ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी चिंचवड शहरातील मालमत्ता हस्तांतरण  शुल्क आकारणीमध्ये सवलत देण्यास स्थायी समितीची मान्यता

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महापालिकेच्या आर्थिक नियोजनाकरिता  वित्तीय उपाययोजना आणि वित्तीय धोरणे निश्चित करणे तसेच पिंपरी चिंचवड शहरातील मालमत्ता हस्तांतरण  शुल्क आकारणीमध्ये सवलत देण्यास मान्यता देणे या विषयांसह विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या विशेष बैठकीत मान्यता दिली.

पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये दिवंगत मधुकरराव पवळे सभागृहात पार पडलेल्या बैठकीमध्ये  महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेले विविध विषय प्रशासक  सिंह यांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आले होते. या विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर यांच्यासह विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.

महापालिका सभेच्या अंतिम मंजुरीनंतर वित्तीय वर्ष १ एप्रिल पासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वार्षिक अर्थसंकल्पाच्या अंमलबजावणीला  सुरुवात होत असते. या अर्थसंकल्पात  निश्चित करण्यात आलेल्या विविध भांडवली तसेच महसुली खर्चांच्या कामांची अंमलबजावणी करत  असताना  महापालिकेच्या वित्तीय स्वरूपाच्या कामकाजामध्ये आर्थिक शिस्त राखणे व आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने महत्वाच्या उपाययोजना व वित्तीय धोरणे निश्चित करण्यात आली आहेत.  विकास प्रकल्प, कामे आदी बाबी नवीन अर्थसंकल्पात समाविष्ट करत असताना भांडवली, महसुली विकासकामांचा अचूक अंदाज घेऊन समाविष्ट कामांसाठी इतर लेखाशिर्षावरील तरतूद वर्गीकरण करावी लागू नये यासाठी  आवश्यक आर्थिक तरतूद करणे, नवीन कामांचा समावेश करताना अचूक लेखाशीर्ष तयार करणे, अंदाजपत्रकात वाढीव तरतूद भासणार नाही याची दक्षता घेणे, अशा विविध बाबींचे  सूक्ष्म  नियोजन करण्यासाठी वित्तीय उपाययोजना आणि धोरण   निश्चित करण्यात आले आहे.

 

मालमत्ता हस्तांतरण शुल्क आकारणी सवलत

महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत महानगरपालिका हद्दीतील मालमत्तांवर मालमत्ता कराची आकारणी व वसुली करण्यात येते. त्यानुसार  महाराष्ट्र राज्य महानगरपालिका अधिनियमातील  तरतुदीनुसार मालमत्तांच्या आकारणी पुस्तकात नोंदी घेण्यात येतात. बांधकाम व्यावसायिक, तसेच पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास महामंडळ, महानगरपालिका, राज्य शासन, सरकार यांच्या मार्फत होणाऱ्या घरकुल योजना यामधील मालमत्ता विक्रीसाठी बांधलेल्या असतात. अशा मालमत्ता विक्री झाल्या नसल्यास कर आकारणी पुस्तकात संबंधित बांधकाम व्यावसायिक तसेच विकसक संस्थेचे नाव, मालक यांचे नाव नोंदवण्यात येतात. अशा मालमत्तांची प्रथम विक्री झाल्यानंतर प्रथम खरेदीदारांच्या नावे आकारणी पुस्तकात हस्तांतरण नोंद कार्यवाही करताना अशा प्रकरणी हस्तांतर (शुल्क) फी आकारणी केली जाणार नाही.

 

बैठकीत मंजूर विविध विषय

महापालिकेच्या अग्निशमन विभागासाठी अत्यावश्यक सेवेच्या कामकाजासाठी आवश्यक अत्याधुनिक साहित्य   खरेदी करणे, आरोग्य निरीक्षक या पदाच्या सेवा,प्रवेश नियमामध्ये नेमणुकीच्या टक्केवारी व अर्हतेमध्ये  बदल करणे,  चिंचवड येथे आय.टू.आर च्या बदल्यात ताब्यात आलेल्या जागेवर आय.टी.आय इमारत उभारण्यासाठी वास्तुविशारदची नेमणूक करणे आदी विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी बैठकीत मान्यता दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button