अजित पवार यांनी अर्थसंकल्पात घोषणा केलेल्या लाडकी बहीण योजेनेमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे – रूपाली चाकणकर
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दहाव्यांदा अर्थसंकल्प मांडला. यावेळी महाराष्ट्रातील महिलांसाठी लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून सक्षम आत्मविश्वास आणि आत्मबळ दिला. असे यावेळी रूपाली चाकणकर सांगितले आहे.
लाडकी बहिण, अन्नपूर्णा योजना, लेक लाडकी योजना,लखपती दीदी योजना,बचत गटांना वाढीव अनुदान या सगळ्या योजनांच्या माध्यामतून महिलांच्या चेहऱ्यावर हसू उमटत आहे.असेही यावेळी त्यांनी सांगितले.
महिलांच्या खात्यात त्यांच्या हक्काचे ७५०० हजार रुपये जमा झाले आहेत. महाराष्ट्रातील जवळपास सव्वा दोन कोटीमहिलांच्या नावावर असलेल्या अकाउंट मध्ये स्वतःच्या हक्काचे पैसे मिळाले आहे.अशी माहिती यावेळी रूपाली चाकणकर यांनी दिली आहे.
महायुतीमध्ये आमचे नेते दिल्ली मध्ये चर्चा करून महाराष्ट्रामध्ये ही योजना पुढे चालू ठेवण्यासाठी तर त्याचा आम्हाला अभिमान आहे. अशी प्रतिक्रिया यावेळी रूपाली चाकणकर यांनी दिली आहे.