- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर आणि शिशुविहार मराठी माध्यम पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालय आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने आकुर्डी गावठाण परिसरातून प्लास्टिक मुक्त शहर जनजागृती अभियानाचे आयोजन केले होते यामध्ये 300 शालेय विद्यार्थ्यांनी व शाळेच्या शिक्षकांनी सहभाग घेतला होता या जनजागृतीमध्ये विद्यार्थ्यांनी प्लास्टिकचा वापर टाळा हा नारा दिला. प्लास्टिक हटवा शहर वाचवा. प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करा पर्यावरणाशी नाते जोडा प्लास्टिकचा वापर सोडा असा संदेश दिला यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती योगिता काळे संस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नंदकुमार ढोले मनोज मेदनकर वर्षा शिंदे सुलभा दरेकर विकास…
विविध उपक्रमांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी साजरी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – अहिल्यादेवी सेवा संघ, सांगवी यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २२९ वी पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. पिंपळे गुरव नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, शालेय साहित्य वाटप व कौटुंबिक स्नेहमेळावा, स्नेहभोजन समारंभ रविवारी (दि. २९) पार पडला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शंकर जगताप, उद्योजक विजय जगताप, प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सेवानिवृत्त अधिकारी मुरहरी केळे, व्याख्याते डॉ. शशिकांत तरंगे,मनपा आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे,माजी नगरसेवक शशिकांत कदम , राजेंद्र राजापुरे, संतोष कांबळे, सागर…
युवक काँग्रेसच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५५व्या जयंती दिनानिमित्त शहर युवक काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी यांच्या जीवनावरील आणि स्वातंत्र्य लढ्यातील संघर्षांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष सजी वर्की आणि महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव यांच्या वतीने काळेवाडीतील अलफोन्सा शाळेजवळ असलेल्या कोकण कारवार सभागृहात बुधवारी (दि. २ ऑक्टोबर) सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सदर प्रदर्शन भरविण्यात येणार असून हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे. तसेच या हे प्रदर्शन विनामूल्य असणार आहे. यासंदर्भात बोलताना आयोजक चंद्रशेखर जाधव म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अखंड…
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांसाठीची रणधुमाळी सुरू असून सर्वच राजकीय पक्ष उमेदवारांची चाचपणी करत आहेत. तर, इच्छुक उमेदवारांनीही प्रमुख पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. लोकसभा निवडणुकांमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चागलं यश मिळालं. त्यामुळे, त्यांच्या पक्षाकडे उमेदवारांचा कला वाढला असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातील काही नेतेही शरद पवरांकडून उमेदवारी मिळावी, यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे, गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांची भेट घेणाऱ्यांची संख्या वाढली असून भोसरीतील माजी आमदार विलास लांडे यांनीदेखील शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर, आता विलास लांडे यांचे सुपुत्र विक्रांत लांडे यांनी मोठी घोषणा केली आहे. विलास लांडे विधानसभेला तुतारी फुंकणार असल्याचं त्यांनी म्हटलं. अजित…
पीसीसीओईआर मध्ये प्रेरणा महोत्सव पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – जिज्ञासूपणा जोपासत नेहमी शिकण्याची तयारी ठेवा. आंतरशाखीय कौशल्ये आत्मसात करीत आव्हानांना खंबीरपणे तोंड द्या. दूरदृष्टी ठेवून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःचे नेटवर्क तयार करावे ही पंचसूत्री पाळून करिअरमध्ये यशस्वी व्हा असे मार्गदर्शन मुंबई आयआयटीचे प्रा. डॉ. संग्राम निर्मळे यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पीसीसीओईआर येथे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, सिव्हिल विभाग प्रमुख डॉ. सुदर्शन बोबडे, विद्यार्थी समन्वयक प्रा. अक्षय राहणे, स्पर्धा परीक्षा देऊन पास झालेले महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्रेयस धर्माधिकारी,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी गेली अनेक वर्षे अथक परिश्रम व प्रामाणिकपणे महापालिकेची सेवा करून शहराच्या सर्वांगीण विकासाबाबत अमूल्य योगदान दिले आहे, याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पुढील आनंदी व आरोग्यदायी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माहे सप्टेंबर २०२४ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या १९ कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते दिवंगत मधुकरराव पवळे सभागृह येथे सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास क्षेत्रीय अधिकारी किशोर ननावरे, शितल वाकडे, लेखाधिकारी चारूशिला जोशी, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे सनी कदम, बालाजी अय्यंगार, विजया…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्र शालेय क्रीडा विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद पुणे, यांच्या संयुक्त विदयामाने घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेत चॅलेंजर पब्लिक स्कूल पिंपळे सौदागर च्या खेळाडूंनी अभूतपूर्व यश मिळवले . त्यामध्ये ‘यशवर्धन अगरवाल’ हा बुद्धिबळ या खेळात 19 वर्ष वयोगटत प्रथम आला असून लॉन टेनिस या खेळात ‘कु. श्रेया रंजाळकर’ हिने दुसरा क्रमांक मिळवला. शाळेचे संचालक श्री संदीप विठ्ठल काटे सर यांनी मोलाची साथ आणि शाळेच्या सर्व विकास कार्यात दिलेले मार्गदर्शन हे खेळाडूंच्या यशामध्ये महत्त्वाचे ठरले. शाळेच्या प्राचार्य श्रीमती सुविधा महाले मॅडम यांच्या सतत प्रोत्साहन आणि योग्य दिशा यामुळे खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्र राज्य मिक्स बॉक्सिंग संघटना आयोजित महाराष्ट्र राज्य मिक्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा नुकत्याच दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी चंद्रशेखर आगाशे महाविद्यालय येथील बॅडमिंटन हॉलमध्ये संपन्न झाल्या. स्पर्धेमध्ये 10 , 12 , 14 , 17 , 19 वर्षाखाली आणि सीनियर गट अशा सर्व गटांमध्ये मुले आणि मुलींच्या विविध वजन गटात स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये जवळजवळ 300 पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला उत्साहामध्ये आणि चुरशीमध्ये खेळल्या गेल्या. मिक्स बॉक्सिंग खेळामध्ये प्रामुख्याने की किंग पंचिंग व थ्रोईंग या कौशल्यांचा प्रामुख्याने समावेश होतो यामुळे सर्वच गटात या कौशल्यांचा सर्व खेळाडूंनी वापर करून ही स्पर्धा यशस्वीरित्या पार…
पिंपरी (दिनांक : ३० सप्टेंबर २०२४) “हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व, अशी ठाम भूमिका घेऊन पद्मश्री डॉ. प्रभाकर मांडे यांनी सांस्कृतिक कार्य केल्याने त्यांच्या सांस्कृतिक योगदानाचा गौरव करणे हे आपले परम कर्तव्य आहे!” असे प्रतिपादन पद्मश्री रमेश पतंगे यांनी चिंचवडगाव येथे व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (भारतीय लोककला अभ्यास संशोधन व कल्याण केंद्र आणि भाषा व साहित्य प्रशाला) आणि क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोप सत्रात भूमिका व्यक्त करताना पद्मश्री रमेश पतंगे बोलत होते. याप्रसंगी क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, कार्यवाह ॲड. सतिश गोरडे, सावित्रीबाई फुले…
भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शिवांजली सखी मंच व चैतन्य प्रतिष्ठान पुणे, भारतीय जनता पार्टी कायदा आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने महिलां करिता हिराबाई किसनराव लांडगे (आईसाहेब) मोफत कायदा सल्ला केंद्र याच उद्घाटन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते इंद्रायणी नगर, भोसरी या ठिकाणी करण्यात आले.तसेच पिंपरी चिंचवड शहर भागातील महिलांसाठी मोफत कायदा सल्ला केंद्र हे एडवोकेट विशाल विश्वास डोंगर(प्रदेश उपाध्यक्ष कायदा आघाडी महाराष्ट्र प्रदेश) यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आले. या मोफत कायदा सल्ला केंद्रामध्ये महिलांना मोफत कायदे विषयक सल्ला मिळणार असल्याने महिलांचे मोठी सोय होणार आहे. याप्रसंगी भोसरी सह पिंपरी चिंचवड शहरातील महिला भगिनींनी मोफत कायदा सल्ला केंद्राचा जास्तीत जास्त…
