चिंचवडताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्र

नाना काटे यांना आमदार करण्यासाठी पिंपळे सौदागर ग्रामस्थ एकवटले

Spread the love

 

“चला एकत्र येऊया.. आपल्या घरातील आमदार करूया” नाना काटेंसाठी पिंपळे सौदागर ग्रामस्थांची एकजूट

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड विधानसभा मतदारसंघात आपल्या घरातील माणूस मोठ्या पदावर गेल्यानंतर आपल्या गावाला व आपल्या चिंचवड विधानसभेला नक्कीच फायदा होणार आहे. यासाठी “चला एकत्र येऊया.. आपल्या घरातील आमदार करूया” या निर्धाराने माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांना आमदार करण्यासाठी पिंपळे सौदागर मधील सर्व ग्रामस्थ एकत्रित बैठक घेवून एकजुटीचा निर्धार केला आहे. आज रविवारी पिंपळे सौदागर येथील विमल हॉल येथे बैठक संपन्न झाली.

पिंपळे सौदागर परिसराचा विकास अतिशय नियोजनबद्ध झाला आहे. आपल्या पिंपळे सौदागर परिसराचा नावलौकिक शहरात नव्हे संपूर्ण देशात आपल्या नाना काटे यांच्या नेतृत्वाने मिळालेला आहे. कोणताही भेदभाव न राखता सामान्य माणसाची कामे करण्यासाठी नाना यांचा नेहमी पुढाकार राहिलेला आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या सुखदुःखात नाना काटे स्वतः उभे राहतात. दिवसातील २४ तासात केव्हाही गरजू लोकांच्या हाकेला धावतात. आपला परिसर सोडून संपूर्ण शहरातील कोणत्याही नागरिकांच्या समस्या नाना प्रत्यक्ष फोन द्वारे किंवा आपले कार्यकर्ते पाठवून सोडवतात. एखाद्या कौटुंबिक वादाला सोडवून समेट घडवून नाती घट्ट करतात. अनेकांची नाती तुटू नये यासाठी नाना काटे नेहमी पुढाकार घेतला आहे. आपल्या परिसरातील नव्हे घरातील माणूस “आपला माणूस” पोटनिवडणुकीत आमदार होण्यासाठी दोन पावले दूर राहिले होते. आता विधानसभेसाठी पुन्हा संधी आली आहे.आता आपल्याला पुन्हा संधीचे सोने करून आपला माणूस आमदार करण्यासाठी एकत्रित येऊया. यासाठी सर्व ज्येष्ठ नागरिक, युवक आणि पिंपळे सौदागर ग्रामस्थांनी नाना काटे यांना विधानसभेसाठी निर्धार व्यक्त केला.

यावेळी नाना काटे म्हणाले की, पोटनिवडणुकीत आपल्या सर्व ग्रामस्थ, युवक मित्र, महिला व चिंचवड मतदार संघातील नागरिकांनी अतिशय चांगलं काम केले. त्यामुळे आपण विजयाच्या अगदी जवळ पोहोचलो होतो. अगदी काही हजाराच्या फरकांनी आपल्याला ते यश मिळवता आले नाही. यापुढे सर्व ग्रामस्थांनी आपले नातेवाईक व मित्र परिवार यांच्या संपर्कात राहून पुन्हा लढाई देऊन विजय संपादन करायचा आहे. यासाठी सर्वांनी एकत्रित येऊया असे आवाहन नाना काटे यांनी केले.

त्याचबरोबर आपण महापालिकेच्या माध्यमातून पिंपळे सौदागर परिसराचा विकास ज्या पद्धतीने केला. त्याच पद्धतीने आगामी काळात संपूर्ण विधानसभा मतदारसंघाचा विकास करायचा आहे. पिंपळे सौदागरचा विकास करताना लोकांचा एक प्रतिनिधी म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली आणि संधीचे सोने करता आले. तसेच यापुढे चिंचवड विधानसभा मतदारसंघात लोकांनी संधी द्यावी मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button