ताज्या घडामोडीचिंचवडपिंपरी

चिंचवड विधानसभेत न चालणाऱ्या घोड्यांऐवजी नव्या दमाच्या घोड्यांना संधी द्या! माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांचा नेमका रोख कोणाकडे?

Spread the love

 

चिंचवडच्या जागेसाठी भाजपविरोधाबरोबरच राष्ट्रवादीतही बंड!

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- मागील चार निवडणुकीत पराभूत झालेल्या चेहऱ्यांना पुन्हा संधी देऊ नये. न चालणाऱ्या घोड्याएवजी चालणाऱ्या घोडयांना उमेदवारी द्या. चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या उमेदवारी बाबत मोरेश्वर भोंडवे यांचा नेमकी रोख कोणाकडे याकडे लक्ष आहे.

माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, प्रशांत शितोळे, मयूर कलाटे, विनोद नढे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली. याबाबत प्रशांत शितोळे म्हणाले की, चिंचवड विधानसभा मतदारसंघात आम्ही चांगला उमेदवार देणार आहोत. नवखा चेहरा देणार आहोत. या जागेवर आमचा हक्क आहे. पुढील दिशा ठरविण्याची वेळ आली तर ठरवू शकतो. पोटनिवडणुकीनंतर चिंचवडमधील राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. राजकारणात नवखे असलेलेही विधानसभेसाठी इच्छुक आहेत. आम्ही तर अनुभवी, जुने आहोत.

विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी आम्ही २० माजी नगरसेवक एकत्र आलो आहोत. आमची दिशा ठरली असून त्यानुसार पुढे जाणार आहोत. आमची बांधणी झाली आहे. पर्याय भरपूर आहेत. अजित पवार गटाला उमेदवारी मिळावी अशी आमची मागणी आहे. भाजपमध्ये मोठी धुसफूस आहे. जागेसाठी आग्रही आहोत. जागा नाही मिळाली तर सर्व पर्याय खुले आहेत. अजित पवार यांनी मनधरणी केली तरी थांबणार नाही. महायुतीतून बाहेर पडणार आहोत. शहराध्यक्षही निवडला जात नाही. अशा सर्व गोष्टींविरोधात बंड केले जात असल्याचे माजी नगरसेवक कलाटे यांनी सांगितले. तर, अजित पवारांची साथ सोडणार नाही. पण, भाजपचे काम करणार नाही.

आजच्या राजकीय परिस्थितीत प्रत्येकाला मी-मी वाटत आहे. मतदारसंघ आमचा-तुमचा असे काही नसते. ज्या पक्षाचा आमदार, त्याला जागा असे सूत्र ठरल्याचे सांगितले जाते. त्यातून मार्ग काढून चिंचवडची जागा आम्हाला मिळाली पाहिजे. अन्यथा महाविकास आघाडीचा आमच्यासमोर पर्याय आहे.

मोरेश्वर भोंडवे म्हणाले की, चिंचवड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचीच सर्वाधिक ताकद आहे. आमच्या सोबत २० ते २५ माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच सुटावी अशी आमची आग्रही मागणी आहे. सध्या भाजपच्या विरोधात नागरिकांमध्ये नाराजीचा मोठा सूर आहे. त्याचा परिणाम निवडणुकीवर देखील होऊ शकतो. त्यामुळे ही जागा न सुटल्यास आम्हाला वेगळा विचार करावा लागेल.

मयूर कलाटे म्हणाले की, आमच्यापैकी एक नवा चेहरा हा चिंचवड विधानसभेचा उमेदवार असणार आहे. एक दोन दिवसात हा चेहरा कोण असणार हे सर्वांसमोर येईल. नवीन उमेदवार दिला तर नाना काटे आणि भाऊसाहेब भोईर हे देखील पाठिंबा देतील. चिंचवडची जागा आम्हाला सुटली नाही तर वेगळा पर्याय खुला असेल. आम्ही अजितदादांना दुखावणार नाही. परंतु अजितदादांनी देखील ही जागा राष्ट्रवादीला सोडवून घ्यावी अशीच आमची मागणी आहे.
विनोद नढे म्हणाले की, आम्ही गेल्या काही दिवसापासून या विषयावर चर्चा करत आहोत. चिंचवड मतदार संघात आमची ताकद आहे. भाजपामध्ये उमेदवारीवरून धुसफूस सुरू आहे. त्याचा फटका निवडणुकीत बसू शकतो. बरेच भाजपचे नगरसेवक देखील आमच्या उमेदवाराला पाठिंबा देतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button