ताज्या घडामोडीपिंपरी
महात्मा गांधींशी संबंधित पिंपरीतील ऐतिहासिक वास्तू जतन करा – डॉ. कैलास कदम
महात्मा गांधी जयंती निमित्त पिंपरीत काँग्रेस पक्षाचे सत्याग्रह आंदोलन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश राजवटीमध्ये चले जाव आंदोलन वेळी महात्मा गांधी यांना पोलिसांनी अटक करून रेल्वेने पुण्यात आणले होते. त्यावेळी जनप्रक्षोभ होऊ नये म्हणून महात्मा गांधी यांना पुणे पुणे स्टेशन ऐवजी चिंचवड रेल्वे स्टेशनवर उतरवण्यात आले. यानंतर कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये त्यांना पिंपरी, मोरवाडी येथील आत्ताच्या फिनोलेक्स कंपनीच्या कंपाउंड मध्ये असणाऱ्या वास्तूमध्ये स्थानबद्ध करण्यात आले होते. ही ऐतिहासिक वास्तू आहे. राज्य सरकार व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ही वास्तू जतन करून संरक्षित करावी अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केली.
२ ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली या वास्तू समोरील कंपाऊंडलगत सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.
यावेळी डॉ. कदम यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने या जागेवर महात्मा गांधी यांचे स्मारक उभारण्यासाठी (दि. १९ जून २०१९) स्थायी समितीने ठराव मंजूर केला आहे. हे नियोजित स्मारक आदित्य बिर्ला ग्रुपच्या माध्यमातून उभारण्यात येणार होते. हा विषय मंजूर होऊन पाच वर्षे झाली आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नियोजित स्मारक लाल फितीच्या कारभारात अडकले आहे. काँग्रेस कमिटीच्या वतीने याबाबत अनेकदा पाठपुरावा केला आहे. निद्रावस्थेत असलेल्या राज्य सरकारला व मनपा प्रशासनाला जागे करण्यासाठी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्याग्रह आंदोलन करण्यात आले आहे.
यावेळी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या श्यामला सोनवणे, बिंदू तिवारी, भाऊसाहेब मुगुटमल, अमर नाणेकर, मयुर जयस्वाल, ॲड. अनिरुद्ध कांबळे, माऊली मलशेट्टी, विश्वनाथ जगताप, विठ्ठल शिंदे, सोमनाथ शेळके, हिरामण खवळे, जार्ज मॅथ्यू, गौरव चौधरी, वाहब शेख, बाबासाहेब बनसोडे, डाॅ. मनिषा गरूड, अरूणा वानखेडे, ॲड. संकल्पा वाघमारे, प्रा. किरण खाजेकर, अबूबकर लांडगे, महेश पाटील, राहुल शिंपले, मकरध्वज यादव, गणेश गरड, मिलिंद फडतरे, गौतम ओव्हाळ, सतिश भोसले, वसंत वावरे, विशाल कसबे, राजन नायर, भिमराव जाधव, आवेज सय्यद, साजिद खान, समद खान व शहर काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सत्याग्रह आंदोलनात सहभागी झाले होते.