ताज्या घडामोडीपिंपरीशिक्षण
पीसीसीओई आयोजित आंतर महाविद्यालयीन पोहणे स्पर्धा संपन्न
यशस्वी विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड जाहीर
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय आणि पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयीन मुले, मुलींच्या पोहण्याच्या स्पर्धा बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांची विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. यामध्ये पृथ्वीराज चव्हाण (पीसीसीओई निगडी), अवधूत मोरे (कॉलेज ऑफ फार्मसी माळेगाव), शुभम धायगुडे (बीजी कॉलेज सांगवी), पार्थ चोपकर (बीजी कॉलेज, सांगवी), अथर्व भाकरे (एमपी कॉलेज पिंपरी), विशाल नरवडे (बीजी कॉलेज सांगवी), दीक्षा यादव (बीजी कॉलेज सांगवी), गरिमा कुशवाहा (इंदिरा कॉलेज परंदवडी), श्वेता कुऱ्हाडे (बीजी कॉलेज सांगवी), सायली झुंजाड (सिटी बोरा कॉलेज शिरूर), भक्ती वाडकर (बीजी कॉलेज सांगवी) यांचा समावेश आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे अध्यक्ष डॉ. महेंद्र अवघडे, सचिव डॉ. उमेशराज पनेरू, उपसचिव डॉ. ऋषिकेश कुंभार यांच्या उपस्थित करण्यात आले. स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातील २५ महाविद्यालयातील मुले, मुलींनी सहभाग घेतला होता.
विजयी झालेल्या खेळाडूंना माजी संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ. दीपक माने यांच्या हस्ते गौरवण्यात आले. निगडी, पीसीसीओई महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. संतोष पाचारणे यांनी स्पर्धा संयोजनात सहभाग घेतला.
यशस्वी स्पर्धकांचे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.