महाराष्ट्र राज्य मिक्स बॉक्सिंग संघटना आयोजित महाराष्ट्र राज्य मिक्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा संपन्न
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्र राज्य मिक्स बॉक्सिंग संघटना आयोजित महाराष्ट्र राज्य मिक्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा नुकत्याच दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी चंद्रशेखर आगाशे महाविद्यालय येथील बॅडमिंटन हॉलमध्ये संपन्न झाल्या.
स्पर्धेमध्ये 10 , 12 , 14 , 17 , 19 वर्षाखाली आणि सीनियर गट अशा सर्व गटांमध्ये मुले आणि मुलींच्या विविध वजन गटात स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये जवळजवळ 300 पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला उत्साहामध्ये आणि चुरशीमध्ये खेळल्या गेल्या.
मिक्स बॉक्सिंग खेळामध्ये प्रामुख्याने की किंग पंचिंग व थ्रोईंग या कौशल्यांचा प्रामुख्याने समावेश होतो यामुळे सर्वच गटात या कौशल्यांचा सर्व खेळाडूंनी वापर करून ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली.
स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य मिक्स बॉक्सिंग संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती कोमल शिंदे यांनी केले.
यावेळी कार्याध्यक्ष आदरणीय श्री संतोष चोरमले व अखिल भारतीय मिक्स बॉक्सिंग फेडरेशनचे महासचिव सचिन शिंगोटे उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवड शहर मिक्स बॉक्सिंग संघटनेने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले तर द्वितीय जनरल चॅम्पियनशिप पुणे जिल्हा मिक्स बॉक्सिंग संघटनेस मिळाला. तृतीय जनरल चॅम्पियनशिप गोंदिया जिल्ह्याने पटकावला
स्पर्धेचा बक्षीस वितरणास अखिल भारतीय मिक्स बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष डॉक्टर मदन कोठुळे याचबरोबर नुकत्याच जागतिक स्केटिंग स्पर्धेत भारतासाठी ज्यांनी ब्रांझ पदक मिळवले असे खेळाडू वैदेही व श्रुतिका सरोदे यांच्या शुभहस्ते झाले.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मिक्स बॉक्सिंग संघटना यांचे कार्याध्यक्ष संतोष चोरमले यांचे विशेष सहकार्य व नियोजन या स्पर्धेकामी आयोजकास लाभले. स्पर्धेचे सूत्रसंचालन श्री ऋषिकांत वचकल यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री सतीश गावंडे यांनी केले.