- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – प. पू. भगवान बाबांनी सुरू केलेला सावरगाव घाट, ता. पाटोदा, जि. बीड येथील दसरा मेळावा देशात प्रसिद्ध आहे. प. पू. भगवान बाबांनी सुरू केलेली परंपरा पुढे लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांनी बहुजन वंचित ऊसतोड कामगारांसाठी चालू ठेवली. मुंडे साहेबां नंतर पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांनी ही परंपरा यशस्वीपणे पुढे चालू ठेवली आहे. हा देशातील सर्वांत मोठा दसरा मेळावा ठरलेला आहे. शनिवारी (१२ ऑक्टोबर) होणाऱ्या दसरा मेळाव्याला पिंपरी चिंचवड शहरातून पाच हजार नागरिक सहभागी होतील, अशी माहिती पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी दिली. पिंपरी चिंचवड शहर दसरा कृती समितीच्या वतीने बुधवारी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राजकारण आणि समाजकारण यामध्ये आपली नाममुद्रा उमटवणाऱ्या ज्येष्ठ माजी नगरसेविका अनुराधा गोरखे म्हणजेच पूर्वाश्रमीच्या अनुराधा राघू चखाले यांचा येरवडा येथे १० सप्टेंबर १९५७ रोजी जन्म झाला. शिक्षणाची आवड असल्यामुळे घरच्या गरिबीच्या परिस्थितीतून मार्ग काढून जिद्दीने आत्मविश्वासाच्या व मेहनतीच्या जोरावर त्यांनी जुन्या काळातील अकरावी म्हणजेच मॅट्रिक पर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांचे गणपतराव गोरखे यांच्याशी लग्न झाले. आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल परिस्थितीत देखील सासू-सासरे, दोन नणंदा आणि तीन मुलांचे डोळस संगोपन अशा सर्व सांसारिक जबाबदाऱ्या त्यांनी जिद्दीने सांभाळल्या.काळभोर नगरच्या मनपा शाळेत मुलांचे शालेय शिक्षण चालू असताना मुलांना निबंध लेखन, वक्तृत्व व शालेय अभ्यासात त्या उत्तम मार्गदर्शन करत…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा सन्सचे अध्यक्ष पद्मविभूषण रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. प्रकृती खालावल्यामुळे आज रतन टाटा यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि रात्री उशिरा त्यांचं निधन झालं. आपल्या शालीन आणि सुसंस्कृत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या रतन टाटा यांच्या निधनाने उद्योगविश्वासह सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. रतन टाटा यांचा जीवनप्रवास रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी झाला. रतन टाटा यांना १९९१ मध्ये टाटा समूहाचे अध्यक्ष बनवण्यात आले. चेअरमन झाल्यानंतर त्यांनी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आजचा दिवस पिंपरी विधानसभा क्षेत्राच्या राजकिय पटलावर मोठी घडामोड करणारा ठरला आहे.पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकासकामाचे उदघाटन करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा अजित दादा पवार शहरात सकाळी दाखल झाले होते.मात्र या सगळ्या मध्ये पिंपरी विधानसभेचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांनी निवडणुकी पूर्वी अचूक टायमिंग साधत विरोधकांचे,फेक नरेटिव्हचे,भुछत्रा प्रमाणे उगवलेले इच्छुक उमेदवार व स्वतःच्या पक्षात तिकिट विक्रीसाठी सरसावलेले नगरसेवक व पदाधिकारी या सर्वांचा एकत्रित समाचार घेतल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. मागील काही दिवसापासून पिंपरी विधानसभेसाठी अनेक इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून रिंगणात उतरले आहेत ते सातत्याने विद्यमान आमदार अण्णा बनसोडे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी येथील पिंपरीगाव ते पिंपळे सौदागर दरम्यान पवना नदीवरील समांतर पुलाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाल्याची माहिती माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी दिली. पिंपरी येथील पिंपरी येथील पिंपरीगाव ते पिंपळे सौदागर दरम्यान नदीवरील समांतर पुलाचे काम स्थापत्य प्रकल्प विभागामार्फत व्ही.एम.मातेरे या संस्थेला देण्यात आले होते. सदर पुलाचे काम पूर्ण होऊन आज महापालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते सकाळी ९ वाजता करण्यात आले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, नगरसेवक संदीप वाघेरे, नाना काटे, शत्रुघ्न उर्फ बापू काटे, निकिता…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राज्याच्या तिजोरीत खडखडाट, राज्य दिवाळखोरीत निघाल्याची टीका विरोधक करत आहेत. त्याकडे लक्ष देऊ नका मी राज्याचा दहावा अर्थसंकल्प मांडला आहे. महाराष्ट्र राज्य मजबूत असून आर्थिक परिस्थिती मजबूत आहे. देशात सर्वात जास्त वस्तू व सेवा कर (जीएसटी) महाराष्ट्राला मिळतो. त्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याने लाडकी बहीणसह कोणतीही योजना बंद करण्यात येणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन पवार यांच्या हस्ते झाले. खासदार श्रीरंग बारणे, आमदार अण्णा बनसोडे, महेश लांडगे, अश्विनी जगताप, महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- विधानसभेचे पडघम येत्या काही दिवसात वाजायला सुरुवात होईल यातच पिंपरी चिंचवड शहरातील शेकडो मुस्लिम बांधवांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्य कर्तृत्वावर विश्वास ठेवत पिंपरी चिंचवड शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले यांच्या नेतृत्वाखाली आणि पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर यांच्या उपस्थितीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात शिवसेना भवन, दादर मुंबई येथे प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे उपनेते रवींद्र मिर्लेकर उपस्थित होते. पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष ॲड. सचिन भोसले यांच्या कार्यकाळात शिवसेनेने जोरदार इंनकमिंग सुरू झाली. यामध्ये पिंपरी चिंचवड मधील बड्या नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये भाजप युवा मोर्चाचे चेतन पवार, राष्ट्रवादीचे संजोग वाघेरे, भाजपचे एकनाथ पवार…
पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीतील महाड- पोलादपूर-माणगाववासीयांचा कौटुंबिक स्नेहमेळावा उत्साहात संपन्न पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- विद्यमान सत्ताधाऱ्यांना सत्तेचा आणि पैश्याची मस्ती चढलेली आहे. मात्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाड-पोलादपूर-माणगावची सुजाण जनता आणि सर्वसामान्य कट्टर शिवसैनिक त्यांचा माज उतरविल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दांत महाड नगरपरिषेदेच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल माणिकराव जगताप यांनी घणाघात केला. महाड-पोलादपूर-माणगाव तालुक्यातील पिंपरी चिंचवड शहरवासियांचा स्नेहमेळावा काळेवाडी येथील आरंभ बँकेट हॉल याठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या संवाद मेळाव्यात महाड नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल माणिकराव जगताप बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, आमदार भरत गोगावले म्हणतात की मी राजकारणात नवखी आहे. परंतु महाड नगरपरिषेदेत…
हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठान तर्फे सातुर्डेकर व मोरे महाराज यांना पुरस्कार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारतामध्ये सद्यस्थितीला सहा कोटी पेक्षा जास्त घुसखोरांची संख्या आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षितता, एकता, अखंडता धोक्यात आहे. याला व्यवस्थेतील भ्रष्टाचार हे मूळ कारण आहे. हा एक देशद्रोह व संघटित अपराध आहे. हे रोखण्यासाठी देशात पुरेसे कायदे आहेत, परंतु त्याची कडकपणे अंमलबजावणी होत नाही. आता सर्वसामान्य नागरिकांनीच लोकप्रतिनिधींवर दबाव निर्माण करून देशातील शिक्षण व कायदा व्यवस्था बदलण्यासाठी काम केले पाहिजे असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. अश्विनीकुमार उपाध्याय यांनी केले. रविवारी (दि.६) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्रोत्सव…
पुनावळे, ताथवडे, वाकडमधील रस्त्यांना मंजुरी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना पायाभूत व मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी आग्रही असणारे, जनतेसाठी प्रशासनाशी कायम झगडणारे शहरातील युवा नेते व माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी सतत्याने केलेल्या पाठपुराव्याला आणि मेहनतीला यश आले आहे. महापालिका प्रशासनाकडे त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे वाकड, ताथवडे व पुनावळेतील महत्वाच्या अनेक डीपी रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे. नागरिकांनी आनंद व्यक्त केला. विकास आराखड्यातील रस्त्यांना महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे वाकड, ताथवडे, पुनावळेतील महत्वपुर्ण डीपी रस्त्यांच्या कामांना लवकरच प्रत्यक्षात सुरूवात होणार आहे. या भागातील वाहतूक कोंडीचे विघ्न आता टळणार असून पीएमआरडी हद्दीतील मावळ, मुळशीचा भाग,…
