- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
एकनिष्ठ पक्षाचा निर्धार विजयाचा… शितल उर्फ विजय शिंदे यांचे ब्रॅण्डिंग चर्चेत चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – विधानसभा निवडणुकीचे बिगुल केव्हाही वाजणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधून अनेक जण इच्छुक आहेत. विधानसभेसाठी शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय उलथापालत होताना दिसत आहे. सर्वाधिक मोठा मतदारसंघ असणाऱ्या चिंचवड मतदारसंघात भाजपचे निष्ठावान असणारे नगरसेवक शितल उर्फ विजय शिंदे यांनी लावलेल्या एकनिष्ठ पक्षाचा निर्धार विजयाचा… होर्डिंगची शहरात नव्याने चर्चा जोरदार सुरू झाली आहे. भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या “चिंचवडमध्ये भाजपचाच विजय” य वाक्याने चिंचवड विधानसभेत भाजप नवीन चेहऱ्याला संधी देणार का? अशा चर्चाना वेग आला आहे. पक्ष तोच चेहरा नवीन…. चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपकडून…
युवक काँग्रेसच्या वतीने विद्यार्थ्यांना महात्मा गांधी लिखित चित्रे व चरित्र पुस्तक भेट पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५५व्या जयंती दिनानिमित्त शहर युवक काँग्रेसच्या वतीने भरविण्यात आलेल्या महात्मा गांधी यांच्या जीवनावरील आणि स्वातंत्र्य लढ्यातील संघर्षांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शनास विद्यार्थी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष सजी वर्की आणि महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव यांच्या वतीने काळेवाडीतील अलफोन्सा शाळेजवळ असलेल्या कोकण कारवार सभागृहात बुधवारी (दि. २ ऑक्टोबर) सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सदर प्रदर्शन पार पडले. यावेळी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड जिल्हा अध्यक्ष कैलास कदम, कार्याध्यक्ष ॲड. अनिरुद्ध कांबळे, माजी नगरसेवक…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा स्व. प्रा. एकनाथजी नाणेकर स्मृती समाजभूषण पुरस्कार शिवशंभो विचार मंचचे प्रांत संयोजक हभप शिरीष महाराज मोरे यांना तर स्व. संजय आर्य स्मृती समाजभूषण पुरस्कार पिंपरी चिंचवड श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर यांना जाहीर झाला आहे. हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्रोत्सव व विजयादशमीनिमित्त येत्या रविवारी (दि.६) सायंकाळी पाच वाजता, चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे हिंदू शौर्य दिन – विराट हिंदू मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पुरस्कार वितरण होणार आहे अशी माहिती हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानचे सचिव उत्तम दंडीमे व कार्यक्रमाचे…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्र शासनाने क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च अशा शिवछत्रपती पुरस्काराची नुकतीच घोषणा केली .यात मॉडर्न पॅटथलॉन या क्रीडा प्रकारासाठी आंतरराष्ट्रीय खेळाडू पुणे ( धायरी ) येथील रहिवासी विराज मिलनकुमार परदेशीयाची शिवछत्रपती राज्य पुरस्कारा करिता निवड झाली .त्यांमुळे विविध क्षेत्रातून विराज वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .विराज याने वयाच्या ६ व्या वर्षा पासून पुण्यातील टिळक तलाववर पोहोण्याचा सराव सुरु करीत अनेक राज्यस्तरीय पदके प्राप्त करीत राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रा कडून सहभाग घेतला . त्यावेळी फिटनेससाठी त्यांचे वडील ( राष्ट्रीय कुस्तीगिर ) मिलन परदेशी यांनी धावणे , पोहणे , व साइकलिंग याचा सराव करून घेतला . त्यातूनच ट्रायथलान…
महापालिका शाळांमधील ८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आज आपण शिक्षणाच्या एका नवीन युगाच्या उंबरठ्यावर उभे आहोत, जिथे ज्ञानाची सीमा नाही आणि प्रत्येक विद्यार्थ्याला हे ज्ञान आत्मसात करण्याची संधी आहे. महापालिकेच्या वतीने फुगेवाडी येथे उभारण्यात आलेली ही माध्यमिक इंग्रजी शाळा केवळ एक इमारत नसून विद्यार्थ्यांसाठी एक आशेचा किरण आहे. महापालिका शाळांमध्ये एक सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी, येथील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आणखी बळ देण्यासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेली ही गुंतवणूक आहे. भविष्यात या शाळेतील विद्यार्थी नक्कीच शहराचे नाव राष्ट्रीय तसेच जागतिक पातळीवर उंचावतील, असा विश्वास आयुक्त शेखर सिंह यांनी…
महात्मा गांधी जयंती निमित्त पिंपरीत काँग्रेस पक्षाचे सत्याग्रह आंदोलन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश राजवटीमध्ये चले जाव आंदोलन वेळी महात्मा गांधी यांना पोलिसांनी अटक करून रेल्वेने पुण्यात आणले होते. त्यावेळी जनप्रक्षोभ होऊ नये म्हणून महात्मा गांधी यांना पुणे पुणे स्टेशन ऐवजी चिंचवड रेल्वे स्टेशनवर उतरवण्यात आले. यानंतर कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये त्यांना पिंपरी, मोरवाडी येथील आत्ताच्या फिनोलेक्स कंपनीच्या कंपाउंड मध्ये असणाऱ्या वास्तूमध्ये स्थानबद्ध करण्यात आले होते. ही ऐतिहासिक वास्तू आहे. राज्य सरकार व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ही वास्तू जतन करून संरक्षित करावी अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केली. …
– एस.बी.पाटील, मळेकर कुटुंबियांचा सकारात्मक पुढाकार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिखली येथील साने चौक ते नेवाळे वस्ती चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उद्योजक एस.बी.पाटील आणि मळेकर कुटुंबियांनी सामाजिक बांधिलकी जपल्यामुळे वाहतुकीला होणारा पत्र्याचे कंपाउंड आणि महावितरण डीपी हटवण्यात आले. त्यामुळे सर्वसामान्य प्रवासी, नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. साने चौक ते चिखली रस्त्यावर नेवाळे वस्ती चौकात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांनी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी हस्तक्षेप करावा आणि तोडगा काढावा, अशी विनंती केली होती. दरम्यान, आमदार महेश लांडगे यांनी जागामालक एस.बी. पाटील आणि मळेकर कुटुंबियांना लोकहिताच्या…
– महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांचे आश्वासन – आमदार महेश लांडगे, स्थानिक लोकप्रतिनिधी यांची बैठक पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिखली घरकूल येथील पायाभूत सोयी-सुविधा आणि समस्यांबाबत ‘फास्ट ट्रॅक’ वर उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, राज्य शासन आणि केंद्र शासनाने आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांना घर मिळावे. या उद्देशाने २००८ मध्ये ‘जेएनएनयुआरएम’ अंतर्गत चिखली से. १७/१९ नेवाळे वस्ती या ठिकाणी ६ हजार ७२० घरांची निर्मिती करण्याची योजना आणली आहे. २०१४ मध्ये या प्रकल्पातील लाभार्थींना घरांचे वाटप करण्यात आले. मात्र, प्रकल्पाच्या ‘डिझाईन’प्रमाणे सोयी-सुविधा विकसित झालेल्या नाहीत. त्यामुळे घरकुलच्या रहिवाशांना…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रिक्त असलेल्या सहशहर अभियंता या पदावर कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टूवार यांची पदोन्नतीद्वारे नियुक्ती करण्यास आज प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली. महापालिका आस्थापनेवर सहशहर अभियंता अभिनामाची पदे कार्यरत आहेत. महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग, शासन निर्णय नुसार कार्यकारी अभियंता या पदावरील शैक्षणिक अर्हता, अनुभव कालावधी, सेवाज्येष्ठता, गोपनीय अहवाल, शिस्तभंग आणि मत्ता व दायित्वाची माहिती, संगणक अर्हता आदी सेवाविषयक तपशील पडताळून कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टूवार यांना शासन मान्यतेच्या अधिन पदोन्नती देण्याबाबत पदोन्नती समितीने सर्वानुमते शिफारस केली होती. या विषयास महापालिका सभेची मान्यता आवश्यक असते. त्यानुषंगाने आज प्रशासक शेखर सिंह यांच्या मान्यतेसाठी हा विषय विशेष बैठकीमध्ये ठेवण्यात आला होता, त्यास त्यांनी मान्यता दिली.
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- दुसऱ्या नवदुर्गा आहेत.अहमदनगर येथील मीना शिंदे. आपली माहिती देताना त्या सांगतात, मी मीना संजय शिंदे एम.ए .बीलीब पदवीधर ग्रंथालय शास्त्र आहेत.अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे २४ जुलै १९६३ रोजी जन्मलेल्या मीना शिंदे यांना बालपणापासूनच वडिलांकडून वाचनाचे बाळकडू लाभले. लग्नानंतर विविध कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत उच्च शिक्षण घेऊन त्या भारतीय जैन संघटना संचालित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, संत तुकाराम नगर पिंपरी, पुणे येथे ग्रंथपाल म्हणून कार्यरत झाल्या. समृद्ध साहित्य वाचनसंस्कारातून त्यांनी भावभावनांचे प्रकटीकरण काव्य लेखनातून करायला सुरुवात केली. अंतरंगातून उमटलेल्या काव्यरूपी हुंकाराला विविध मान्यवर साहित्यिकांचे मार्गदर्शन आणि रसिकमान्यता लाभली. बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांच्या मार्गदर्शनामुळे त्या बंधुताच्या…
