैभवनगर येथे विजय आसवानी यांच्या संकल्पनेतून आसवानी असोसिएटस्‌ आणि ॲस्पीफ्लाय इनव्हायरमेंट या संस्थेच्या वतीने गतवर्षी प्रमाणे खासगी जागेत गणेश मूर्ती विसर्जनासाठी लहान, मोठ्या आकाराचे दोन हौद करण्यात आले आहेत. त्यांचे उद्घाटन पार्थ पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उद्योजक राजूशेठ आसवानी, माजी नगरसेवक हिरानंद उर्फ डब्बू आसवानी, उद्योजक राजू आसवानी, श्रीचंद आसवानी, सतीश आसवानी, अनिल आसवानी, विजय आसवानी, अमर कुकरेजा, हितेश बटवा, हिरो मदयानी, सुनील चूगवानी, हरेश सेवानी, अविनाश इसरानी, फजल शेख आदी उपस्थित होते.
      सण, उत्सव साजरे करीत असताना पर्यावरणाचे रक्षण व्हावे व गणेशोत्सव काळात नदी नाल्यांचे प्रदूषण होऊ नये. यासाठी यावर्षी देखील पिंपरी, वैभव नगर येथे कृत्रिम हौद उभारण्यात आले आहेत. येथे गणेश मूर्ती विसर्जित कराव्यात. विसर्जनाच्या वेळी श्रींच्या आरतीसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. महापालिकेच्या वतीने पाणी व निर्माल्यकुंड दिले आहे. संयोजकांच्या वतीने विद्युत व्यवस्था व स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच खासगी अनुभवी जीवरक्षक नेमण्यात आले आहेत. जीवरक्षक विधीवत पध्दतीने या हौदांमध्ये मृर्ती विसर्जन करतात असे संयोजक विजय आसवानी यांनी सांगितले. स्वागत श्रीचंद आसवानी, तर आभार विजय आसवानी यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button