Author: maharashtrabreakingnews.com

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संभाजीनगर येथील सिद्धिविनायक मंदिरात रविवार दिनांक २७ ऑक्टोबर रोजी “हॅलो सखी शिक्षक मंच” च्या वतीने स्वरगंध भक्तीसरगम प्रस्तुत दिवाळी पहाट चे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील विविध माध्यमिक मराठी शाळांमध्ये इंग्रजीचे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचा ” हॅलो सखी” हा मंच सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहे. संभाजीनगर येथील स्वा. सावरकर प्रतिष्ठान, स्वा. सावरकर मित्र मंडळ व सिद्धिविनायक जेष्ठ नागरिक संघाच्या सहकार्याने या दिवाळी पहाट चे आयोजन करण्यात आले आहे. राजगुरूनगर आयडॉल प्रदीप मोहिते हे प्रमुख गायक असून प्रकाश सुतार व कुडाळकर यांची साथसंगत आहे. नागरिकांनी सदर दिवाळी पहाट कार्यक्रमांचा आस्वाद घेत दिवाळीचा आनंद द्विगुणित करावा,…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शिवतेजनगर येथील स्वामी सेवा समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने नंदिन सरीन प्रस्तुत “स्वर चांदण्यांचे” या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी करण्यात आलेले आहे. स्वामी स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण बहिरवाडे हे मुख्य संयोजक आहेत. पिंपरी चिंचवड आयडॉल भूषण तोष्णीवाल, सूर नवा ध्यास नवा फेम अभयसिंह वाघचौरे, किशोरी सरीन, साहिल सारसर, किरण बेंद्रे, विजया चौहान हे गायन करणार आहेत. संगीतसाज नंदिन सरीन, प्रसाद कोठी, विनायक वाघचौरे, सतीश काळे यांचा आहे. प्रसिद्ध  निवेदक- व्याख्याते  राजेंद्र घावटे हे कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत.

Read More

– माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे यांच्यासह ग्रामस्थांची भावना – मोशी परिसराच्या विकासाला चालना म्हणून आमची साथ पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मोशी येथील ६५० बेडचे हॉस्पिटल, न्यायालय संकुल, अभियांत्रिकी कॉलेज, आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र, संविधान भवन यांसारख्या अभिनव प्रकल्पांची उभारणी भोसरी मतदारसंघात करून आमदार महेश लांडगे यांनी मोशी सारख्या समाविष्ट गावांमध्ये विकासाचा नवा अध्याय सुरू केला आहे. विशेषतः पिंपरी चिंचवडच्या तुलनेत विकासाच्या प्रवाहात मागे पडलेल्या समाविष्ट गावांना विकासाचा अर्थ सांगणाऱ्या आमदार लांडगे यांच्या पाठीशी मोशी गाव एकजुटीने उभे राहणार आहे, असा निर्धार माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे यांनी व्यक्त केला. भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार महेश लांडगे…

Read More

कामगारांची नोंदणी अनिवार्य करण्यासाठी मोहीम सुरू करणे आवश्यक भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भोसरी येथे पाण्याची टाकी कोसळून दुर्घटना झाली त्या ठिकाणाला शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी सांगितले की, ऐन सणासुदीच्या तोंडावर कामगारांवर जो प्रसंग ओढवला आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे. या ठिकाणी लेबर कॅम्पमधील कामगारांसाठी तकलादू पद्धतीने पाण्याची टाकी उभारली असल्याचे प्रथमदर्शनी कळते आहे. येथील ठेकेदाराने येथील टाकीची बांधणी व्यवस्थित केली असती तर हा प्रसंग ओढवला नसता. तसेच येथील कामगार हे कुठून आलेले आहेत याची माहिती पूर्णपणे नाही. कामगार विभाग आणि महापालिका सातत्याने कामगारांची नोंदणी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आम्ही अंध असलो तरी, मतदान करण्याच्या बाबतीत आम्ही डोळस आहोत. आम्ही प्रत्येक निवडणूकीत सहभागी होत असून मतदानाच्या दिवशी सुरवातीलाच सहभागी होत असून मतदानाच्या दिवशी सुरवातीलाच मतदान करण्याचा आमचा मानस असतो. मतदानाच्या दिवशी आम्ही सर्वजण आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करीत असतो. निवडणूक विभागाकडून आम्हाला चांगले सहकार्य मिळत असते. व्हीलचेअर, मदतनीस यामुळे मतदान करणे आम्हाला सोपे जाते. या वेळीदेखील आम्ही विधानसभा निवडणूकीत १०० टक्के मतदान करणार आहोत. तसे सर्व शहरवासियांनीदेखील मतदान करावे असे मत अंध मतदारांनी व्यक्त केले. जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांचे निर्देशानुसार २०६, पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या वतीने स्वीप उपक्रमांतर्गत कार्यक्षेत्रात…

Read More

थेरगाव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड मतदारसंघात विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली औंध जिल्हा रुग्णालय येथे मतदान जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी रुग्णालयातील डॉक्टरांना तसेच कर्मचाऱ्यांना ‘मी मतदान करणार, आपल्या देशाचे भवितव्य घडविणार’ अशी शपथ देण्यात आली. २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील स्वीप कक्षाचे नोडल अधिकारी राजीव घुले यांच्या अधिपत्याखाली स्वीप कक्षाचे गणेश लिंगडे, अंकुश गायकवाड, प्रिन्स सिंह यांनी औंध जिल्हा रुग्णालय येथील मतदान जनजागृती कार्यक्रम पार पाडला. या मतदान जनजागृती कार्यक्रमाच्या वेळी औंध रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. कोणत्याही अमिषाला बळी न पडता प्रत्येक नागरिकाने निर्भय…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दहाव्यांदा अर्थसंकल्प मांडला. यावेळी महाराष्ट्रातील महिलांसाठी लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून सक्षम आत्मविश्वास आणि आत्मबळ दिला. असे यावेळी रूपाली चाकणकर सांगितले आहे. लाडकी बहिण, अन्नपूर्णा योजना, लेक लाडकी योजना,लखपती दीदी योजना,बचत गटांना वाढीव अनुदान या सगळ्या योजनांच्या माध्यामतून महिलांच्या चेहऱ्यावर हसू उमटत आहे.असेही यावेळी त्यांनी सांगितले. महिलांच्या खात्यात त्यांच्या हक्काचे ७५०० हजार रुपये जमा झाले आहेत. महाराष्ट्रातील जवळपास सव्वा दोन कोटीमहिलांच्या नावावर असलेल्या अकाउंट मध्ये स्वतःच्या हक्काचे पैसे मिळाले आहे.अशी माहिती यावेळी रूपाली चाकणकर यांनी दिली आहे. महायुतीमध्ये आमचे नेते दिल्ली मध्ये चर्चा करून महाराष्ट्रामध्ये ही योजना पुढे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  मोबाइल शॉपीला आग लागून मोठे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी (दि. २५) पहाटे दोन वाजताच्या सुमारास शगुन चौक, पिंपरी येथे घडली. अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास पिंपरीतील शगुन चौकात असलेल्या प्रीतम मोबाइल या दुकानाला आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अग्निशामक मुख्यालयातून आगीचा बंब घटनास्थळी दाखल झाला. दुकानाचे शटर उचकटून अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यास सुरुवात केली. काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळविले. आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, अशी शक्यता अग्निशामक दलाच्या सूत्रांनी व्यक्त केली. अग्निशामक दलाचे पीएसओ चंद्रशेखर घुले (PSO), लीडिंग…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भोसरी सदगुरु दत्तनगर या ठिकाणी रेड झोन मध्ये अनधिकृत उभारलेल्या लेबर कॅंप – झालेल्या कामगाराच्या जीवितहानी मधिल दोषींवर योग्य ते गुन्हे दाखल करण्यात यावेत, या ठिकाणी रेड झोन मध्ये रेड झोन मध्ये अनधिकृत रीत्या अदानी कंपनीने लेबर कँप उभारले असून त्या ठिकाणी बांधकाम कामगार सुरक्षा नियमानुसार कामगारांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेतलेली नाही. तिथे कामगारांना राहण्यास जागा दिली व तेथे तीन ते चार दिवस आधी बांधलेल्या पाण्याची काँक्रेटची टाकी कोसळल्यामुळे लेबर कॅम्प मधील काही कामगार त्या टाकी खाली चिरडून मृत्त्युमुखी पडले ही दुर्दैवी आणि हलगर्जीपणामुळे घडलेली दुर्घटना आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन…

Read More

संवाद बैठकीत कार्यकर्त्यांनी केला भाऊसाहेब भोईर यांच्या विजयाचा निर्धार! चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पंधरा दिवसांपूर्वी भाऊसाहेब भोईर यांनी चिंचवड मतदार संघातील रहाटणी येथे कार्यकर्ता मेळावा घेतला होता त्यावेळी तीन हजारांहून अधिक कार्यकर्ते उपस्थित राहून भाऊसाहेब भोईर यांना पाठिंबा दर्शविला होता. फक्त मेळावा घेणार असा निरोप भाऊसाहेब भोईर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पाठवला आणि एखाद्या आमदारांच्या कार्यक्रमाला गर्दी व्हावी तसाच जनसागर उसळला होता. त्याप्रमाणे आज रोजी बोलावलेल्या संवाद बैठकीला शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून पुन्हा एकदा भाऊसाहेब भोईर यांनाच आमदार करण्याचा निश्चय केला या वेळी येत्या २८ तारखेला भाऊसाहेब भोईर यांनी निवडणूक अर्ज भरणार असल्याचे जाहीर केले. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल…

Read More