Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) मौ. हिंजवडी आण‍ि मांजरी भागातील अनधिकृत बांधकाम धारकावर गुन्हे नोंदव‍िण्यात आले आहे. तत्पुर्वी संबंध‍ितांना अनधिकृत बांधकाम थांबव‍िण्याबाबत नोटीस बजावली होती. पण त्या नोटीसचे अनुपालन न केल्याने शेवटी दोघांवर पीएमआरडीएकडून गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात आली. मंगळवारी (दि.1) हिंजवडी ता. मुळशी येथील स.नं.258/1/3/ह.पै. सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाम करणारे श्रीकांत भानुदास नवले (रा. हिंजवडी ता. मुळशी) यांचे विरोधात हिंजवडी पोलीस स्टेशन तर मांजरी ता. हवेली येथील सर्व्हे नं.153 पै. मधील अनधिकृत बांधकाम करणारे दिपाली विजय भाडाळे (रा.हडपसर,पुणे) यांचेविरूध्द हडपसर ठाण्यात गुन्हा दाखल केला. संबंध‍ित बांधकामधारकांना पीएमआरडीएकडून वेळोवेळी अनधिकृत बांधकाम…

Read More

निर्धार मेळाव्यात भाऊसाहेब भोईर यांनी शहरातील सत्ताधाऱ्यांच्या कामकाजाची केली पोलखोल अजित पवारांनी सरड्याचा डायनासोर केला पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरातील अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनी मोठ शक्ती प्रदर्शन करत आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केलं. त्याच बरोबर अजित पवारांनी सरड्याचे डायनासोर करत माझ्यासह अनेकांचा विश्वासघात केल्याचा थेट आरोपही केला. ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनी रहाटणी येथील थोपटे लॉन्स मध्ये आपली राजकीय भूमिका जाहीर करण्यासाठी निर्धार मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात मोठे शक्तिप्रदर्शन करत भोईरांनी पक्षाला राम राम करत उघडपणे आपल्या बंडखोरीला सुरुवात केली. त्याच वेळी त्यांनी निवडणूक लढण्याचा निर्धार…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – बैलांची सजावट करून बैलांची मिरवणूक काढण्यात आली .पांरपारिक वाद्ये व फटाक्यांची आतिषबाजी करून मोठ्या उत्साहात मिरवणूकीची सुरुवात करण्यात आली .चिखलीचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज मंदिरा पर्यंत मिरवणूक काढण्यात आली यावेळी मिरवणूकीत  गणेश किसन आप्पा यादव यांच्या बैलजोडी नी सहभाग घेतला कुदळवाडी चिखली येथील किसन आप्पा यादव यांच्या साठ वर्षापासून बैल जोडीची मिरवणूक काडून बैल पोळा साजरा करत आहेत. सध्या आधुनिकीकरणामुळे आणि स्मार्ट सिटी झाल्याने घराचे दर गगनाला भिडलेले आहेत नागरिकांना गाडी लावण्यासाठी जागा शिल्लक राहीलेली नाही तर जनावरे पाळणे दूरच राहिले. आम्ही सर्जा राजाची जोडी फक्त हौसे खातर पाळत असून सध्या शेती शिल्लक राहिलेली…

Read More

चिंचवड विधानसभा घडामोडीवर “आरएसएस”चे लक्ष…. चिंचवड विधानसभा उमेदवारीसाठी “आरएसएस” कडून चाचपणी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी अनेकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली आहे. शहरात गुजरातचे माजी गृहमंत्री तथा प्रभारी प्रदीपसिंह जडेजा यांनी शहरात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपमधील अनेक जण इच्छुक आहेत. काही पक्षातून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्यामुळे आरएसएसने निष्ठावान भाजपचा सर्वमान्य उमेदवार देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांच्यासह शहराध्यक्ष शंकर जगताप, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, शत्रुघ्न काटे, सिद्धेश्वर…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महापालिकेच्या आर्थिक नियोजनाकरिता  वित्तीय उपाययोजना आणि वित्तीय धोरणे निश्चित करणे तसेच पिंपरी चिंचवड शहरातील मालमत्ता हस्तांतरण  शुल्क आकारणीमध्ये सवलत देण्यास मान्यता देणे या विषयांसह विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या विशेष बैठकीत मान्यता दिली. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये दिवंगत मधुकरराव पवळे सभागृहात पार पडलेल्या बैठकीमध्ये  महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेले विविध विषय प्रशासक  सिंह यांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आले होते. या विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर यांच्यासह विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. महापालिका सभेच्या अंतिम मंजुरीनंतर वित्तीय वर्ष १ एप्रिल पासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वार्षिक अर्थसंकल्पाच्या…

Read More

भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश रस्त्यांच्या विकासाकामांमुळे नागरिकांची वाहतूककोंडीतून होणार मुक्तता हिंजवडी आयटी पार्कसोबत पिंपरी-चिंचवडची कनेक्टिव्हीटी आणखी वाढणार चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघात पायाभूत सुविधा पोहोचवण्यासाठी पुढाकार घेत महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. त्यानुसार  वाकड, पुनावळे, ताथवडे, मामुर्डी, रावेत आणि विकासनगर या भागातील सुमारे ३४ किलोमीटर लांबीचे रस्ते करण्यात येणार असून या रस्त्यांच्या कामांना लवकरच सुरूवात होणार आहे. त्यामुळे पीएमआरडी हद्दीतील मावळचा ग्रामीण भाग आणि हिंजवडी आयटी पार्कसोबत पिंपरी-चिंचवडची कनेक्टिव्हीटी आणखी वाढणार आहे. तसेच नागरिकांना दळणवळणासाठी कायमस्वरुपी चांगले रस्ते उपलब्ध होणार आहेत. शंकर जगताप यांनी चिंचवड…

Read More

गडावरील विविध 39.43 कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे उद्या (4 ऑक्टोबर) दुपारी मावळ दौऱ्यावर येणार आहेत.  कार्ला गड येथील एकवीरा आईचे दर्शन घेणार आहेत. गडावरील पाय-यांची दुरूस्ती, संरक्षण भिंत, मुख्य मंदिराची दुरूस्ती, विश्रांती कक्षाच्या अशा 39.43 कोटी रुपयांचा कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मावळचे शिवसेना खासदार, केंद्रीय ऊर्जा विभागाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीरंग बारणे यांनी दिली. महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला वेहेरगाव येथील कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या मंदिरात गुरुवारी घटस्थापना झाली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त कार्ला गडावर…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  राज्यात अनैतिक आणि असंवैधानिक सरकार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला सध्या ग्रहण लागले आहे. विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णयामुळे गिधाडांच्या सत्तेला निमंत्रण दिले आहे. संविधानाची पायमल्ली होण्याचे असेच प्रकार भारतभर सुरू राहिल्यास देशात फोडाफोडीला ऊत येईल आणि हाहाकार माजेल अशी भीती ज्येष्ठ विधि ज्ञ ॲड. असीम सरोदे यांनी बुधवारी पिंपरी चिंचवड शहरात बोलताना व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा असंवेदनशील आहेत अशी टिकाही ॲड. सरोदे यांनी केली.    दिशा सोशल फाउंडेशन च्या वतीने बुधवारी निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात ज्येष्ठ पत्रकार नितीन ब्रम्हे यांनी ॲड. सरोदे यांची मुलाखत घेतली.…

Read More

तळेगाव दाभाडे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – एमआयटी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आळंदी यांच्या वतीने आयोजित डॉ. विश्वनाथ कराड सांस्कृतिक करंडकावर इंद्रायणी महाविद्यालयाच्या संघाने आपले नाव कोरले. सुमारे ७० महाविद्यालयांचे सामूहिक संघ यात सहभागी झाले होते. त्या सर्वांमधून इंद्रायणी महाविद्यालयाच्या कृष्णभक्तीवर आधारित असलेल्या समूह नृत्याला परीक्षकांनी प्रथम क्रमांकाने गौरविले. यावेळी एमआयटी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. मयुरी बापट, उपप्राचार्य डॉ. मानसी अतितकर, एमआयटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. बी. वाफारे, स्पर्धेचे परीक्षक आदी मान्यवर उपस्थित होते. या सांस्कृतिक स्पर्धेत सुमारे सत्तरपेक्षा जास्त महाविद्यालयांतील स्पर्धकांनी आपली कला सादर केली. शास्त्रीय, पारंपरिक तसेच वेस्टर्न अशा तीन प्रकारांमध्ये ही स्पर्धा पार पडली. इंद्रायणी…

Read More

शोभा शरद जोशी निवृत्त शिक्षिका आणि ज्येष्ठ साहित्यिक पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड मधील शोभा जोशी म्हणजे साहित्यिक विश्वातील चालत बोलत व्यासपीठ होय. आज पासून नवदुर्गाच्या लेखमालेतील पहिले पुष्प.ज्येष्ठ निवृत्त शिक्षिका आणि ज्येष्ठ साहित्यिक आहेत. त्या जुन्या काळातील मॅट्रिक, डीएड असून पुण्यातील भवानी पेठेतील बाल जीवन विकास प्राथमिक शाळेमध्ये ३३ वर्षे अध्यापन करून एक पिढी सुसंस्कारित करण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले आहे. शिक्षणाचा ज्ञानदीप हाती घेऊन त्यांनी प्रतिकूलतेचा अंधःकार दूर करून स्वतःबरोबर विद्यार्थ्यांचे जीवन प्रकाशमय केले. शिक्षण, सुसंस्कार, गीतलेखन व गायन, विद्यार्थ्यांविषयीची आत्मियता, सर्वधर्मसमभाव, जातीभेद निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन या सप्तसूत्रीचा त्यांनी अवलंब केला. यातून आत्मविकास, कुटुंबाचा विकास…

Read More