- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा राज्याला विकासाच्या दिशेने नेणारा, शेतकऱ्यांना भरीव मदत करणारा आणि महिलांसाठी सुरू असलेल्या योजनांना कायम ठेवणारा विकासाभिमुख अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया यांनी दिली. मात्र उद्योग-व्यवसायाच्या विस्तारासाठी आणि मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीसाठी ठोस योजना नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पात शेती विकासावर विशेष लक्ष केंद्रित केल्याचे पगारिया यांनी सांगितले. शेतकऱ्यांसाठी डिजिटल सिटी सेवा योजना, वसुधा सेवा योजना, बळीराजा शेत पाणंद योजना, लागेल त्याला सौर कृषी पंप देण्याची योजना तसेच शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा निर्णय यांसारख्या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणी बिलावरील विलंब दंडाबाबत नागरिकांना दिलासा देण्यासाठी ‘अभय योजना’ सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका सारिका विशाल मासुळकर यांनी महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे. मासुळकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने यापूर्वी मालमत्ता करावरील विलंब दंडावर अभय योजना लागू केली होती. या योजनेमुळे अनेक थकबाकीदार नागरिकांना मोठा दिलासा मिळाला तसेच महापालिकेच्या महसुलातही वाढ झाली. त्याच धर्तीवर आता पाणी बिलावरील विलंब दंडावर देखील अभय योजना सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. शहरातील अनेक नागरिक विविध कारणांमुळे पाणी बिलाची थकबाकी भरू शकलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर विलंब दंडाचा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी-चिंचवड जिल्हा संघटनात्मक रचनेत महत्त्वाचा निर्णय घेत संजय पटणी यांची जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे नेते शत्रुघ्न (बापू) सीताराम काटे यांनी नियुक्तीपत्र देत ही घोषणा केली. दिनांक ०१ मार्च २०२६ रोजी देण्यात आलेल्या नियुक्तीपत्रात संजय पटणी यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याची दखल घेत त्यांना ही जबाबदारी सोपविण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. पक्षाच्या विचारसरणीचा प्रसार, जनतेच्या समस्या सोडविणे तसेच पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी त्यांनी आतापर्यंत केलेल्या सेवाभावी कार्याची दखल घेऊन ही नियुक्ती करण्यात आली आहे. या पत्रात पुढे नमूद करण्यात आले आहे की, पक्षाच्या सर्व सहकाऱ्यांसह जनतेच्या प्रगती…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संघवी केशरी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय मध्ये ‘मराठी भाषा गौरव दिनाचा’ कार्यक्रम,मराठी विभागाकडून आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन,ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) व, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळेस सावित्रीबाई फुले पुणे,’विद्यापीठ गीत’ व ‘मराठी भाषा अभिमान गीत’ यांचे गायन करण्यात आले. या दिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयात ‘काव्यसंमेलनाचे’ आयोजन करण्यात आले होते. या काव्य संमेलनामध्ये सुप्रसिद्ध हास्य कवी बंडा जोशी यांनी विविध विडंबनात्मक कवितांचे सादर करून श्रोत्यांचे मने जिंकली. कवी देवा झिंजाड त्यांची सुप्रसिद्ध कादंबरी ‘एक भाकर तीन चूली’आहे. या कादंबरीला अनुसरून वात्सल्य प्रेमाच्या प्रतीक असणाऱ्या ‘आई’ या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- पिंपरी चिंचवड महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम हे महापालिका सेवेतून २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे शहर अभियंता निकम यांच्या कडील विविध विभागांचा कार्यभार तात्पुरता स्वरूपात महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंता मनोज सेठिया आणि सुनील भागवानी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे, याबाबतचे आदेश आज निर्गमित केलेले आहेत. सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या आदेशानुसार मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांच्याकडे त्यांच्याकडील सध्याच्या पाणी पुरवठा व प्रकल्प विभागासह स्थापत्य विभागाच्या अतिरिक्त कार्यभाराची जबाबदारी सोपवि,ण्यात आली आहे. सह शहर अभियंता मनोज सेठिया यांच्याकडे त्यांच्याकडील सध्याच्या स्थापत्य मुख्य कार्यालय विभागासह उद्यान व क्रीडा स्थापत्य, शहरी…
आमदार शंकर जगताप यांच्या तारांकीत प्रश्नावर एकनाथ शिंदे यांची माहिती पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या भाडे व अनामत रक्कम वसुलीत तब्बल ५० लाख ७० हजार ६२६ रुपयांचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणात महापालिकेच्या क्रीडा विभागातील प्रशासन अधिकारी आणि १५ कर्मचाऱ्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. आमदार शंकर जगताप यांनी याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. प्रेक्षागृह भाड्याने देताना क्रीडा विभागातील अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा मुद्दा मांडण्यात आला. यात आमदार जगताप यांनी म्हटले की, महापालिकेची शहरात पाच…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगरूपी वाणीमधून समाजाला भक्ती, समता, नैतिकता आणि मानवतेचा संदेश दिला. त्यांच्या विचारांनी वारकरी संप्रदायाला नवी दिशा मिळाली आणि समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचे कार्य घडले. संत तुकाराम महाराजांचे अभंग हे केवळ भक्तीचे स्त्रोत नसून समाजजागृतीचे प्रभावी माध्यम आहेत असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीजनिमित्त संत तुकारामनगर, पिंपरी येथील संत तुकाराम महाराज यांच्या मंदिरातील पुतळ्यास महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, पिंपरी चिंचवड नवनगर विकास…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व धर्मीय नागरिकांच्या अंत्यसंस्काराचा खर्च महानगरपालिकेकडून देण्याबाबतच्या योजनेची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. भाऊसाहेब भोईर यांनी ४ मार्च २०२६ रोजी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त यांना पत्र देऊन या विषयाकडे लक्ष वेधले आहे. त्यांनी पत्रात नमूद केले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व धर्मीय व्यक्तींच्या अंत्यसंस्काराचा खर्च महानगरपालिकेमार्फत करण्याबाबत स्थायी समितीने ठराव मंजूर केला होता. स्थायी समिती ठराव क्रमांक १५५५ (दि. ०४/०४/२०२४) नुसार हा प्रस्ताव मंजूर झाला असून ३० मे २०२४ रोजी महापालिका सभेने देखील त्यास मंजुरी दिली आहे. त्यानंतर तत्कालीन आयुक्तांनी २ जुलै २०२४…
देहू, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या नामगजराने गुरुवारी देहूनगरी दुमदुमली. भजनी दिंड्यांनी रात्रभर केलेला जागर, काकडा आरती, महापूजा, हरिपाठ, वीणा, टाळ, मृदंग, चिपळ्यांची साथ, हरिनामाचा गजर आणि भाविकांची अलोट गर्दी अशा भक्तिमय वातावरणात ३७८ वा बीज सोहळा झाला. दुपारी बारा वाजता नांदुरकीच्या वृक्षावर फुलांची उधळण करून आणि मनोभावे हात जोडत भाविकांनी इंद्रायणीच्या काठी भक्तिचैतन्य फुलविले. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे आजच्या दिवशी सदेह वैकुंठगमन झाले. त्यामुळे हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो. देहूनगरीत या दिव्य सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी दाखल झाले होते. पहाटे तीन वाजता मुख्य देऊळवाड्यात काकडा आरती झाली. पहाटे चार वाजता…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, माजी नगरसेविका सीमा सावळे तसेच, पक्षाचे कार्याध्यक्ष फजल शेख या तीन जणांची नावे आयुक्तांना सादर केली आहेत. तर, नावांवरून एकमत न झाल्याने सत्ताधारी भाजपाकडून मुदत वाढवून देण्याची विनंती आयुक्तांकडे करण्यात आली आहे. त्यावरून भाजपामधील अंतर्गत घोळ आणि वाद पुन्हा चव्हाटावर आला आहे. महापालिकेतील नगरसेवक संख्याबळानुसार सत्ताधारी भाजपाचे 7 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 स्वीकृत नगरसेवक होणार आहेत. त्यानुसार 13 मार्चच्या सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर स्वीकृत नगरसेवकांची नियुक्तीचा विषय आहे. स्वीकृत नगरसेवकांसाठी नावाची शिफारस बुधवारी (दि.4) दुपारी 3 ते सायंकाळी 6 या वेळेत करण्याच्या सूचना आयुक्त…
