- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पॅरामेडिकल क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी ‘आत्मनिर्भरतेचे एक नवीन पाऊल’ विषयावर शैक्षणिक सत्राचे आयोजन बार्टी, मोरया सामाजिक प्रतिष्ठान आणि लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप पॅरामेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन सांगवी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- विकसित भारतासाठी देशातील तळागाळातील शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत व्यवसायाभिमुख शिक्षण पोहचविण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्दिष्ट आहे. त्यांचे हे स्वप्न साकार करण्यासाठी बार्टीसारख्या संस्थेच्या माध्यमातून सर्व घटकातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्याची जबाबदारी आमची आहे व ती आपण निश्चितच पार पाडू, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), मोरया सामाजिक प्रतिष्ठान, लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप पॅरामेडीकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने बजाज फिन्सर्वच्या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – घे भरारी या फेस बुक ग्रुप ने नवव्यावसायिकांना आणि स्त्री उद्योजिकांना प्रोत्साहन देण्यासाठी भव्य प्रदर्शन आकुर्डी सीझन्स बँक्वेट येथे आयोजित केले असून दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी याचे उद्घाटन माननीय संगीता तरडे आणि व्यावसायिक जयंत पानसे यांच्या शुभहस्ते करण्यात आले . 4,5 आणि 6 ऑक्टोबर 2024 रोजी आकुर्डी , सीझन्स बँक्वेट येथे हे प्रदर्शन असून, सकाळी 11 ते रात्री 9 या वेळात नागरिकांनी या प्रदर्शनाला जरूर भेट द्यावी असे आवाहन घे भरारी समूहाचे संस्थापक राहुल कुलकर्णी आणि नीलम उमराणी एदलाबादकर यांनी केले आहे. हे एक्झिबिशन 3 ऱ्या मजल्यावर असून येथे ठाणे ,मुंबई ,…
पिंपरी चिंचवड मधील नवदुर्गांचा” डॉ.नूतन लोणकर नेवसे पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे बंधू सिदूजी खंडोजी नेवसे पाटील यांच्या घराण्यातील पाचव्या पिढीतील कन्या पूर्वाश्रमीच्या मीना रघुनाथ नेवसे म्हणजेच मीना विष्णू लोणकर यांच्या पोटी २३ जुलै १९८५ रोजी नूतन यांचा जन्म झाला. शेतकरी कुटुंबातील त्यांचे आजोबा रघुनाथ भैरू नेवसे यांची नूतनने उच्च शिक्षण घ्यावे आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा शिक्षणाचा वारसा पुढे न्यावा अशी खूप इच्छा होती. त्याचबरोबर आई वडील आणि नामदेव दिनकर जगताप या काकांचे त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन आणि पाठबळ लाभले. बालपणापासूनच अतिशय बुद्धिमान असलेल्या नूतन यांनी अतिशय जिद्दीने अभ्यासावर संपूर्णपणे लक्ष केंद्रित करून नायगाव,…
करसंकलन विभागाकडून ‘क्यूआर कोड’चा वापर करण्याचे मालमत्ताधारकांना आवाहन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शहरातील सर्व प्रकारच्या मालमत्तांचे, कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत मालमत्ता सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यामध्ये ८,५५,१०२ मालमत्तांना सलग अनुक्रमांक (जिओ सिक्वेन्सिंग) देण्यात आले असून ५,३२,३०७ मालमत्तांचे अंतर्गत मोजमाप करण्यात आले आहे. मालमत्ता सर्वेक्षणांतर्गत करण्यात आलेल्या मोजमाप प्रक्रियेमध्ये नव्याने निदर्शनास आलेल्या मालमत्तांपैकी ५२,७८७ मालमत्तांपर्यंत विशेष नोटिस १ चे वाटप करण्यात आले असून यामधील २२,५८२ मालमत्ताधारकांनी हरकती दाखल केल्या असून त्यापैकी १६,९५३ मालमत्ताधारकांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली असून त्यांना अंतिम बिल मिळाले आहे. यामधील ४,२६१ मालमत्ताधारकांनी ८,९९५४,२८९ रुपये कराचा भरणा केला असून ४,१३४ मालमत्ताधारकांनी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला केंद्रीय मंत्रिमंडळाची काल (गुरुवारी) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी ‘मी मराठी, आम्ही मराठी’, माय मराठी. अशा घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला कवी कुसुमाग्रजांच्या व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे संस्थापक श्री अरुण चाबुकस्वार शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत यांनी केले यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार म्हणाले की, या ऐतिहासिक निर्णयाचे…
“चला एकत्र येऊया.. आपल्या घरातील आमदार करूया” नाना काटेंसाठी पिंपळे सौदागर ग्रामस्थांची एकजूट पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड विधानसभा मतदारसंघात आपल्या घरातील माणूस मोठ्या पदावर गेल्यानंतर आपल्या गावाला व आपल्या चिंचवड विधानसभेला नक्कीच फायदा होणार आहे. यासाठी “चला एकत्र येऊया.. आपल्या घरातील आमदार करूया” या निर्धाराने माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांना आमदार करण्यासाठी पिंपळे सौदागर मधील सर्व ग्रामस्थ एकत्रित बैठक घेवून एकजुटीचा निर्धार केला आहे. आज रविवारी पिंपळे सौदागर येथील विमल हॉल येथे बैठक संपन्न झाली. पिंपळे सौदागर परिसराचा विकास अतिशय नियोजनबद्ध झाला आहे. आपल्या पिंपळे सौदागर परिसराचा नावलौकिक शहरात नव्हे संपूर्ण देशात आपल्या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सुविद्य भालेराव कुटुंबात ७ नोव्हेंबर १९७९ रोजी जन्मलेल्या वैजयंती भालेराव यांचे शिक्षण मुंबई महानगरीत झाले. त्यांच्या आजी जानकी बाबु भालेराव यांना संगीताची अतिशय आवड होती आणि आवाजही सुरेल होता. दूरदर्शन वरून त्यांच्या भजनी मंडळाचे कार्यक्रम प्रसारित झाले होते. ते पाहून भारतरत्न लता मंगेशकर यांनी या मंडळाला स्वतःच्या घरी बोलवून त्यांचे कौतुक केले होते. तसेच अरुणा आणि प्रभाकर भालेराव या आई-वडिलांनाही संगीताची आवड होती. त्यामुळे बालवयातच त्यांच्या मनावर संगीत संस्कार झाले.त्यांचे वडिल फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचे आहेत. शिक्षण हे वाघिणीचे दूध असून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा मोलाचा विचार मातापित्यांकडून त्यांना लाभला. याच विचारातून जीवनाला…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरात शरदचंद्र पवार यांना मानणारा मतदार मोठ्या प्रमाणात आहे ,तीनही विधानसभेत पक्षाचे उमेदवार मोठ्या ताकदीने विजयी होऊ शकतात शहरात शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्या नेतृत्वात पक्ष संघटन व्यापक आणि सर्वसमावेश वाढलेले आहे त्या अनुषंघाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात ठराव बैठक झाली सदर बैठकीत शहरातील तीनही विधानसभा पिंपरी ,चिंचवड ,भोसरी विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाने लढाव्यात व निष्ठावंतांना प्रथम प्राधान्याने उमेदवारी देण्यात यावी असा सर्व प्रमुख शहर पदाधिकारी, सेल, फ्रंटल प्रमुख, पिंपरी चिंचवड, भोसरी विधानसभा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकमताने ठराव मंजूर केला…
पीसीसीओईआर मधील प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – अभियांत्रिकीची पदवी मिळाल्यानंतर याकडे केवळ उपजीविकेचे साधन म्हणून पाहू नये. नोकरीचा अनुभव घेऊन व्यवसाय उभा करून देशाच्या विकासात हातभार लावण्याचे उद्दिष्ट ठेवावे. आजचा विद्यार्थी हा उद्याचा देशाचा एक सक्षम, जबाबदार, सुसंस्कृत नागरिक म्हणून सक्षमपणे उभा राहिला पाहिजे यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी संयुक्तपणे काम केले पाहिजे असे मार्गदर्शन करियर समुपदेशक अमोल निटवे यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) च्या रावेत तेथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशोधन केंद्र (पीसीसीओईआर) मधील प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ चिंचवड मधील प्रा. रामकृष्ण मोरे पेक्षागृह…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) कर्मचाऱ्यांचा सातव्या वेतन आयोगाचा फरक मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी पीएमपीएमच्या कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाच्या फरकाचा पहिला हप्ता तातडीने देण्यासाठी अपवादात्मक बाब म्हणून 2024-25 च्या संचलन तुटीपोटी अग्रीम 56 कोटी 10 लाख रुपये देण्यास मान्यता दिली. यासाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पाठपुरावा केला होता. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमांचे विलीनीकरण करून पीएमपीची स्थापना करण्यात आली. पुणे महापालिकेचा 60 टक्के आणि पिंपरी महापालिका 40 टक्के संचलन तूट देते. पीएमपीएमएल संस्थेस संचलन तूट आणि पासेसपोटी संचलन तूट दिली जाते. उपमुख्यमंत्री, लोकप्रतिनिधी, पीएमपीएमएलचे…
