- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – काळेवाडी येथील पत्राशेड वरती कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेच्या पथकाला विरोध करून माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी नागरिकांना दिलासा दिला आहे. आज काळेवाडी येथील बांधकामावरती कारवाई होणार असल्याची माहिती माजी नगरसेवक संतोष कोकणे यांनी नाना काटे यांना दिली. यानंतर तात्काळ नाना काटे यांनी घटनास्थळी धाव घेऊन कारवाई थांबवली, यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरवर्षी पावसाळ्यात पवना नदीला पूर येतो. निळ्या पूर रेषेतील बांधकामावरती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रम विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. आज काळेवाडी येथील नदीलगत असणाऱ्या स्पाईन रोड लगत बांधकामावरील कारवाई करण्यात येणार होती. यासाठी पिंपरी चिंचवड अतिक्रमण विभागाच्या पथक सर्व यंत्रणासह दाखल झाले.…
यशस्वी विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड जाहीर पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय आणि पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयीन मुले, मुलींच्या पोहण्याच्या स्पर्धा बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांची विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. यामध्ये पृथ्वीराज चव्हाण (पीसीसीओई निगडी), अवधूत मोरे (कॉलेज ऑफ फार्मसी माळेगाव), शुभम धायगुडे (बीजी कॉलेज सांगवी), पार्थ चोपकर (बीजी कॉलेज, सांगवी), अथर्व भाकरे (एमपी कॉलेज पिंपरी), विशाल नरवडे (बीजी कॉलेज सांगवी), दीक्षा यादव (बीजी कॉलेज सांगवी), गरिमा कुशवाहा (इंदिरा कॉलेज परंदवडी), श्वेता कुऱ्हाडे (बीजी…
एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आर्किटेक्ट हा लोकांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करणारा सूत्रधार असतो. वास्तूशास्त्राचे शिक्षण घेताना नवनवीन संकल्पना, तंत्रज्ञानातील कौशल्य आत्मसात करा. इतरांशी स्पर्धा करू नका. अभ्यासाचा मनावर ताण येणार नाही याची काळजी घ्या. सकारात्मक विचार करा. पालक, शिक्षक, वर्गमित्र यांच्याशी संवाद साधा. निसर्ग ही एक साखळी असून आपण या साखळीतील एक भाग आहोत हे लक्षात ठेवा. चांगले कार्य करत राहिल्यास तुमच्या आयुष्यात चांगले दिवस, चांगले कार्य हातून घडेल. त्यासाठी उत्तम मार्गदर्शक, अनुभवी गुरूंची आवश्यकता असते. गुरुंच्या मार्गदर्शनाखाली काम करा. तुम्ही नक्की यशस्वी वास्तूविशारद व्हाल, असे मार्गदर्शन डीप्रूट्स…
महसुल कायद्यामध्ये सुधारणा व्हाव्यात. त्यासाठी सेवानिवृत्त जेष्ठ सनदी अधिकारी उमांकांत दांगट यांच्या समितीने अहवालात सुचवलेल्या सूचनांची अंमलबजावणी त्वरित व्हावी. तसेच राज्यातील प्रत्येक तालुका आणि जिल्हा पातळीवर महसुल न्यायालय स्थापन करण्यात यावं, अशी मागणी भाजपा पिं. चिं. शहर (जिल्हा) कायदा आघाडीचे शहराध्यक्ष अॅड. गोरखनाथ झोळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह राज्याचे महसुल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, न्यायालयाच्या सुचनेनुसार राज्य सरकारने जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत सन १९४७ च्या (तुकडेबंदी) कायद्यासंबंधी महसुल अधिनियमामध्ये सुधारणा करण्यासाठी समिती गठीत केली होती. त्यासाठी सेवानिवृत्त जेष्ठ…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – वेगवेगळ्या कलागुणांच्या माध्यमातून स्पर्धकांनी आपल्या अंगीभूत कला सादर करून स्वतःला व्यक्त केले व सहभाग घेतल्याचा आनंद अनुभवला. या आनंदमधूनच या पुढेही विध्यार्थ्यांनी कलागुणांमध्ये प्राविण्य मिळवावे असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत विद्यार्थी विकास मंडळातर्फे प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जल्लोष 2024 युवक महोत्सव’ विभागीय अंतर महाविद्यालयीन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मा. प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ पराग काळकर हे उपस्थित होते. पारितोषिक वितरण समारंभाच्या प्रसंगी व्यासपीठावरती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक…
निळ्या पूररेषेत बांधकामे असणाऱ्या लाखो नागरिकांना दिलासा सांगवी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सांगवीतील पवना नदीलगतच्या निळ्या पूररेषेअंतर्गत असलेल्या निवासी आणि व्यावसायिक बांधकामांवरील कारवाईस अखेर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह आज (मंगळवारी) स्थगिती दिली. भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या विनंतीवरून झालेल्या या निर्णयामुळे लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरवर्षी नदीला पूर आल्यानंतर नदीपात्रा लगतच्या भागात पुराचे पाणी शिरते. त्यामुळे तेथील रहिवाशांना स्थलांतरित करावे लागते. पुराचा धोका असल्यामुळे निळ्या पूररेषेतील बांधकामामुळे मोठी दुर्घटना घडण्याची भीती असल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या वतीने अतिक्रमण कारवाई करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला होता. या पार्श्वभूमीवर भाजपच्या शिष्टमंडळाने शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या…
चिंचवडच्या जागेसाठी भाजपविरोधाबरोबरच राष्ट्रवादीतही बंड! चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- मागील चार निवडणुकीत पराभूत झालेल्या चेहऱ्यांना पुन्हा संधी देऊ नये. न चालणाऱ्या घोड्याएवजी चालणाऱ्या घोडयांना उमेदवारी द्या. चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या उमेदवारी बाबत मोरेश्वर भोंडवे यांचा नेमकी रोख कोणाकडे याकडे लक्ष आहे. माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, प्रशांत शितोळे, मयूर कलाटे, विनोद नढे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली. याबाबत प्रशांत शितोळे म्हणाले की, चिंचवड विधानसभा मतदारसंघात आम्ही चांगला उमेदवार देणार आहोत. नवखा चेहरा देणार आहोत. या जागेवर आमचा हक्क आहे. पुढील दिशा ठरविण्याची वेळ आली तर ठरवू शकतो. पोटनिवडणुकीनंतर चिंचवडमधील राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – अटल सेतू, मुंबई-पुणे महामार्ग मिसिंग लिंक सारख्या प्रकल्पांमुळे पुणे आणि मुंबई ही महानगरे जवळ आली आहेत. त्याचा परिणाम म्हणून पुणे परिसरात मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे. विकास प्रक्रियेच्या नियोजनाची जबाबदारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची असून प्राधिकरणाने पुणे शहराची सांस्कृतिक शहर म्हणून ओळख कायम ठेऊन शहराचा विकास व्हावा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षेतखाली आज पुणे महानगर विकास प्राधिकरणाची बैठक पार पडली. बैठकीत पीएमआरडीएच्या ३ हजार ८३८ कोटी ६१ लाखांच्या अर्थसंकल्पास मंजूरी देण्यात आली. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस मुख्य सचिव सुजाता सौनिक, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ.…
शहरातील खड्ड्यांवरून भाजपच्या कारभारावर सोडलं टीकास्र… पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – – पिंपरी चिंचवड महापालिकेत एकहाती सत्ता असताना भाजपच्या नगरसेवकांनी फक्त पदपथ उभारण्यातच धन्यता मांडली. त्याचाच कित्ता आता पालिका प्रशासनदेखील गिरवताना दिसत आहे. कोणतेच काम धड नाही. सर्वत्रच खड्ड्यांचे साम्राज्य बनल्यामुळे नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीचा भकास कारभार चहाटयावर आला आहे. गुरुवारी (दि. २६) रोजी देशाचे पंतप्रधान आणि स्मार्ट सिटीचे जनक नरेंद्र मोदीसाहेब पुण्यात येणार आहेत. त्यांनी काहीसा वेळ काढून पुणे शहराच्या जुळ्या पिंपरी चिंचवड शहराला भेट द्यावी. महागड्या वाहनातून फेरफटका न मारता रिक्षातून विनामुल्य शहरातील खड्डेसफारीचा आनंद घ्यावा. त्यासाठी माझं देशाच्या पंतप्रधान साहेबांना जाहीर…
– पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडून निविदा प्रक्रिया सुरू – भाजपा आमदार महेश लांडगे यांचा आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून मोशी येथे आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून, निविदा प्रक्रिया पूर्ण करुन कामाला सुरूवात करण्यात येणार आहे. भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी-चिंचवडला स्पोर्ट्स हब बनवण्याचा संकल्प केला होता. त्याअनुशंगाने विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय क्रीडा संकूल उभारण्यासाठी त्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. त्याला यश मिळाले आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अंतर्गत मौजे मोशी येथे गट क्र. ४४२ पै. व गट क्र.…
