ओम प्रतिष्ठान संस्थेचा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींच्या उच्च शिक्षणाचा पहिला टप्पा यशस्वीपने पूर्ण
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड येथील ओम प्रतिष्ठान या संस्थे द्वारा राबविल्या जाणाऱ्या विद्यादान योजनेच्या स्वप्नपूर्ती निमित्ताने
निधी उभारणी साठी “भाऊबीज” आणि “रद्दी पेपर दान” या दोन उपक्रमाचे उद्घाटन माननीय सौ प्रीती नारायण यांच्या हस्ते झाले .
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री सुनील चौधरी सर, रोटरी क्लब वालेकरवाडीचे अध्यक्ष गोविंद जगदाळे, रोटरियन सचिन खोले ,रोटरीन वसंत ढवळे व श्री जिओ थॉमस हे उपस्थित होते.
प्रीती नारायण मॅडमनी या उपक्रमात देणगीदारांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन एका चांगल्या सामाजिक कार्यास मदत करण्याचे आवाहन केले.
रोटरी क्लब वालेकरवाडीचे अध्यक्ष गोविंद यांनी संस्थेच्या विद्यादान योजनेचे कौतुक करताना शैक्षणिक मदत म्हणजे मुलींना खऱ्या अर्थाने स्वावलंबे बनवणे आहे . या योजनेमुळे श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी कमी होत आहे असे नमूद केले. काही मुली नोकरीला लागून इतर मुलींनाही मदत करत आहेत हा अतिशय स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगितले. त्यांनी स्वतःही या योजनेला मदत करण्याचा मानस व्यक्त केला .
भाऊबीज हा भाऊ-बहिणीच्या नात्याचा उत्सव. या उत्सवानिमित्ताने आपण समाजातील आपल्या हुशार, गुणवंत पण गरीब बहिणींना भाऊबीज देऊन त्यांच्या शिक्षणासाठी मदत करूयात.
त्यांच्या भविष्यासाठी काम करणाऱ्या “ओम प्रतिष्ठान “विद्यादान योजनेला योगदान देऊन आपण या नात्याला घट्ट बनवू शकतो. असे नम्र आवाहन अधक्षा वनिता सावंत यांनी केले.
वंचित मुलींना स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबाचे चांगले भविष्य घडवण्यासाठी त्यांना आपण सगळे मिळून उभारी देऊ शकतो. तुमची छोटीशी छोटी मदत त्यांच्यासाठी जगण्याची उमेद आणि आशा निर्माण करते.असे मत सचिन खोले यांनी व्यक्त केले.
शिक्षणामुळे मुली स्वतःच्या पायावरती उभे राहून सक्षम होतात.प्रत्येक मुलीला शिकण्याचा आणि यशस्वी होण्याचा समान हक्क आहे.
सुशिक्षित मुली एक मजबूत समाज निर्माण करु शकतो यामुळे मा. सुनिल चौधरी यांनी या प्रकल्पासाठी देणगी दिली.
हा भाऊबीज सण सक्षमीकरणाचा, आशेचा आणि उज्ज्वल उद्याचा उत्सव असू दे. तुमच्या पाठिंब्याने आपण एक जीवन बदलू शकतो!
तुमचे योगदान समाजात मो मोठा बदल घडवू शकते. यामुळे या सामाजिक कामात सर्वांनी शक्य ती मदत करावी.असे आव्वाहन या प्रसंगी करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी विद्या महाजन यांनी आभार प्रदर्शन केले. डॉक्टर सोनल पाटील यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. संस्थेच्या अध्यक्षा वनिता सावंत आणि अनिता पाटील यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.