Close Menu
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»महापालिकेच्या पहिल्या इंग्रजी माध्यमिक शाळेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते उद्घाटन
ताज्या घडामोडी

महापालिकेच्या पहिल्या इंग्रजी माध्यमिक शाळेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते उद्घाटन

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com4 October 2024No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

महापालिका शाळांमधील ८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आज आपण शिक्षणाच्या एका नवीन युगाच्या उंबरठ्यावर उभे आहोत, जिथे ज्ञानाची सीमा नाही आणि प्रत्येक विद्यार्थ्याला हे ज्ञान आत्मसात करण्याची संधी आहे. महापालिकेच्या वतीने फुगेवाडी येथे उभारण्यात आलेली ही माध्यमिक इंग्रजी शाळा केवळ एक इमारत नसून विद्यार्थ्यांसाठी एक आशेचा किरण आहे. महापालिका शाळांमध्ये एक सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी, येथील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आणखी बळ देण्यासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेली ही गुंतवणूक आहे. भविष्यात या शाळेतील विद्यार्थी नक्कीच शहराचे नाव राष्ट्रीय तसेच जागतिक पातळीवर उंचावतील, असा विश्वास आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केला.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने फुगेवाडी येथील लोकमान्य बाळगंगाधर टिळक विद्यामंदिर शाळेच्या नवीन इमारतीमध्ये ८ वी ते १० वी मधील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमाची शाळा उभारण्यात आली आहे. या शाळेचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी ते बोलत होते.

या उद्घाटन समारंभास अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, उमेश ढाकणे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, मुख्याध्यापक राहुल अडवानी, आयटीच संस्थेच्या संचालक नेहा वैद्य, सिनियर गव्हरमेंट पार्टनरशिप असोसिएट गितेश शिनगारे, शंकर शिर्के, महेंद्र भोर, बजाज ग्रुप सीएसआर अध्यक्ष कुरूष इराणी तसेच आयटीच संस्थेचे प्रतिनिधी आणि शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, महापालिकेच्या सध्या २ इंग्रजी माध्यमांच्या प्राथमिक शाळा कार्यरत आहे. या शाळा शिक्षण विभागामार्फत चालविण्यात येतात. माध्यमिक शाळांची तरतूद नसल्याने इयत्या नववी आणि दहावीच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना खाजगी शाळांचा पर्याय शोधावा लागतो. यामध्ये विद्यार्थ्यां-ची गळती होण्याची शक्यता फार असते. तसेच महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना खाजगी शाळांच्या वातावरणात रुळायला व त्यांच्या शिक्षण पद्धती आत्मसात करण्यासाठी अनेक अडचणी येऊ शकतात. विद्यार्थ्यांना येणाऱ्या या समस्या दूर करण्यासाठी महापालिकेच्या वतीने सार्वजनिक – खाजगी भागीदारीतून ८ वी ते १० वी मधील विद्यार्थ्यांसाठी फुगेवाडी येथे माध्यमिक शाळा सुरू करण्यात आलेली आहे.

महापालिका शाळेतील एकूण २३८ विद्यार्थी घेत आहेत इंग्रजी माध्यमिक शिक्षण
चिंचवड महापालिकेच्या लोकमान्य टिळक विद्यामंदिर, फुगेवाडी येथील शाळेच्या नवीन इमारतीमध्ये आयटीच (iTEACH) या संस्थेद्वारे इयत्ता ८ वी ते १० वी ची इंग्रजी माध्यमिक शाळा सुरु करण्यात आली आहे. शाळा चालविण्यासाठी आयटीच (iTEACH) संस्थेला महापालिकेच्या वतीने आवश्यक वर्ग खोल्या, भौतिक सुविधा तसेच वीज व पाणी पुरवठा अशा सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. फुगेवाडी येथे नव्याने सुरु करण्यात आलेल्या ही इंग्रजी शाळा चालविण्याची पूर्ण जबाबदारी आयटीच (iTEACH) संस्था घेणार आहे. त्यामध्ये शाळेचे रोजचे संचलन, शाळा मुख्यध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी निवड, शिक्षक प्रशिक्षण, शिक्षण पध्द्ती, प्रगती मूल्यमापन इत्यादी सर्व कार्य व यासाठी आवश्यक खर्च आयटीच संस्था देणगीदार संस्थांमार्फत करणार आहे. आयटीच संचलित शाळेमध्ये एस.एस.सी. अभ्यासक्रम शिकविला जाणार असून केवळ महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनाच येथे प्रवेश घेता येणार असून एकूण २३८ विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत.

शाळेची प्रमुख वैशिष्ट्ये:
आयटीच (iTeach) संस्थेशी भागीदारी:
शाळेचे रोजचे संचलन, शाळा मुख्यध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी निवड, शिक्षक प्रशिक्षण, शिक्षण पध्द्ती, प्रगती मूल्यमापन इत्यादी सर्व कार्य व यासाठी महापालिकेने आयटीच संस्थेशी भागीदारी केली आहे.

महापालिकेच्या वतीने देण्यात आलेल्या सुविधा :
महापालिकेने शाळेच्या कामकाजासाठी वर्गखोल्या, भौतिक सुविधा, वीज आणि पाणीपुरवठा यासारख्या आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनाच प्रवेश :
केवळ महापालिका शाळांमधील विद्यार्थी या शाळेमध्ये प्रवेश घेऊ शकतात. सध्या २३८ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.

अभ्यासक्रम:
शाळा राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमानुसार आयटीच संस्था भागीदार संस्थांकडून प्राप्त झालेल्या निधीतून शिक्षक प्रशिक्षण आणि मूल्यमापन यासह सर्व शैक्षणिक प्रक्रिया हाताळत आहे.
आयटीच (iTeach) संस्थेची भूमिका:
शाळेचे सुरळीत व्यवस्थापन तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करून दर्जेदार शिक्षक प्रशिक्षण आणि सुयोग्य शैक्षणिक पद्धती प्रदान करणे.

ब्लेंडेड लर्निंग लॅब (BLL)
शाळेमध्ये BLL ब्लेंडेड लर्निंग लॅबची सुविधा आहे. विद्यार्थ्यांमध्ये असलेले शैक्षणिक अंतर भरून काढण्यासाठी या लॅबचा उपयोग केला जात आहे. शिक्षक मुलांना वर्गात एकाच पातळीचे शिक्षण देऊ शकतात. काही विद्यार्थ्यांना ते सोपे वाटू शकते किंवा काहींना ते अवघड वाटू शकते. यामुळे काही विद्यार्थ्यांचा सराव हा कमी पडतो. या लॅबच्या आधारे विविध ॲप व तंत्रज्ञांचा वापर केल्यामुळे विद्यार्थी त्यांना गरज असलेल्या शैक्षणिक पातळीवर शिकू शकतात. विद्यार्थ्यांची प्राथमिक भाषा इंग्रजी नसल्यामुळे किंवा त्यांच्या आस-पास इंग्रजीचा वापर अतिशय कमी असल्यामुळे त्यांची इंग्रजी भाषा विकसित व्हायला खूप वेळ लागतो. एका शिक्षकाला ते साध्य करणे अवघड असते. लॅबच्या माध्यमातून तंत्रज्ञाच्या वापरामुळे विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेमध्ये वाचन व ऐकण्याचे आकलन त्वरेने विकसित होण्यास मदत होईल.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहात्मा गांधींशी संबंधित पिंपरीतील ऐतिहासिक वास्तू जतन करा – डॉ. कैलास कदम
Next Article विराज परदेशी शिवछत्रपती पुरस्काराचा मानकरी
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

POPULAR COMPANIES
  • Home
  • About
  • Team
  • पुणे
  • भोसरी
  • Buy now!
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021
New Comments
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • ताज्या घडामोडी
    • पिंपरी चिंचवड
      • भोसरी
    • देहू
    • आळंदी
    • पुणे
      • मावळ
      • शिरूर
      • हिंजवडी
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • क्राईम
    • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
    • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
    • मनोरंजन
    • शिक्षण
    • सांस्कृतिक
    • जाहिरात विभाग
    • आरोग्य
    • धार्मिक
    • आरोग्य
    • क्रीडा
    • नवरात्री विशेष
    • व्हिडिओ
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.