ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपळे गुरवला अहिल्यादेवी सेवा संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

Spread the love

 

विविध उपक्रमांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी साजरी

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – अहिल्यादेवी सेवा संघ, सांगवी यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २२९ वी पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.

 

पिंपळे गुरव नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, शालेय साहित्य वाटप व कौटुंबिक स्नेहमेळावा, स्नेहभोजन समारंभ रविवारी (दि. २९) पार पडला.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शंकर जगताप, उद्योजक विजय जगताप, प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सेवानिवृत्त अधिकारी मुरहरी केळे, व्याख्याते डॉ. शशिकांत तरंगे,मनपा आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे,माजी नगरसेवक शशिकांत कदम , राजेंद्र राजापुरे, संतोष कांबळे, सागर आंघोळकर, माजी नगरसेविका आशा शेडगे ,शारदा सोनवणे, लक्ष्मणभाऊ कला क्रीडा अकॅडमीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ माऊली जगताप, उद्योजक अरूण पवार, डॉ. अतुल होळकर,जवाहर ढोरे, स्वीकृत नगरसेवक महेश जगताप ,संजय कणसे, गणेश सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष संजय जगताप , दिलीप तनपुरे सामाजिक कार्यकर्ते , राहुल जवळकर, महेश भागवत, सूर्यकांत गोफनणे, अभिमन्यू गाडेकर, प्रफुल्ल भावेकर, महावीर काळे, सागर फुगे, श्रीकांत धनगर, राजेंद्र घोडके, गजानन वाघमोडे, राजेंद्र सोनटक्के, संजय नायकवडे, संतोष पांढरे, श्रीकांत धनगर ,भरत महानवर, शशिकांत दुधारे, रमेश काशीद, नरेश जगताप ,आशिष जाधव , बंडू मारकड, समाधान सोनलकर ,अहिल्यादेवी सेवा संघाचे माजी अध्यक्ष सूर्यकांत गोफणे, विजयकुमार हरणावळ, मोहन पाटील, बाबासाहेब चितळकर,
आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी गेल्या ३५ वर्षांपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी सेवा संघाच्या चालू असलेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळा या उपक्रमाचे कौतुक केले.या कार्यक्रमात विद्यार्थी व विविध क्षेत्रात कौतुकास्पद कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर व धनगर समाजाच्या विविध समस्यावर डॉ. शशिकांत तरंगे यांनी आपल्या भाषणातून प्रकाश टाकला. तसेच यावेळी संघाच्या वार्षिक अहवालाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड शहरातील विद्यार्थी, पालक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी सेवा संघाचे माजी अध्यक्ष अजय दुधभाते, अध्यक्ष नवनाथ भिडे, कार्याध्यक्ष सचिन सरक, उपाध्यक्ष बिरु व्हनमाने, अंकलेश सरोदे, सचिव रामेश्वर हराळे, खजिनदार डॉ. दिनेश गाडेकर, प्रसिद्धी प्रमुख महादेव मासाळ, अंबादास पडळकर, वैजिनाथ सुरवसे, रमेश गाढवे, राजेंद्र येडे, निलेश गाडेकर, अक्षय तिगाडे, संतोष मदने, ,आकाश कोरडे, धनाजी येडगे ,सुरज घोटके, सुनील पांढरे ,राजेंद्र येडे, ,संतोष भुरे, भारत बीटे, अरविंद काळे यांच्यासह सर्व आजी माजी पदाधिकारी व सभासदांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button