- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवडमधील भोसरी येथे पाण्याची टाकी कोसळून झालेल्या भीषण अपघातात पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे. ही घटना भोसरीतील सदगुरु नगर येथे आज सकाळी सात वाजता घडली असून, स्थानिक बिल्डरने बांधलेली पाण्याची टाकी कामगार राहत असलेल्या लेबर कॅम्पवर पडली. ही दुर्घटना पहाटेच्या सुमारास घडली आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलिसांसह स्थानिक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तातडीने प्रतिसाद दिला. ते तातडीने पोहोचले तरीही पाचही कामगारांना जागीच मृत घोषित करण्यात आले.
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होऊनही पिंपरी-चिंचवडमधील तिन्ही मतदारसंघांतील महाविकास आघाडीचा अद्याप एकही उमेदवार ठरला नाही. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या शहरातील संभाव्य इच्छुकांनी मुंबईला धाव घेतली आहे. महायुतीमधील भाजपने चिंचवडमधून शंकर जगताप आणि भोसरीतून विद्यमान आमदार महेश लांडगे यांची उमेदवारी जाहीर केली. तर, पिंपरीचे राष्ट्रवादी (अजित पवार) आमदार अण्णा बनसोडे यांना पक्षातून विरोध वाढला आहे. महायुतीने दोन उमेदवार जाहीर केले असताना महाविकास आघाडीत कोणता मतदारसंघ कोणत्या पक्षाकडे राहणार हे चित्रही स्पष्ट झाले नाही. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने तिन्ही मतदारसंघांवर दावा केला आहे. तर, शिवसेना (ठाकरे) पक्षाचा पिंपरी आणि भोसरीवर दावा आहे. महाविकास आघाडीतील सर्व…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड येथील ओम प्रतिष्ठान या संस्थे द्वारा राबविल्या जाणाऱ्या विद्यादान योजनेच्या स्वप्नपूर्ती निमित्ताने निधी उभारणी साठी “भाऊबीज” आणि “रद्दी पेपर दान” या दोन उपक्रमाचे उद्घाटन माननीय सौ प्रीती नारायण यांच्या हस्ते झाले . याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री सुनील चौधरी सर, रोटरी क्लब वालेकरवाडीचे अध्यक्ष गोविंद जगदाळे, रोटरियन सचिन खोले ,रोटरीन वसंत ढवळे व श्री जिओ थॉमस हे उपस्थित होते. प्रीती नारायण मॅडमनी या उपक्रमात देणगीदारांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन एका चांगल्या सामाजिक कार्यास मदत करण्याचे आवाहन केले. रोटरी क्लब वालेकरवाडीचे अध्यक्ष गोविंद यांनी संस्थेच्या विद्यादान योजनेचे कौतुक करताना शैक्षणिक मदत म्हणजे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – साई सोशल स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्यातर्फे इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार 2024 याचे आचार्य अत्रे सभागृह नेहरूनगर येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रातील एकूण 30 जणांना आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अशा व्यक्तीं व उत्कृष्ट संस्था यांना स्फूर्तीचिन्ह मेडल्स सर्टिफिकेट शॉल व श्रीफळ देऊन त्यांना प्रभाकर वाघेरे माजी उपमहापौर पिपरी चिचवड यांच्या हस्ते इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले. यांमध्ये सरस्वती भुवन इंग्लिश स्कूल पिंपळे गुरव या स्कूलला उत्कृष्ट स्कूल ने इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार 2024 ने गौरवण्यात आले.शाळेच्या मुख्याध्यापिका माया बायास व त्यांच्यासोबत…
– आयबीसी, पिंपरी चिंचवड चार्टर्ड अकाउंट्स’ संयुक्त विद्यमाने ‘महाराष्ट्र व्हिजन २०४७’ कार्यक्रम – लोकप्रियतेपेक्षा लोकहिताला प्राधान्य देणारे मोदी सरकार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पाश्चात्य तसेच इस्लामिक मतप्रवाहाचा प्रसार आणि प्रचार वेगाने होत आहे, भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी स्वधर्म, स्वराज्य, स्वदेश, स्व भूषा, स्व भाषा, स्व संस्कृती हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मंत्र अंमलात आणून महाराष्ट्राच्या विकास व केंद्र सरकारच्या योजनांना पुढे नेण्यासाठी राज्यात डबल इंजिन सरकार आवश्यक आहे. आता सर्व नागरिकांनी सामाजिक ऐक्य मजबूत करणाऱ्या सरकारच्या मागे खंबीरपणे उभे रहावे असे आवाहन माजी खासदार तथा भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले. इंडियन बिझनेस कौन्सिल,…
सामाजिक सलोखा ऐक्य परिषदेत अल्पसंख्याकांसह सर्व धर्म प्रतिनिधींची भूमिका पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मागील अकरा वर्षांपासून निवडणूक काळात देशभर जाती – धर्मात तेढ निर्माण करीत, धार्मिक ध्रुवीकरण करून मतांची मागणी केली जात आहेत. त्यामुळे अल्पसंख्याकांसह सर्व छोट्या सामाजिक घटकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पुरोगामी विचारांचा पुरस्कार करीत शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांना आदर्श मानून महाराष्ट्र नेहमीच देशात अग्रेसर राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीत आगामी विधानसभा निवडणुकीत धार्मिक ध्रुवीकरण रोखण्यासाठी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय सामाजिक सलोखा ऐक्य परिषदेत घेण्यात आला आहे अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष मुफ्ती अहमद हसन कासमी यांनी दिली. सामाजिक सलोखा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – २०६ पिंपरी (अ.जा) विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज दिनांक २३/१०/२०२४ रोजी विहित वेळेत दुस-या दिवशी एकुण २५ व्यक्तींनी निगडी येथील २०६ पिंपरी (अ.जा) विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातुन एकुण ४८ नामनिर्देशन अर्जांची खरेदी केली आहे. आज नामनिर्देशन पत्रे घेणाऱ्या व्यक्तींची नावे व त्यांनी नोंदविलेल्या माहितीचा तपशील :- किसन शंकर कांबळे(महाराष्ट्र नवनिर्मान सेना), गजानन महादु इचके,जितेंद्र बाबासाहेब ननावरे, अतुल गणेश समर्थ, गौतम लक्ष्मणराव आरकडे,चेतन रमेश राठोड,तेजस्वीनी चंद्रकांत कदम,बाबसाहेब विश्वनाथ बनसोडे(भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस) ,विश्वानाथ बबनराव जगताप(भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ),शाम अभिमन्यु घोडके,जफर खुर्शीद चौधरी(खाटीक)(स्वराज्य शक्ती सेना पार्टी), प्रल्हाद रामभाऊ कांबळे,नितीन अंकुश गवळी(वंचित बहुजन आघाडी),वैशाली कर्ण…
– विकास प्रकल्पांमुळे चिखलीचा कायापालट पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी- चिंचवड महापालिकेमध्ये 1997 मध्ये समाविष्ट झालेल्या चिखली परिसराचा खऱ्या अर्थाने कायापालट 2014 नंतर सुरू झाला. या भागात आता संतपीठ, पोलीस आयुक्तालय, न्यायालय संकुल, संविधान भवन उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात चिखली परिसर शहराच्या विकासाचा केंद्रबिंदू अर्थात ‘हार्ट ऑफ सिटी’ ठरेल, असा विश्वास भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला. 1997 ते 2014 अशा प्रदीर्घ कालावधीत भोसरी मतदारसंघातील समाविष्ट गावे विकासापासून वंचित राहिली. मात्र 2014 मध्ये भाजपचे सरकार आल्यानंतर या भागात सर्वाधिक निधी आणला. नागरिकांच्या सहकार्याने विकासाची गंगा यापुढेही या भागात अशीच वाहत राहील,…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित वाल्हेकरवाडी, बिजलीनगर, चिंचवडे नगर गावभेट दौऱ्यास स्थानिक ग्रामस्थ, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी गुजरात राज्याचे गृहमंत्री प्रदीप सिंह जडेजा यांची विशेष उपस्थिती होती. या गावभेट दौऱ्यानिमित्त शंकर जगताप यांनी वाल्हेकरवाडी, बिजली नगर आणि चिंचवडे नगर परिसरातील मान्यवर मंडळींच्या निवासस्थानी भेट देत त्यांच्याशी संवाद साधला. यामध्ये शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भगवान वाल्हेकर, माजी सत्तारूढ पक्षनेते शामराव वाल्हेकर, शिक्षण मंडळाचे माजी सभापती श्रीधर वाल्हेकर, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले, माजी नगरसेवक माऊली सूर्यवंशी, शेखर चिंचवडे, मोनाताई कुलकर्णी, आबा सोनवणे, रवींद्र वाल्हेकर,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आमदार बनसोडे नगरसेवकांना विश्वासात घेत नव्हते. लोकांना भेटत नव्हते अशी पक्षातील पदाधिकाऱ्यांची नाराजी होती. मतदारसंघात नवीन उमेदवार देण्याची मागणीही केली जात होती. नवनियुक्त शहराध्यक्ष यांनी अप्रत्यक्षपणे बनसोडे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. मात्र आज जाहीर झालेल्या अजित पवार गटाच्या पहिल्याच यादीत अण्णा बनसोडे यांचे नाव दिसून आले आहे. त्यामुळे विरोध करणाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. महायुतीकडूनअजित पवार गटाची पहिली यादी जाहीर झाली. त्यामध्ये पिंपरीतून अण्णा बनसोडे यांना विधानसभेच्या रणधुमाळीत उतरण्याची संधी देण्यात आली आहे. यावरून विरोध करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या मागणीला फेटाळल्याचे स्पष्ट चित्र समोर आले आहे. बनसोडे यांची उमेदवारी जाहीर होतात पिंपरीतील त्यांच्या कार्यालजवळ कार्यकर्त्यांची मोठी…
